Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

जयंत पाटील बोले: भाजपा की दादागिरी अजित पवार गट के खिलाफ

SMSarfaraj Musa
Feb 18, 2026 12:16:25
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - भाजपाकडून राष्ट्रवादी अजित पवार गटावर दादागिरी आणि दमदाटीचा प्रकार - जयंत पाटील घड्याळयाच्या चिन्हावर निवडून आलेल्यांवर भाजपा,कशी दादागिरी करू शकते ? भाजपाच्या नेत्यांकडून दमदाटी करणे म्हणजे एका पक्षाने दुसऱ्या पक्षावर दादागिरी करणे,असा प्रकार असल्याचं टिका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.सांगली जिल्हा परिषद निवडणुकीतील सत्तेबाबत भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी अजित पвар गट मोडू शकत नाही,अशा शब्दात इशारा दिला होता,यावरून जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आमची आघाडी होती,त्यामुळे यांच्याबरोबर आमची आघाडी होती,त्यांनी आमच्याबरोबर यावं, असं आवाहन देखील जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते.. बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Feb 18, 2026 14:04:55
Beed, Maharashtra:महादेव मुंडे खून प्रकरणाचा एसआयटी तपास, दोघांची नार्को टेस्ट, एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी पूर्ण संशयितांच्या चाचण्यांच्या अहवालाची एसआयटीला प्रतीक्षा परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला दोन वर्ष उलटून देखील आरोपींचा शोध लागत नाही.. याप्रकरणी तपास वेगवान पद्धतीने व्हावा यासाठी सात महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून एस आय टी ची स्थापना करण्यात आली होती. मात्र अद्यापही हा तपास अंतिम टप्प्यावर पोहोचला नाही. दरम्यान या प्रकरणाशी संशयित असलेल्या तेजस मोरे आणि सोमनाथ जाधव यांची नार्को टेस्ट तर महेश शिंदे याची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात आली. या चाचण्यांचे काही दिवसात अहवाल येण्याची शक्यता आहे.. त्यानंतर एसआयटी कडून महादेव मुंडे खून प्रकरणात मोठी कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 18, 2026 13:49:58
Beed, Maharashtra:महादेव मुंडे खून प्रकरणाचा एसआयटी तपास, दोघांची नार्को टेस्ट, एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी पूर्ण संशयितांच्या चाचण्यांच्या अहवालाची एसआयटीला प्रतीक्षा परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला 28 उलटून देखील आरोपींचा शोध लागत नाही.. याप्रकरणी तपास वेगवान पद्धतीने व्हावा यासाठी सात महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून एस आय टी ची स्थापना करण्यात आली होती. मात्र अद्यापही हा तपास अंतिम टप्प्यावर पोहोचला नाही. दरम्यान या प्रकरणाशी संशयित असलेल्या तेजस मोरे आणि सोमनाथ जाधव यांची नार्को टेस्ट तर महेश शिंदे याची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात आली. या चाचण्यांचे काही दिवसात अहवाल येण्याची शक्यता आहे.. त्यानंतर एसआयटी कडून महादेव मुंडे खून प्रकरणात मोठी कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 18, 2026 13:49:46
Gadchiroli, Maharashtra:नक्सलवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेली गडचिरोली जिल्हाभरातील 44 नक्सल शहीद स्मारके गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ कडून एकाच वेळी उध्वस्त अँकर: दुरगम-अतिदुर्गम भाग असलेला गडचिरोली जिल्हा हा नक्सलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. येथील जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखविण्यासाठी नक्षल्यांकडून अतिदुर्गम भागांमध्ये नक्षल स्मारकांची निर्मिती केली जात होती. मात्र गेल्या काळात गडचिरोली पोलीस दलाकडून राबविल्या जाणा­या प्रभावी नक्षलविरोधी अभियानांमूळे जिल्ह्रातील नक्षल चळवळ जवळजवळ संपूष्टात आली असून, सामान्य नागरीकांच्या मनात नक्सलवाद्यांची असलेली भिती कमी होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाकडून नक्षल्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेले जिल्हाभरातील एकूण 44 नक्षल स्मारके आज नष्ट करण्यात आली. आज 16 बाँब शोधक पथके, विशेष अभियान पथक, सीआरपीएफ व विविध ठाण्याचे कर्मचारी यांनी विविध जंगल परिसरात शोध अभियान सुरु केले. यादरम्यान एकूण 44 स्मारके आढळून आली. या स्मारकांची व परिसराची बिडीडीएस पथकाने कसून तपासणी केली व त्यानंतर जवानांनी सदर स्मारके उध्वस्त केली. यामध्ये एटापल्ली उपविभागातील 18, हेडरी उपविभागातील 17, भामरागड उपविभागातील 05, जिमलगट्टा उपविभागातील 02, धानोरा उपविभागातील 01 व पेंढरी उपविभागातील 01 अशा एकूण 44 स्मारकांचा समावेश आहे. नक्सल्यांचे आश्रयस्थान समजल्या जाणाऱ्या अतिदुर्गम पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी व गट्टा (जां.) इत्यादी गावांतील स्मारके उध्वस्त करून गडचिरोली पोलीस दलाने परिसरातील नागरिकांमध्ये नक्सलवाद्यांची असलेली दहशत संपवलेली आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 18, 2026 13:47:07
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचा तिढा निर्माण झालेला असताना स्वर्गीय आर आर पाटील यांचे बंधू व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुरेश पाटील यांच्याकडून भाजपाला पाठिंबा देण्याबाबत विधान करण्यात आलंय,विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नूतन जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये आमदार जयंत पाटील आणि रोहित पाटलांच्या समोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुरेश पाटील यांनी जयंत पाटीलाकडे ही मागणी केली आहे.सांगली जिल्हा परिषदेमध्ये कुणाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही,त्यामुळे सत्तेचा तिढा निर्माण झालेला आहे यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी खासदार संजयकाका पाटलांकडून अध्यक्षपद आपल्यालाच पाहिजे महायुती आणि महाविकास आघाडीकडे केली आहे, कार्यक्रमांमध्ये आमदार रोहित पाटलांनी सुरेश पाटलांचा ते वैयक्तिक मत असल्याचं सांगत जयंत पाटील जो निर्णय घेतील तोच अंतिम असेल,असे स्पष्ट केले..
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 18, 2026 13:20:54
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे तीन आमदारांची शिवसेनेच्या मंत्र्यांशी जवळीक वाढलेली आहे. मोहोळ चे आमदार राजू खरे हे एकनाथ शिंदे यांचे समर्थक मानले जातात. आमदार उत्तम जानकर यांच्या सुद्धा शिवसेना मंत्र्यांच्या गाठीभेटी वाढलेली आहेत तर करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी सुद्धा यापूर्वी एकनाथ शिंदे यांची विकास कामांसाठी भेट घेतलेली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये भाजपशी पंगा घेतल्यामुळे या आमदारांना विकास निधी मिळत नाही अशी जाहीर नाराजी यापूर्वी आमदार उत्तम जानकर यांनी बोलून दाखवली होती त्यामुळेच की काय आता हे आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 18, 2026 13:06:33
Thane, Maharashtra:भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने उमेदवार बदलल्याने मोठा राजकीय गोंधळ... काँग्रेसच्या महापौरपदाच्या आशा बळकट झाल्या आहेत... भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीबाबत मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) यापूर्वी महापौर पदासाठी नारायण रतन चौधरी यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले होते, परंतु आता भाजप शहराध्यक्षांच्या लेटरहेडवर स्नेहा पाटील यांचे नाव असलेले एक नवीन पत्र राजकीय हालचालींना उधाण आणलं आहे. या अनपेक्षित बदलानंतर, नारायण रतन चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. त्यांना तिकीट दिल्याबद्दल, नगरसेवक बनवल्याबद्दल आणि महापौरपदाचा उमेदवार घोषित केल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले. चौधरी यांनी स्पष्ट केले की, घोषणे नंतर त्यांनी सर्व महायुती पक्षांच्या नेत्यांशी भेट घेतली आणि सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. नारायण चौधरी यांनी पुढे सांगितले की, सध्याच्या परिस्थिती पाहता, ते आता धर्मनिरपेक्ष आघाडीच्या नेत्यांशी या विषयावर चर्चा करणार आहेत. भिवंडीतील महापौरपदाच्या निवडणुकी बाबतची समीकरणे वेगाने बदलत आहेत. येत्या काळात नारायण चौधरी यांचे पुढील राजकीय पाऊल आणि ही नवीन समीकरणे निवडणूक निकालांवर कसा परिणाम करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. काँग्रेसला मोठ्या प्रमाणात ताकद मिळण्याची अपेक्षा असताना, धर्मनिरपेक्ष आघाडीच्या उमेदवाराला महापौरपदाची दाट शक्यता असल्याचे दिसून येते.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 18, 2026 12:47:50
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 18, 2026 12:33:33
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील बोरकुंड गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती अशा अश्वारूढ पुतळ्याचे मोठ्या थाटात अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र स्टेटचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, धुळे जिल्याचे पालकमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आले. जनस्वराज्य प्रतिष्ठानचे प्रमुख बाळासाहेब भदाणे, आमदार अनुप अग्रवाल आमदार मंजुळा गावित आमदार राम भदाणे उपस्थित होते. यावेळी मोठ्या दिमाखात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात मोठ्या संख्येने शिवप्रेमी व गावकरी उपस्थित होते.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 18, 2026 11:52:59
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग - नाशकात जीर्ण भिंत कोसळून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू प्रशासनाच्या दुर्लक्ष; चिमुकल्यांचा बळी? धोकादायक इमारतीचा घेतला जीव खेळता खेळता काळाचा घाला; सातपूर परिसरात शोककळा नाशिक शहरातील सातपूर कॉलनी परिसरात अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सातपूर कॉलनीतील कामगार कल्याण मंडळाच्या जवळच असलेल्या एका जुन्या आणि जीर्ण अवस्थेतील घराची भिंत अचानक कोसळल्याने एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उजेर खान असे या मृत चिमुकल्याचे नाव असून ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. परिसरातील मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घर अनेक दिवसांपासून धोकादायक अवस्थेत होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे....काल सायंकाळी परिसरात खेळत असताना अचानक ही भिंत कोसळली आणि जवळच असलेल्या उजेर खान याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी अवस्थेतील चिमुकल्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेमुळे सातपूर कॉलनी परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जीर्ण व धोकादायक इमारतींकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. नाशिक शहरात वाढत्या शहरीकरणा सोबत सुरक्षिततेचे प्रश्नही गंभीर होत चालले आहेत.प्रशासन याकडे वेळीच लक्ष देणार का? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे....
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 18, 2026 11:52:42
Nagpur, Maharashtra:नागपूर:- नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्यीय मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय . 10 आरोपींना अटक केलीय . पोलिसांनी आरोपींकडून ४० मोबाईल फोन जप्त केले आहेत, ज्यांची किंमत अंदाजे १२ लाख रुपये आहे.पोलिसांना माहिती मिळाली की काही संशयित शहरात मोबाईल चोरी करणारी टोळीतील काही सदस्य भाड्याच्या घरात रहात आहेत. माहितीच्या आधारे, पोलिस पथकाने संबंधित घरात सापळा रचला आणि सर्व आरोपींना ताब्यात घेतले.सर्व आरोपी झारखंडचे रहिवासी आहेत आणि नागपूर शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत गर्दीच्या ठिकाणी जाऊन मोबाईल चोरी करत होते. चोरीनंतर त्यांनी चोरीचे फोन इतर राज्यात विक्री करत होते पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे आणि टोळीने इतर कोणत्या ठिकाणी गुन्हे केले आहेत याचीही तपास करत आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 18, 2026 11:50:41
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तयार होणा-या फेडएक्स टर्मिनल हब मुळे मालवाहतूकच्या क्षेत्रात एकूणच गुणवत्ता उंचावणार आहे. फेडएक्स जगभरातील 650 विमानतळावर कार्यरत आहे ज्यामध्ये 700 मालवाहतूक विमाने वापरली जातात. या नव्या विमानतळावरील फेडएक्सच्या सुविधेमुळे महाराष्ट्रातील मालवाहतुकीला अधिक चालना मिळेल. विशेष करून देशाची आर्थिक, व्यापारी, तसेच मनोरंजन राजधानी असणा-या मुंबईत एमएमआर क्षेत्रात हे विमानतळ असल्यामुळे हे भारताचे भविष्य आहे. 2047 पर्यंत हा भाग 5 ट्रिलीयन अर्थव्यवस्था होणारा असणार आहे ज्यामध्ये फेडएक्सचे सर्वात जास्त योगदान असणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबईत केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडएक्स च्या पूर्णपणे स्वयंचलित हवाई मालवाहतूक (एअर कार्गो) हबचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अदानी उद्योग समूहाचे जीत अदानी, वरिष्ठ अधिकारी, सिडकोचे उपाध्यक्षा विजय सिंघल, वने मंत्री गणेश नाईक आमदार मंदा म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते. हे हब पश्चिम भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापार कॉरिडॉर मजबूत करण्यासाठी एनएमएआयच्या बहुआयामी पायाभूत सुविधांचा वापर करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, लॉजिस्टिक्स च्या इतिहासात भारतासाठीच नव्हे महाराष्ट्र, मुंबईसाठी आजचं हे भूमिपूजन महत्वाचं आहे. व्यापाराच्या क्षेत्रात खूप मोठे बदल होत आहेत. जुनी आव्हानं बदलून नवीन आव्हानं तयार होत आहेत आणि पुरवठा साखळीवर त्याचा बदल दिसून येत आहे. या संघर्षाच्या काळात मुंबईत फेडएक्स सारख्या कंपनीने गुंतवणूक करण्याचं ठरवलं हे भारताच्या शक्तीचं प्रतीक आहे. तसंच व्यापाराचा संबंध येतो तेव्हा भारत, मुंबईचं महत्व किती आहे हे दाखवते. त्यामुळे या कंपनीला मी सांगू इच्छितो की तुम्ही योग्य वेळी निर्णय घेतला आहे. कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रवासी आणि मालवाहतूकीसाठी भारताचे मोठे आणि व्यस्त विमानतळ असणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. फेडएक्स 2,50,000 कोटींपेक्षा जास्त दीर्घकालीन गुंतवणुकीसह एनएमआयएमध्ये 3,00,000 चौरस फूट पूर्णपणे स्वयंचलित एअर कार्गो हब विकसित करेल. ही सुविधा भारताला आग्नेय आशिया, पश्चिम आशिया, युरोप आणि युनायटेड स्टेट्सशी जोडणारे प्रादेशिक केंद्र म्हणून काम करेल. हे हब लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, वाहतूक आणि संबंधित सेवांमध्ये 6,000 हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करेल.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 18, 2026 11:45:25
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... लातूर शहरात विद्यार्थ्यांच्या हत्या प्रकरणातील चारही आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. शिवाजीनगर पोलीस ठाणे येथून शहराच्या मुख्य चौकातून आरोपींना थेट घटना घडलेल्या ठिकाणी नेण्यात आले. औसा रोडवरील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या दोन गटांत झालेल्या वादातून चाकू हल्ला झाला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता तीन जण जखमी झाले होते. या घटनेनंतर दहशत निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही कडक कारवाई केली. धिंडीदरम्यान मुख्य रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलिसांच्या या कारवाईची जोरदार चर्चा होत असून, यामुळे गुन्हेगारांना धडा मिळेल का याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे. अभिषेक शिंदे ( पोलीस अधीकारी)
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 18, 2026 11:32:08
0
comment0
Report
Advertisement
Back to top