Back
नवी मुंबई हवाईअड्डे पर FedEx हब से मालवाहतुक में नया युग शुरू
SNSWATI NAIK
Feb 18, 2026 11:50:41
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तयार होणा-या फेडएक्स टर्मिनल हब मुळे मालवाहतूकच्या क्षेत्रात एकूणच गुणवत्ता उंचावणार आहे. फेडएक्स जगभरातील 650 विमानतळावर कार्यरत आहे ज्यामध्ये 700 मालवाहतूक विमाने वापरली जातात. या नव्या विमानतळावरील फेडएक्सच्या सुविधेमुळे महाराष्ट्रातील मालवाहतुकीला अधिक चालना मिळेल. विशेष करून देशाची आर्थिक, व्यापारी, तसेच मनोरंजन राजधानी असणा-या मुंबईत एमएमआर क्षेत्रात हे विमानतळ असल्यामुळे हे भारताचे भविष्य आहे. 2047 पर्यंत हा भाग 5 ट्रिलीयन अर्थव्यवस्था होणारा असणार आहे ज्यामध्ये फेडएक्सचे सर्वात जास्त योगदान असणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबईत केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडएक्स च्या पूर्णपणे स्वयंचलित हवाई मालवाहतूक (एअर कार्गो) हबचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अदानी उद्योग समूहाचे जीत अदानी, वरिष्ठ अधिकारी, सिडकोचे उपाध्यक्षा विजय सिंघल, वने मंत्री गणेश नाईक आमदार मंदा म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते. हे हब पश्चिम भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापार कॉरिडॉर मजबूत करण्यासाठी एनएमएआयच्या बहुआयामी पायाभूत सुविधांचा वापर करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, लॉजिस्टिक्स च्या इतिहासात भारतासाठीच नव्हे महाराष्ट्र, मुंबईसाठी आजचं हे भूमिपूजन महत्वाचं आहे. व्यापाराच्या क्षेत्रात खूप मोठे बदल होत आहेत. जुनी आव्हानं बदलून नवीन आव्हानं तयार होत आहेत आणि पुरवठा साखळीवर त्याचा बदल दिसून येत आहे. या संघर्षाच्या काळात मुंबईत फेडएक्स सारख्या कंपनीने गुंतवणूक करण्याचं ठरवलं हे भारताच्या शक्तीचं प्रतीक आहे. तसंच व्यापाराचा संबंध येतो तेव्हा भारत, मुंबईचं महत्व किती आहे हे दाखवते. त्यामुळे या कंपनीला मी सांगू इच्छितो की तुम्ही योग्य वेळी निर्णय घेतला आहे. कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रवासी आणि मालवाहतूकीसाठी भारताचे मोठे आणि व्यस्त विमानतळ असणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. फेडएक्स 2,50,000 कोटींपेक्षा जास्त दीर्घकालीन गुंतवणुकीसह एनएमआयएमध्ये 3,00,000 चौरस फूट पूर्णपणे स्वयंचलित एअर कार्गो हब विकसित करेल. ही सुविधा भारताला आग्नेय आशिया, पश्चिम आशिया, युरोप आणि युनायटेड स्टेट्सशी जोडणारे प्रादेशिक केंद्र म्हणून काम करेल. हे हब लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, वाहतूक आणि संबंधित सेवांमध्ये 6,000 हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करेल.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowFeb 18, 2026 13:20:540
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 18, 2026 13:18:530
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 18, 2026 13:06:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 18, 2026 12:47:500
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 18, 2026 12:33:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 18, 2026 12:16:250
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 18, 2026 11:52:590
Report
AKAMAR KANE
FollowFeb 18, 2026 11:52:420
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 18, 2026 11:45:250
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 18, 2026 11:32:080
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 18, 2026 11:30:260
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 18, 2026 11:21:210
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 18, 2026 11:17:330
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 18, 2026 10:52:340
Report