Back
लातूर में दो बार अतिवृष्टि, किसानों को मुआवजे में 100-200 रुपये पर आक्रोश
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 10, 2025 09:14:23
Latur, Maharashtra
लातूर जिल्ह्यात यावर्षी तब्बल दोन वेळा अतिवृष्टी झाली. यामध्ये जिल्ह्यातील ५ लाख ६५ हजार ५८५ हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. यापैकी जवळपास ५ लाख १९ हजार २७४ शेतकरी बाधित झाले आहेत. प्रमुख पिक सोयाबीन मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेलं… शेतकऱ्यांना पिकविम्याकडून मोठी मदत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र खात्यात जमा झाले फक्त १००, १५०, २०० रुपये… त्यामुळे सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, देवणी, जळकोट, रेणापूर, उदगीर या तालुक्यात पावसाने अक्षरशः थैमान घातलं. सोयाबीन हे प्रमुख पिक असलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली होती. मात्र अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीन वाहून गेलं तर काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या पिकात पाणी साचल्याने पीक हे कुजून गेलं आणि पूर्णपणे नष्ट झालं. तरीसुद्धा मायबाप सरकारला शेतकऱ्याची दया आली नाही असा आरोपच शेतकरी करत आहेत.
या नुकसानात औसा तालुका सर्वाधिक बाधित होता. इथल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून प्रमुख पिक सोयाबीन लावलं होतं. अतिवृष्टीने पिक जमीनदोस्त झालं. मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यामध्ये भरघोस मदत मिळेल असं स्पष्ट आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात पिकविमा कंपनीने दिलेली १००, १५० किंवा २०० रुपयांची रक्कम पाहून शेतकरी संतप्त झालेत.
शेतकरी संघटनांनी पिकविमा कंपनीने शेतकऱ्यांचा हिडमोड केला असा आरोप केला आहे. हे नुकसान भरपाई नाही… तर शेतकऱ्यांचा अपमान आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया जिल्ह्यातून उमटत आहे. आता सरकार पुनर्मूल्यांकन करणार का? की शेतकऱ्यांना पुन्हा एकदा केवळ आश्वासनांवरच समाधान मानावं लागणार?
वैभव बालकुंदे
ZEE 24 TAAS Latur
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowNov 10, 2025 11:06:374
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 10, 2025 11:05:143
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 10:49:544
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 10, 2025 10:37:412
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 10:33:372
Report
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 10:27:284
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 10:26:444
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 10, 2025 10:10:060
Report
SNSWATI NAIK
FollowNov 10, 2025 10:04:550
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 10:04:340
Report
SNSWATI NAIK
FollowNov 10, 2025 09:58:332
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowNov 10, 2025 09:46:594
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 10, 2025 09:41:002
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 09:40:421
Report
AKAMAR KANE
FollowNov 10, 2025 09:37:592
Report