Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

निष्ठावान रिक्षा चालक ने खोया बैग लौटाकर दिखा दी ईमानदारी की मिसाल

SNSWATI NAIK
Nov 10, 2025 09:58:33
Navi Mumbai, Maharashtra
रिक्षात बसलेल्या प्रवाश्याची पिशवी मूळ मालकाला परत देत रिक्षा चालकाने प्रामाणिकपणाचे दर्शन दिलेय. या पिशवी मध्ये तब्बल 12 तोळे सोन्याचे दागिने होते मात्र रिक्षा चालकाने कुठलीही लालसा न ठेवता प्रवश्याची पिशवी वाशी पोलीस ठाण्यात आणून दिली. पिशवी हरवल्याने प्रवाशी देखील पोलीस ठाण्यात उपस्थित होता. यावेळी पोलिसांनी मराठी रिक्षा चालक संतोष शिर्के यांच्या प्रामाणिकतेचे कैतूक करत हरवलेली पिशवी मूळ मालकास परत केली. यावेळी पिशवीच्या मालकाने आनंद व्यक्त करत रिक्षा चालकाचा सत्कार करत आभार व्यक्त केले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Mar 10, 2026 03:34:58
Chandrapur, Maharashtra:टायटल: चंद्रपूरात अन्नत्याग सत्याग्रहावर बसलेले राज्यातील पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांना पोलिसांनी ताब्यात घेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. अँकर: अन्नत्याग सत्याग्रहावरोर बसलेले राज्यातील पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. गेल्या पाच दिवसांपासून बंडू धोत्रे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह सुरू होता. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या प्रस्तावित लोहारडोंगरी लोह खाणीची मान्यता रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी बंडू धोत्रेंचं अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू होते. जिल्ह्यातील विविध पर्यावरण विषयक संघटना, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या उपोषण मंडपाला भेट देत या अन्नत्याग सत्याग्रहाला आपला पाठिंबा देत होते. या आंदोलनाला वाढता पाठिंबा लक्षात घेता पोलिसांनी बंडू धोत्रे यांना वैद्यकीय कारणामुळे ताब्यात घेत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असे म्हटलं जाते. पोलिसांनी जबरदस्ती ताब्यात घेतल्या बाबत बंडू धोत्रे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. माझी तब्येत ठीक असल्याचा दावा देखील बंडू धोत्रे यांनी केला.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 10, 2026 03:30:37
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 10, 2026 03:02:15
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 10, 2026 03:01:06
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 10, 2026 03:00:51
Nasik, Maharashtra:माहेरून दोन कोटी रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा १५ वर्षांपासून छळ सुरू असल्याप्रकरणी तक्रार इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली २०११ मध्ये इंदिरानगरमधील एका युवकासोबत विवाह झाला होता. ती सासरी नांदत असताना युवकासोबत तिचा विवाह झाला पती, सासू, सासरे, चुलतसासू, चुलतसासरे, दीर व दोन नणंदा हे सर्व जण घरगुती कारणावरूनकुरापत काढून पीडितेला वेळोवेळी मारहाण करून शिवीगाळ करीत होते. तिने माहेरून दोन कोटी रुपये आणावेत म्हणून सासरच्या सर्वांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. पीडित विवाहितेला लग्नात मिळालेले स्त्रीधनदेखील सासरच्यांनी ठेवून घेत त्याचा अपहार केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 10, 2026 02:50:30
Kolhapur, Maharashtra:Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर बेपत्ता प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी अखेर एस आय टी ची स्थापना केली आहे. महेश पिळणकर हे गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता आहेत. ज्या पाटगाव परिसरात पिळणकर यांची दुचाकी सापडली त्याच पाटगाव मधील जंगलात राख आणि शरीराचे काही अवशेष पोलिसांना सापडले होते. कोल्हापूर पोलिसांनी इराक आणि शरीराचे काही अवशेष तपासासाठी पाठवले होते पण त्याचा अहवाल अस्पष्ट आला. तो पुनर् तपासणीसाठी पुणे किंवा मुंबईतील फॉरेन्सिक लॅब कडे पाठवावे आणि त्यााचबरोबर पिळणकर यांच्या शोधासाठी SIT ची स्थापना करावी अशी मागणी पिळणकर यांच्या कुटुंबीयांसह लोकशाही व संविधान हक्क संरक्षण समितीच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक योगेश्वर गुप्ता यांनी पिळणकार यांच्या शोधासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 10, 2026 02:46:52
Akola, Maharashtra:शेतकरी बंधूंनो, कापूस विक्री करताना सावधगिरी बाळगा, कारण काही व्यापारी मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आसेगाव येथे असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. कापूस खरेदीदरम्यान मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न शेतकरीांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. मिळाल्या माहितीनुसार, एका व्यापाऱ्याने ट्रकमध्ये कापूस भरण्यापूर्वी ट्रकच्या खाली वाळू भरलेली पोती ठेवून ट्रकचे वजन केले. उदाहरणार्थ, ट्रकमध्ये १०० किलो वजनाची मातीची पिशवी ठेऊन वजन केल्यास काट्यावर १००० किलोची पावती घेतली जाते. त्यानंतर ती মाती काढून टाकली जाते आणि शेतकऱ्यांचा कापूस भरून पुन्हा वजन केले जाते. त्यामुळे आधीच्या वजनात झालेल्या फरकामुळे व्यापाऱ्याला अधिक कापूस मिळतो आणि शेतकऱ्यांची फसवणूक होते. मात्र शेतकरी संदीप धोंडे आणि गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गावकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याला जाब विचारला. मात्र परिस्थिती पाहून व्यापारी आणि ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाले.या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 10, 2026 02:46:24
Junnar, Pune, Maharashtra:युद्धाचा फटका साखर उद्योगाला ही बसला असून आखाती देशातील साखर निर्णात ठप्प झाल्याने साखरेचे बाजारभाव किलोमागे चार ते पाच रुपयांनी गडगडलेत तर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणी ही घटली असून साखरेला उठाव नाही तर दुसरीकडे यावर्षी साखर कारखान्यांना ऊस गाळपा साठी कमी प्रमाणात आल्याने साखरेचे गाळप ही कमी झालंय तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे,सततच्या पावसामुळे ऊसाचं वजन घटल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय साखर कारखान्यांना ही रिकवरी हि कमी प्रमाणात मिळाल्याने साखरेचं आर्थिक गणितचं कोलमडलं असून साखर उद्योग संकटात आल्याचं विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी म्हटलंय याच संदर्भात त्यांच्या शी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 10, 2026 02:15:41
Bhandara, Maharashtra:१४२ जणांचे वेतन अडचणीत.... १८१ पैकी ३९ कर्मचाऱ्यांचे दिव्यांग पडताळणी अहवाल भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागातील १८१ दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी अद्याप १४२ जणांचे दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी अहवाल शिक्षण विभागाकडे अद्याप प्राप्त झालेले नाही. ८ मार्चपर्यंत केवळ ३९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी ३० दिवसांत दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिव्यांगत्वाचा अहवाल सादर न केल्यास मार्च महिन्याचे वेतन काढण्यात येणार नाही, असे पत्र २४ फेब्रुवारी २०२६ रोजी काढले होते. त्यामुळे मुदतीत प्रमाणपत्र सादर न झाल्यास १४२ कर्मचाऱ्यांचे वेतन अडचणीत येण्याची शक्यता आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील, तसेच राज्यातील सर्व विभागांतील दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्यास सांगितले. त्यानुसार संबंधित विभाग प्रमुखांनी पत्र काढून त्यांच्या अधिनस्थ दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रमाणपत्राची शल्य चिकित्सकांकडून पडताळणी करून अहवाल सादर करण्यास कळविले होते. परंतु, अद्यापही या आदेशाकडे दुर्लक्ष होत आहे. रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी
0
comment0
Report
Advertisement
Back to top