Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

येवला नगरपरिषद चुनाव: नामांकन के पहले दिन उमेदवारों की भीड़, तैयारी पूरी

SKSudarshan Khillare
Nov 10, 2025 10:10:06
Yeola, Maharashtra
येवला नगरपरिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा आज पहिला दिवस असून, सकाळपासूनच निवडणूक कार्यालय परिसरात इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे..नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केल्या असून, अर्ज दाखल प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Mar 17, 2026 08:22:46
Kalyan, Maharashtra:क्लस्टर योजनेविरोधात २७ गावांतील नागरिकांची केडीएमसी मुख्यालयावर धडक,परिपत्रक फाडत, जाळून केला निषेध व्यक्त,सर्व पक्षीय हक्क संरक्षण हक्क संघर्ष समिती आक्रमक, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील २७ गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या क्लस्टर योजने विरोधात स्थानिक भूमिपुत्रांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर २७ गाव सर्व पक्षीय संरक्षण हक्क संघर्ष समिती आणि येथील नागरिकांनी आज केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली. यावेळी या शासन निर्णयाची होळी करत आणि परिपत्रकाचे कागद फाडत निषेध व्यक्त केला. क्लस्टर योजना, ग्रोथ सेंटर आणि बुलेट ट्रेन बिझनेस हब यांसारख्या विविध योजनांमुळे २७ गावांतील स्थानिक नागरिक व भूमिपुत्रांवर परिणाम होत आहे. २७ गावांचा विकास नाही, सुविधा नाही तर मग मालमत्ता कराची सक्ती चालणार नाही अशी भूमिका यावेळी या नागरिकांनी घेतली. यावेळी मोर्चेकर्यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकत लवकरच केडीएमसी महापौर, आयुक्त, २७ गावांतील लोकप्रतिनिधी आणि संघर्ष समिती यांची संयुक्त बैठक लावून याावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असल्याचे अध्यक्ष सुमित वझे यांनी सांगितले.
925
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 17, 2026 08:17:15
Bhandara, Maharashtra:कंत्राटी कामगारांचा डोंगरी बुजरुक माईन्स गेट समोर कामबंद आंदोलन.... मागच्या कंत्राटदारनी जे वेतन दिले त्याही पेक्षा वेतन कमी देण्याचे प्रयत्न सातत्याने कंत्राटदार करत आहेत , नियमानुसार जे वेतन मिळायला पाहिजे ते तर मिळतच नाही त्या उलट वेतन हे वेळेवर होत नाही ,त्याउलट कामगार आपल्या रास्त मागणीसाठी काही बोलायाला गेले तर त्यांना कामावरून काढून टाकण्यात येते त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जमात आत्यात. या सर्व समस्या वर कायम स्वरुपी मार्ग काढण्यासाठी प्रहार कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन डोंगरी माईन्सच्या मुख्य प्रवेशद्वार समोर सुरू आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे....
931
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 17, 2026 08:05:15
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरात काँग्रेसचे भाजप विरोधात आंदोलन सोलापुरातील कुंभारवेस परिसरात शहर काँग्रेस कमिटीकडून उपहासात्मक आंदोलन नरेंद्र मोदी यांच्या नाल्यातून गॅस बनविण्याच्या संकल्पनेवर टीका करत सुरूय गॅस आंदोलन नाल्यातून गॅस निर्मिती उपक्रमावर काँग्रेसकडून उपस्थिती करण्यात आले प्रश्नचिन्ह पंतप्रधानांच्या विरोधात जोरदार निदर्शन करत उपहासात्मक_reply-गटारीवर काँग्रेस करत आहे आंदोलन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विश्वगुरू संबोधत काँग्रेसची उपरोधक घोषणाबाजी थाळी वाजवणे, लाईट बंद करणे, १५ लाख खात्यात येथील अशी खोटी आश्वासन भाजपने दिल्याचा काँग्रेस कडून करण्यात आला आरोप काँग्रेसच्या गॅस आंदोलनावेळी सोलापूर शहर पोलिसांचा काढेकोट बंदोबस्त असल्याच पाहायला मिळाल..
1043
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 17, 2026 08:04:56
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर येथे बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी किंवा नोकरीच्या सवलती घेणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने निलंबित केला आहे. या 15 कर्मचाऱ्यांमध्ये बहुतेक कर्मचारी शिक्षण आणि आरोग्य विभागात नोकरी करतात. जिल्हा परिषदेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीत कार्यरत असताना सोपी कामे किंवा ऐच्छिक ठिकाणी बदली मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन या कर्मचाऱ्यांनी शासनाची फसवणूक केली आहे या कर्मचाऱ्यांची चौकशी करून शासनाचा घेतलेल्या लाभाची वसुली केली जाणार आहे तर यातील कर्मचारी तसेच ज्यांनी नोकरी मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेतला आहे त्यांची देखील विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचं जिल्हा परिषदेशे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सांगितला आहे
907
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 17, 2026 08:01:01
Buldhana, Maharashtra: बुलढाणा जास्त हिरो बनतोस ! आम्हाला सर म्हणत नाहीस ! रिस्पेक्ट देत नाहीस म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड शेगावच्या अभियांत्रिकी कॉलेज मधील धक्कादायक प्रकार तिने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अटक शेगावमध्ये इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर केवळ 'हिरोगिरी करतो' आणि 'सन्मान दिला नाही' या क्षुल्लक कारणावरून लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. प्रिन्स वाजगे असं या पीडित विद्यार्थ्याचं नाव असून, केवळ वर्चस्व गाजवण्याच्या उद्देशाने त्याला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ही घटना शेगावमधील काशीलानी पेट्रोल पंपा समोरील एका खाद्यपदार्थाच्या गाडीवर घडली. प्रिन्स वाजगे हा विद्यार्थी तिथे असताना, ओम टाले, गौरव हळदे आणि सुमित चव्हाण या तिघांनी त्याला गाठले. "तू कॉलेजमध्ये आम्हाला रिस्पेक्ट देत नाही, जास्त हिरो बनतोस, आम्हाला 'सर' का म्हणत नाही?" असे म्हणत त्यांनी वादाला सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, या तिघांनी थेट लोखंडी रॉडने प्रिन्सच्या डोक्यावर या हल्ल्यात प्रिन्स गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून २ टाके पडले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने हालचाली करत ओम टाले, गौरव हळदे आणि सुमित चव्हाण या तिघांना अटक केली आहे.
1055
comment0
Report
SKShubham Koli
Mar 17, 2026 07:53:21
1069
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 17, 2026 07:19:50
Yavatmal, Maharashtra:शॉट्स - मृताचा फोटो, खुनाचे घटनास्थळ, अटक आरोपी आणि पोलीस. यवतमाळच्या लासीना वाघापूर येथे युवकाच्या खून प्रकरणात लाडखेड पोलिसांनी मारेकरी पती-पत्नीला अटक केली आहे. आतिश देशमुख याच्या डोळ्यात तिखट टाकून त्याची चाकूने हत्या करण्यात आली होती, पोलिसांनी आतिश चे कॉल रेकॉर्डिंग तपासून अंकुश व रुपाली खोडे या दांपत्याला अटक केली. मृत आतीश चे रूपाली सोबत लग्नापूर्वी प्रेम संबंध होते, लग्नानंतर तिने हे संबंध तोडल्याने आतिश तिला त्रास देत होता, तिच्यावर अनैतिक संबंधासाठी दबाव निर्माण करीत होता. याबात वारंवार समजूत काढूनही आतिश ऐकत नसल्याने त्याचा परिणाम मुलांवर होऊ शकतो या धोक्यातून रूपाली व तिचा पती अंकुश याने आतिश चा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
1089
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 17, 2026 07:19:05
Pandharpur, Maharashtra:चैत्र वारी तोंडावर असताना पंढरपुरात हॉटेल चालकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेनात, चैत्र वारीत भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. इथे आलेला भाविक चहा, नाष्टा आणि जेवणासाठी हॉटेल मध्ये जातो. पंढरपूर मध्ये मंदिर परिसरात अशी भाविकांच्या गर्दीवर चालणारी 50 हॉटेल्स आहेत. मागील काही दिवसापासून या हॉटेल चालकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाही. त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र थांबा और वाट पाहा एवढंच सरकारी उत्तर त्यांना मिळाले आहे. चार प्रमुख यात्रा मधील चैत्र यात्रा दहा दिवसावर आली आहे. तरीही हॉटेल व्यवसायिकांना गॅस सिलेंडर मिळाले नाहीत. जर चैत्र वारीसाठी आलेल्या भाविकांना या हॉटेल मधून सुविधा देता येणार नाही. गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येईल. त्यामुळे प्रशासनाने सकारात्मक विचार करून व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. -- श्रीराम गणपुले, हॉटेल चालक -- अमोल गंगाखेडकर, हॉटेल चालक
1076
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 17, 2026 06:48:46
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... स्किप्ट ::- लातूर जिल्हा परिषदेत महायुतीचा संगीत खुर्ची फॉर्म्युला चर्चेत.... अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांवर सव्वा वर्षांनी फेरबदलाचा  महायुतीचा फार्मूला.... सत्तेसाठी रचलेला डाव काँग्रेसचा गंभीर आरोप....एकाच कार्यकाळात अनेक पदाधिकारी… जिल्हा परिषदेत संगीत खुर्चीचा खेळ ?... लातूर जिल्हा परिषदेत महायुतीचा झेंडा फडकला असून भाजपच्या उषाताई संभाजी पाटील यांची अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दयानंद दामोदर सुरवसे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र या निवडीपेक्षा जास्त चर्चा रंगली आहे ती महायुतीच्या संगीत खुर्चीच्या फॉर्म्युल्याची… सव्वा वर्षानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय महायुतीने घेतल्याने एकाच कार्यकाळात अनेक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झालेले दिसून येणार आहेत. यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे संविधानिक पद आहे हे संगीत खुर्ची नाही. हा फक्त सत्तेसाठी रचलेला डाव असल्याचा गंभीर आरोप केलाय....
1079
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 17, 2026 06:36:06
Jalna, Maharashtra:जालना : ब्रेकिंग | गैस के गोडाऊनमधून 110 सिलेंडर चोरीला अज्ञात चोरट्यांनी लंपास केले गॅस सिलेंडर रामनगरच्या आनंद भारत गॅस गोडाऊन मधील घटना मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अँकर : गैस के गोडाऊन मधून अज्ञात चोरट्यांनी भरलेले ११० गॅस सिलिंडर लंपास केल्याची घटना जालन्यातील रामनगर येथे घडली आहे. त्यात १४ किलो वजनाचे ९६, तर ५ किलो वजनाचे २ आणि १९ किलो वजनाच्या १२ सिलिंडर आहेत. ही घटना जालना तालुक्यातील रामनगर परिसरातील आनंद भारत गॅस गोडाऊनमध्ये १४ ते १६ मार्च रोजी रात्रीच्या sुमारास घडली आहे. याप्रकरणी मौजपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चोरट्यांनी गोडाऊनचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. ४ लाख ५१ हजार ५४३ रुपये इतक्या किंमतीचे सिलिंडर चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात सिद्धार्थ आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गोडाऊनमधून यापूर्वीही गॅस सिलिंडर चोरीला गेल्याच्या घटना घडलेल्या आहे. सध्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर टंचाई निर्माण झाली असून, या काळातच चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात तपासाला वेग दिलाय.
1031
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 17, 2026 06:34:02
Nashik, Maharashtra:डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणी आरोपी अद्यापही फरार... डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येच्या ठिकाणी आढळल्या दोन वापरलेल्या सिरिंज अन् एक चाकू... डॉ.मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येनंतर PM रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा कुटुंबाने केला होता आरोप... संशयित आरोपी डॉ. निलेश जेजुरकर अद्याप फरार, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह... नाशिक मधल्या गंगापूर रोड येथील डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी डॉ. निलेश जेजुरकर हे अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. मात्र फिर्यादी यांच्या वकिलांकडून मनीषा जेजुरकर च्या ठिकाणी मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या त्या ठिकाणी वापरलेले सिरिंज आणि एक चाकू आढळून आल्याच सांगितले आहे. डॉ. मनीषा यांचे पती डॉ.निलेश जेजुरकर हे घरात असताना मनीषा यांनी आत्महत्या केलीच कशी असा सवाल देखील उपस्थित केला. या प्रकरणात फरार असलेले आरोपींना जामीन मंजूर देऊ नये तसेच पोलिसांकडून देखील जो तपास सुरू आहे त्यावर आम्हाला संशय असल्याचं फिर्यादी यांचे वकील ॲड. जयदीप वैशपायन यांनी म्हटले आहे. डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबाकडून देखील अनेक आरोप करण्यात आले होते या संदर्भात पोलिसांकडून अद्याप कोणताही तपासांती ठोस पुरावा मिळालेला नाही. आरोपी फरार असून देखील पोलिसांकडून नेमका काय तपास सुरू आहे यावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यामुळे डॉक्टर जेजुरकर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी डॉ निलेश जेजुरकर यांना अटक कधी होणार हे बघणं देखील आता महत्त्वाचा असणार आहे.
1061
comment0
Report
Advertisement
Back to top