Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Buldhana443001

पार्थ पवार पर भ्रष्टाचार आरोप: महाराष्ट्र की राजनीति में नया हंगामा

MNMAYUR NIKAM
Nov 10, 2025 10:37:41
Buldhana, Maharashtra
बुलढाणा हर्षवर्धन सपकाळ बाईट्स . ऑन विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस स्वबळावर लढणार . अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची इच्छा आहे .. त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली आहे . अद्याप मुंबई महा पालिकेची निवडणुका लागल्या नाही . एकदा घोषणा झाली की पक्ष त्यावर निर्णय घेईन . ऑन पार्थ पवार जमीन घोटाळा . पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न आहे . अजित पवार ने तत्काळ राजीनामा द्यायला पाहिजे . देवेंद्र फडणवीस पॅटन सुरू आहे . चुकी करा , चुकी समोर आली की ठराव घ्या . व्यवहार रद्द करा .. सत्तेमध्ये दलाल सत्ता चालवत आहे . लोकप्रतिनिधी आणि कायद काम करत नाही . ऑन नाशिक निवडणूक काँग्रेस आणि मनसे सोबत .. यासंदर्भात कुठलीही चर्चा नाही . त्या बैठकीला काँग्रेसचा कुणी प्रतिनिधी गेला असेल तर साफ चूक आहे . कोणताही प्रतिनिधी पक्षाने पाठवला नाही . जो गेला तो कोणत्या उद्देशाने गेला माहिती नाही . जो गेला त्याला पक्षाचे वतीने नोटीस दिली असून त्या संदर्भात खुलासा मागितला आहे . ऑन मनसे युती प्रस्ताव आला तर . इंडिया अलायन्स राष्ट्रीय स्तर वर आहे .. ते बसून यावर निर्णह घेईल . ऑन बावनकुळे . आता त्यांच्या जवळ काही नाही . पार्थ पवार सारखे प्रकरणे त्याचा अधिमस्त विभाग झाले आहेत ज्यात दोन मोठे भ्रष्टाचार झाले आहेत. . एक जैन बोर्डिंग आणि दुसरा पार्थ पवार यांचा .. या घोटाळाकडे तुम्ही पाहा, आम्ही आमचे ते बघून घेऊ .. स्वतः ला जवळ बोलण्यासारखे काहीच नाही . त्यांचे वक्तव्य त्यांचे फर्स्टेशन मधून आलेले असावे .. ऑन प्रितम कदम , बच्चू कडू यांचे गाडीवर हल्ला करणाऱ्या ला 3 लाख बक्षीस .. दुर्दैवाने महाराष्ट्राला अराजकतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे . कायद्यानुसार संविधान नुसार त्यांनी कारभार करावा . मात्र ही सगळे गुंडाळून स्वतःचे चांगभलं करण्यात आणि जनतेचे प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे . अशी वक्तव्य करून देशाला अराजकतिकडे घेऊन जात आहे. आमची विनंती आहे की शांतता हवी आहे . संविधान आमच्यासाठी सर्वोतोपरी आहे . फाजील विषयासाठी काम करू नये . ऑन नागपूर अधिवेशन .. मुद्दे अनेक असून त्यांना धरून आमची तयारी झालीय . जमीन घोटाळ्याची श्वेत पत्रिका जाहीर करावी अशी मागणी आहे . त्यासाठी एक दिवस राखून ठेवावा ही सिद्ध आमची मागणी आहे . या सरकारला गेंड्याचे कातडीचे सरकार म्हणता होतो, मूक बहिरे आणि आंधळे म्हणत होतो . मात्र हे सरकार त्या पलिकडे गेले आहे . बेशरम सरकार आहे .
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Mar 10, 2026 07:51:33
Jalna, Maharashtra:जालना | ब्रेकिंग | इराण आणि अमेरिका-इस्त्रायल देशांच्या युद्धाचा जालना स्टील उद्योगावर परिणाम झाला असं दिसून येतंय. गल्फ देशांमधून आयात होणारे स्क्रॅब थांबले, स्टील 3000 हजार रुपयांनी महागले. कोळशाच्याही भाव वाढीवर झाला परिणाम. अँकर- इराण आणि अमेरिका इस्त्रायल देशांच्या युद्धामुळे जालना स्टील उद्योगावर परिणाम झाल्याचं बघायला मिळालंय.. गल्फ देशांमधून भारतात स्क्रॅब आयात केलं जातं.. युद्धामुळे ते सध्या थांबलेलं आहे. त्याचबरोबर कोळशाचे भावही वाढल्यामुळं स्टील 3000 हजार रुपयांनी महागलं आहे.. त्यामुळं या युद्धाची झळ सर्वसामान्याला आता बसू लागली आहे. बाईट- घनश्याम गोयल,चेअरमन, कालिक स्टील इंडस्ट्रीज,जालना
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 10, 2026 07:32:09
Baramati, Maharashtra:इंदापूरमध्ये शासकीय कारवाईदरम्यान तहसीलदार जीवन बनसोडे यांना मारहाण... तहसीलदारांना मारहाण झाल्याची इंदापूर पोलिसात तक्रार दाखल.... मारहाण करणाऱ्या व्यक्ती विरोधात इंदापूर पोलिसात गुन्हा.....घटनेच्या निषेधार्थ महसूल मधील कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन Anchor_ पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरात शासकीय कारवाईदरम्यान तहसीलदारांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. तशा आशयाची तक्रार इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिसात दाखल करण्यात आली आहे..वरकुटे खुर्द येथील संतोष रामदास मोरे याने शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोपी तहसीलदार जीवन बनसोडे यांनी तक्रारीद्वारे केला आहे. निमगाव केतकी ते पिटकेश्वर रोडवर मुरूम वाहतूक करणाऱ्या टिपरची तपासणी सुरू असताना संतोष मोरे तेथे आला. त्याने शासकीय वाहनासमोर मोटारसायकल आडवी लावून कारवाईत अडथळा निर्माण केला. यावेळी संतोष मोरे याने शिवीगाळ करत तहसीलदार जीवन बनसोडे यांचा शर्ट धरून मारहाण केली.शिवाय या प्रकरणात दहा हजार रुपयांची मागणी केली अशा आशयाची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करीत या घटनेचा निषेध नोंदवला आहे यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या घटना इंदापूर मध्ये घडलेल्या आहेत.तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरती 24 मे 2024 रोजी असाच एक हल्ला झाला होता.त्यात पाटील यांना मारहाण झाली होती.त्यानंतर आता तहसीलदार जीवन बनसुडे यांना देखील मारहाण झाली आहे. तहसीलदार बनसुडे यांनी मोरे याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, मोरे याने शिवीगाळ करत ''इंदापूरमध्ये नोकरी कशी करता ते पाहतो'' अशी धमकी दिली. त्याने तहसीलदारांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. तसेच १० हजार रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 10, 2026 06:20:06
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटके व दारूगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत 1 मार्च रोजी झालेल्या स्फोटातील आणखी एका जखमी महिला कामगाराचा मृत्यू झाला आहे.. सोमवारी 27 वर्षीय महिला कामगार सीमा धुर्वे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे... स्फोटात त्या सुमारे 70 % भाजल्या होत्या. त्यांच्यावर ऑरेंज सिटी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू होते; मात्र सोमवारी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या 23 वर पोहोचली आहे. दरम्यान, ऑरेंज सिटी रुग्णालयात 12 जखमी कामगार अद्यापही मृत्यूशी झुंज देत आहेत.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 10, 2026 06:17:24
Kolhapur, Maharashtra:इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधन तंचाईची भीती व्यक्त केली जात असताना कोल्हापुरातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. घरगुती गॅस सिलेंडर भडकण्याची किंवा पुरवठा कमी होण्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर शहरातील राजारामपुरी इथे असणाऱ्या गॅस एजन्सी समोर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी एजन्सीच्या दारात लांबच लांब रांगा लावल्या. आपल्याला वेळेत गॅस मिळावा यासाठी अनेक जण सिलेंडर घेण्यासाठी घाई करताना दिसले. गॅस एजन्सीच्या दारातून याचा आढावा घेऊन नागरिकांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 10, 2026 05:49:39
Gadchiroli, Maharashtra:टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीच्या बोमनवार महाविद्यालयात चॅट जीपीटी च्या माध्यमातून 12 वी परीक्षेत कॉपी प्रकरणी 4 जणांचे निलंबन अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षा केंद्रावरील ढिसाळ कारभार आणि कॅापीचा प्रकार आढळल्याने तीन शिक्षक आणि एका शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. चामोर्शी येथील जा.कृ.बोमनवार विद्यालय या केंद्रावर हा प्रकार घडला. बारावीच्या राज्यशास्राच्या पेपरदरम्यान चॅट जीपीटीवरून उत्तरे शोधून सामूहिक कॅापी करण्याचा प्रयत्न झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीच्या अहवालावरून संबंधित चार लोकांवर गुन्हा दाखल करत त्यांनाही निलंबित करण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला. प्रश्नपत्रिका वर्गात येताच ती वर्गात तैनात शिक्षकाच्या मदतीने बाहेर नेली जायची आणि नंतर चॅट जीपीटीच्या माध्यमातून उत्तरे शोधून वर्गात पुरविली जायची. या हायटेक कॉपीचा मात्र अखेर पर्दाफाश झालाय. बाईट १) नंदकुमार बोडसे , अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ पुण्याहून निलेश खरमरेसह आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 10, 2026 05:47:53
Shirdi, Maharashtra:Anc - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राहाता नगरपरिषदेच्या वतीने महिलांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तरुणी आणि महिलांनी विविध ऐतिहासिक, पौराणिक तसेच सांस्कृतिक व्यक्तिरेखांची अफलातून वेशभूषा साकारत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे एका महिला स्पर्धकाने थेट शालिनीताई विखे पाटील यांचीच वेशभूषा साकारत त्यांना सुखद धक्का दिला. वेशभुषा स्पर्धेत एकूण 23 महिलांनी सहभाग नोंदवला. विजेता महिलांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, काली माँ, भारत माता, गुजराती पारंपरिक पोशाख, जोधा-अकबर तसेच शकुंतला अशा विविध वेशभूषा साकारल्या. केवळ वेशभूषाच नव्हे तर त्यामागील सामाजिक संदेशही प्रभावीपणे मांडले.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 10, 2026 05:46:39
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्व सूचक नाका परिसरात संतापजनक घटना. चार पाच तरुणांनी आधी गतिमंद भावाला मारहाण केली. भावाला वाचवण्यासाठी बहिणीला भावासमोर मारहाण करत अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. मारहाणीचे व्हिडिओ काढून वायरल करण्याची धमकी. कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, दोघे ताब्यात, पोलीस तपास सुरू. कल्याण पूर्वेत एक धक्कादायक घटना: भाऊ बहिणीचा चार-पाच तरुणांनी पाठलाग केला; गतीमंद भावाला लाकडी दांडके रॉड ने मारण्यास सुरुवात केली; भावाला वाचवण्यास आलेली बहिणीला देखील मारहाण केली; भावासमोरच अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. आरडाओरड एकूण एक दुचाकीस्वार थांबला; त्याने या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र या तरुणांनी दुचाकीस्वारालाही मारहाण केली. पीडित मुलीने तसेच तिच्या भावाने “पोलिसांना फोन करा” असे सांगितले; तरीही धमकी देऊन मोबाईल घेऊन दिला. या प्रकरणाचा व्हिडिओ तयार केला गेलेला होता वायरल करण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला; दोन जण ताब्यात घेतले; बाकी तीन फरार. शेवटी पीडितांची तक्रार नोंदवली गेली आणि तपास सुरु होता.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 10, 2026 05:33:25
Nasik, Maharashtra:धुळीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात\n\nअँकर\nनाशिक शहरात गेल्या 5 दिवसांपूर्वी महासभेमध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि शहरात पडलेल्या खड्ड्यांच्या बाबतीत महासभा आयोजित करण्यात आली.... यावेळी शहरातील सगळ्याच नगरसेवकांनी शहरात पडलेल्या खड्ड्यांच्या बाबत अनेक प्रश्न विचारले... मात्र त्यानंतरही şehirात अनेक ठिकाणी खड्डे पाहायला मिळत असले तरी ज्या ठिकाणी खड्डे बुजवलेले आहेत... त्या ठिकाणी संपूर्ण रस्ता तयार न करता त्यावरती माती मुरूम टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे... अशा तयार केलेल्या रस्त्यामुळे रस्त्यावरची धूळ मोठ्या प्रमाणात हवेत पसरते ... यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांसह वाहनधारकांच्या नाका तोंडात ही धूळ जाऊन आरोग्यासाठी धोकादायक बनले आहे... अनेक वाहनधारकांना आपले आरोग्य डोक्यात घालून प्रवास करावा लागतोय.... यासंदर्भात त्र्यंबक रोड परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 10, 2026 05:20:29
Washim, Maharashtra:अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकमंडळ निवडणुकीला चांगलाच रंग चढू लागला आहे. २१ जागांसाठी तब्बल ८८ उमेदवार रिंगणात उतरल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. अर्ज छाननीनंतर दाखल झालेल्या ९४ अर्जांपैकी ८८ अर्ज वैध ठरले असून ६ अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष उमेदवारांच्या माघारीकडे लागले आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १८ मार्च असून त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी २९ मार्च रोजी मतदान होणार असून ३० मार्च रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. २१ जागांसाठी मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात असल्याने अनेक ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 10, 2026 04:47:25
Washim, Maharashtra:वाशिम : अँकर : शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध करत वाशिमच्या रिसोड येथील ४७ वर्षीय जमील नूर मोहम्मद यांनी तब्बल ३१ वर्षांनंतर पुन्हा परीक्षा केंद्रावर जाऊन दहावीची परीक्षा दिली. रिसोड येथील जमील नूर मोहम्मद यांनी १९९५ साली दहावीची परीक्षा दिली होती,मात्र त्यावेळी नापास झाल्यामुळे त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. मात्र शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा कायम असल्याने त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला आणि यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला.३१ वर्षांनंतर परीक्षा केंद्रावर पोहोचताना त्यांच्यात उत्साह आणि आत्मविश्वास दिसून आला. आपल्या मुलांच्या वयाच्या विद्यार्थ्यांसोबत परीक्षा देताना त्यांनी कोणताही संकोच न बाळगता पेपर दिला. त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले असून “शिकण्याला वय नसते” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी समाजाला दिला आहे. बाईट:जमील नूर मोहम्मद, परीक्षार्थी
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 10, 2026 04:32:45
0
comment0
Report
Advertisement
Back to top