Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005

करवीर में अंबाबाई की नगरप्रदक्षिणा में भक्तों का उत्साह, रोशनी से सजगा मार्ग

PNPratap Naik1
Oct 01, 2025 01:31:37
Kolhapur, Maharashtra
हजारो भाविकांच्या उपस्थितीत करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा पार पडला. अंबा माता की जय चा अखंड जयघोष करत भक्त या नगरप्रदक्षिणा सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलीस बँड, आकर्षक विद्युत रोषणाई, आणि अंबाबाई देवीचा जयजयकार करत नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. दरम्यान भक्तांनी नगरप्रदक्षिणामार्गावर आकर्षक रांगोळी काढली होती. नवरात्री उत्सवाच्या अष्टमीला आई अंबाबाई भक्तांना दर्शन देण्यासाठी स्वतः मंदिराबाहेर पडते. त्यामुळे करवीरकर रस्त्यावर फुलांची आरास करत देवीचे स्वागत करतात.. हाच उत्साह यावर्षी देखील सर्व भक्तांचा पाहायला मिळाला..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Oct 01, 2025 02:47:38
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 01, 2025 02:47:26
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील सांगोळा गाव. अकोला शहरापासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव 'रावणाचं गाव' म्हणून ओळखलं जातं. जवळपास 300 वर्षांपूर्वी येथे काळ्या पाषाणातील दहा तोंडी रावणाची भव्य मूर्ती स्थापित करण्यात आली. हातात तलवार आणि इतर शस्त्र घेऊन युद्ध पेहरावात उभी असलेली ही मूर्ती आजही गावांचं वैशिष्ट्य आहे. मूर्ती इथपर्यंत कशी आली याचा ठोस इतिहास नसला तरी गावात आख्यायिका मात्र प्रचलित आहे. मूळतः ग्रामदैवतासाठी मूर्ती घडवली गेली होती, पण चुकून रावणाची मूर्ती घडली, ती गावाच्या हद्दीत येण्यापूर्वीच बैल थांबले आणि वेशीवरच नारळ फोड़ून मूर्तीची स्थापना करण्यात आली. आजही गावातील पुजारी दररोज या रावणाची पूजा करतात, तर दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण गाव एकत्र येऊन रावणाची विधिवत पूजा करतो. गावकऱ्यांच्या मते, महादेवाचा भक्त असलेला रावण पूर्णपणे दृष्ट नव्हता. त्यांच्या पूर्वजांनी सांगितलेली परंपरा ते आजही जपत आहेत. याच श्रद्धेने सांगोळ्यात दरवर्षी विजयादशमीला रावणाची पूजा होते. जरी रावणाच्या मंदिराची उभारणी झाली नसली तरी गावकरी येथे सभा मंडप उभारण्याचा विचार करत आहेत. तर दहन रावणाच्या वाईट विचाराचे करावे रावणाचा नाही असं मत ही गावकरी मांडतात. Final VO : रावण चांगला होता की वाईट, हे सांगणं पुराणांचं काम आहे. मात्र अकोल्याच्या सांगोळा गावकऱ्यांची रावणाविषयीची श्रद्धा नक्कीच वेगळा विचार करायला भाग पाडते. जयेश जगड, झी मीडिया, अकोला
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 01, 2025 02:46:52
Akola, Maharashtra:Anchor : असं म्हणतात विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय. याच दिवशी प्रभु रामाने रावणाचा वध करून धर्माचा विजय मिळवला. देशभर हा दिवस दसरा म्हणून रावणरुपी पुतळ्याचं दहन करून साजरा केला जातो. पण अकोल्याच्या सांगोळा गावात मात्र याला अपवाद दिसतो.येथे या दिवशी रावणाची पूजा केली जाते. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील सांगोळा गाव. अकोला शहरापासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव "रावणाचं गाव" म्हणून ओळखलं जातं. जवळपास 300 वर्षांपूर्वी येथे काळ्या पाषाणातील दहा तोंडी रावणाची भव्य मूर्ती स्थापित करण्यात आली. हातात तलवार आणि इतर शस्त्र घेऊन युद्ध पेहरावात उभी असलेली ही मूर्ती आजही गावाचं वैशिष्ट्य आहे. मूर्ती इथपर्यंत कशी आली याचा ठोस इतिहास नसला तरी गावात आख्यायिका मात्र प्रचलित आहे. मूळतः ग्रामदैवतासाठी मूर्ती घडवली जात होती, पण चुकून रावणाची मूर्ती घडली , ती गावाच्या हद्दीत येण्यापूर्वीच बैल थांबले आणि वेशीवरच नारळ फोडून मूर्तीची स्थापना करण्यात आली. आजही गावातील पुजारी दररोज या रावणाची पूजा करतात, तर दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण गाव एकत्र येऊन रावणाची विधिवत पूजा करतो. गावकऱ्यांच्या मते, महादेवाचा भक्त असलेला रावण पूर्णपणे दृष्ट नव्हता. त्यांच्या पूर्वजांनी सांगितलेली परंपरा ते आजही जपत आहेत. याच श्रद्धेने सांगोळ्यात दरवर्षी विजयादशमीला रावणाची पूजा होते.जरी रावणाच्या मंदिराची उभारणी झाली नसली तरी गावकरी येथे सभा मंडप उभारण्याचा विचार करत आहेत.तर दहन रावणाच्या वाईट विचाराचे करावे रावणाचा नाही असं मत ही गावकरी मांडतात. Final VO : रावण चांगला होता की वाईट, हे सांगणं पुराणांचं काम आहे. मात्र अकोल्याच्या सांगोळा गावकऱ्यांची रावणाविषयीची श्रद्धा नक्कीच वेगळा विचार करायला भाग पाडते.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 01, 2025 02:46:36
Pandharpur, Maharashtra:जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा असे संत Namdev यांनी त्यांच्या अभंगात लिहून ठेवले आहे. आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नव्याने श्री विठ्ठल अभिषेक साठी चंद्रभागेच्या पाण्या ऐवजी थेट गंगेचे पाणी आणल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी अभिषेक साठी पूर्वापार चंद्रभागा नदीतून पाणी आणले जायचे त्यासाठी काही सेवेकरी सुद्धा होते. पण सध्या या मंदिर समितीने चंद्रभागचे पाणी सोडून नवा पायंडा पाडत गंगेच पाणी आणले आहे. यावर महर्षी वाल्मीक संघाने आक्षेप घेतला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मनमानी कारभार करत आहे. जर हा प्रकार थांबला नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 01, 2025 02:33:14
Pune, Maharashtra:मावळ तालुक्यातील प्राचीन आणि पवित्र कार्ला एकविरा गडावर आज शारदीय नवरात्रातील नवमी निमित्ताने पहाटे ५ वाजता मोठ्या भक्तिभावाने महानवमी होम हवन पार पडले. गडावर सकाळपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. या वेळी मावळचे प्रथम नागरिक, आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करण्यात आली. पारंपरिक वेदमंत्रोच्चार, अग्निहोत्र व धार्मिक विधींच्या गजरात वातावरण भारावून गेला. या पूजेचा मान दरवर्षीप्रमाणे वेहेरगाव-कार्ला ग्रामस्थांना लाभला. नवरात्राच्या या महोत्सवात एकविरा देवीच्या दर्शनासाठी लांबून भाविक आले होते. अगदी पहाटेच्या वेळीही ‘जय एकविरा देवी माता की जय’ च्या घोषणांनी संपूर्ण गड दुमदुमून गेला. कार्ला एकविरा गडावरील महानवमी होम हवन ही केवळ धार्मिक परंपरा नसून, श्रद्धा, संस्कृती आणि एकोप्याचं प्रतीक ठरत आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 01, 2025 01:31:23
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - आपण बोललो त्यावर ठाम, पण मला वाटले तुम्हाला भांड्यावर दत्तक घेतलंय - गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर पुन्हा वार... अँकर - जे बोललो त्यावर आपण ठाम आहे,अशी भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट करत जयंत पाटलांना पुन्हा त्याच विधानावरून खोचक शब्दात डिवचले आहे.पूर्वीच्या काळात दत्तक घेतलं जायचं,भांडे देऊन दत्तक घेत होते,तसे काय झालंय का ? असा मला वाटलं,पण त्यांनी गैरअर्थ काढल्याचा खोचक टोला पडळकरांनी जयंत पाटลांना लगावला आहे, जयंत पाटलांबाबत गोपीचंद पडळकर यांनी अर्वाच्या भाषेत विधान केलं होतं,त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले होते.पण आपण जे बोललो त्यावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे, सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी मध्ये पार पडलेल्या हिंदु बहुजन दसरा मेळाव्या प्रसंगी बोलत होते. साउंड बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार - भाजपा.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 01, 2025 01:30:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जयंत पाटील,मी तुमच्या कोणत्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र चोरलं सांगा ? आमदार गोपीचंद पडळकरांचा सवाल.. अँकर - जयंत पाटील मी तुमच्या कितव्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र चोरलं,हे सांगा ? असा खोचक सवाल आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना केला आहे, जयंत पाटलांनी एका कार्यक्रमात आपण मंगळसूत्र चोरांवर बोलत नसल्याची टीका काही महिन्यांपूर्वी केली होती,यावरून पडळकरांनी जयंत पाटलांवर निशाणा साधत थेट जयंत पाटलांवर ही घणाघाती टीका केली आहे,ते सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी मध्ये पार पडलेल्या हिंदु बहुजन दसरा मेळाव्या प्रसंगी बोलत होते. गोपीचंद पडळकर - आमदार, भाजपा. तसेच मला उचलण्याची भाषा केली जात आहे,गोप्या म्हंटलं जात आहे,पण जयंत पाटील व त्यांच्या कुत्र्यांना माझे चॅलेंज आहे,।तुम्ही जातीवंत पाटील असाल तर पत्रकार परिषद घेऊन तारीख,ठिकाण-वेळ जाहीर करा,मी त्या ठिकाणी येतो,असे खुले आव्हान देखील पडळकरांनी दिली आहे.तसेच मला गोप्या म्हणलं जातंय, मग मी जयंत पाटलांना जयंत्या म्हणू का ? अश्या शब्दात पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे. गोपीचंद पडळकर - आमदार, भाजपा. विधानभवनामध्ये घडलेल्या घटने प्रकरणी आपण काही चूक केलं नाही, विधानभवनाची अब्रु आपण वाचवली,कारण एका विधानसभेच्या आमदाराला वाकडं बोलण्याचे काम एक फडतूस आणि पुढाऱ्यांना बायका पुरवण्याचा धंदा करणारा माणूस करतोय,त्याच्या पाया पडायचे का ? अश्या शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांचे नाव न घेता टीका केली आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 01, 2025 01:30:25
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर कॅप नंबर पाच परिसरातील महादेव सेल्स या दुकानाच्या गोडाऊनला रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली , या आगीत गोडाऊन मधील चादरी, टॉवेल आणि कपडे जळून खाक झाले , अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या , अखेर अग्निशमन दलाच्या जवानाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात कपडे असल्याने आगीचा मोठा भडका उडाला होता, गोडाऊनच्या पहिल्या मजल्यावरील सर्व साहित्य जळून खाक झाला , मात्र आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्यामुळे आजूबाजूच्या दुकानांना झळ पोहचली नाही, परंतु ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकता नाही चंद्रशेखर भुयार, उल्हासनगर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 01, 2025 01:30:12
Akola, Maharashtra:अकोला जिलेतील बार्शीटाकळी परिसरात शेतकऱ्यांचा रोष उफाळला. अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी प्रशासनाकडून ठोस हालचाल न झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनीmurतिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर धडक मोर्चा काढला. जून ते सप्टेंबर या काळात सतत पडलेल्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला असून पंचनाम्यासाठी देखील कोणताही अधिकारी हजेरी लावत नसल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. शेतकऱ्यांनी आमदार पिंपळे यांच्या निवासस्थानासमोर जमले आणि घोषणाबाजी करत आंदोलन केले. निवेदन देण्याच्या कारणावरून आंदोलक व आमदार यांच्यात काही काळ शाब्दिक वाद झाला. परिस्थिती तणावग्रस्त होताच पोलिसांनी जमाव शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर आमदार हरिश पिंपळे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत निवेदन स्वीकारले. यानंतर आंदोलक शांत झाले. मात्र शेतकऱ्यांनी शासनाने त्वरीत मदत जाहीर करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आणि अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 30, 2025 17:30:25
Nagpur, Maharashtra:अनिल देशमुख यांच्यावर विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात 18 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या कथित हल्ल्याची घटना पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात खोटी निघाली आहे. त्यामुळे नागपूर ग्रामीण पोलिसांनी या संदर्भात न्यायालयात "बी फायनल रिपोर्ट" पाठवल्याची खात्रीलायक माहिती आहे. पोलिसांनी त्यांच्या बी फायनल रिपोर्ट मध्ये असे अनेक तर्क दिले आहे ज्यावरून हल्ल्याची ही घटना खोटी असल्याचा पोलिसांचा दावा मजबूत होत आहे. १) अनिल देशमुख यांच्या फोर्ड एंडेवर कारचा समोरचा काच re-inforce तंत्राचा होता.. त्यामुळे समोरून दगड मारल्यावर तो तडकला असता, मात्र तुटला नसता... दगडांची वारंवार प्रहार केल्यानंतरच तो तुटला असता... मात्र अनिल देशमुख यांच्या कारचा समोरील काच तडकला ही नव्हता तसेच तुटला ही नव्हता... २) अनिल देशमुख यांना झालेल्या जखमेचा mis match - साधारणपणे काच तुटल्यावर काचेचे टोकदार तुकडे कारचालकाच्या बाजूला बसलेल्या देशमुख यांना लागले असते, तर त्यांना त्या पद्धतीचे घाव झाले असते, मात्र अनिल देशमुख यांच्या डोक्यावर झालेली जखम त्या स्वरूपाची आढळलेली नाही... ३) अनिल देशमुख यांच्या कार मध्ये आढळलेला मोठा दगड मागच्या खिडकीतून आत मध्ये आल्याचे सांगण्यात आले होते.. फॉरेन्सिक तपासात मागील खिडकीतून आत मध्ये आलेला दगड समोरच्या सीटवर बसलेल्या अनिल देशमुख यांना डोक्याच्या समोरील बाजूला लागणे अशक्य असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहे... त्यामुळे पोलिसांनी या फॉरेन्सिक आणि वैज्ञानिक तपासनंतर आढळलेल्या विसंगती तसेच मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर हल्ल्याच्या या घटनेला खोटं सांगत न्यायालयात बी फायनल रिपोर्ट पाठवल्याची माहिती आहे.. आता पोलिसांच्या या बी फायनल रिपोर्ट नंतर राजकीय भूकंप येण्याची शक्यता नाकारता येत नाही.. 18 नोव्हेंबर 2024 म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी संध्याकाळच्या सुमारास अनिल देशमुख यांच्यावर नरखेड - काटोल मार्गावर बैल फाटा जवळ झुडपांमध्ये लपलेल्या चार जणांनी गाडीवर दगडफेक करत हल्ला चढवल्याची तक्रार करण्यात आली होती.. तेव्हा अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इतर कार्यकर्त्यांनी काटोल मधून भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदार चरणसिंह ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्या संदर्भातला आरोप केला होता...
1
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 30, 2025 16:22:21
Raigad, Maharashtra:शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा सुनील तटकरे यांच्यावर घणाघात. तटकरे कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करतात. भरत गोगावले यांच्या मातोश्रींचे नाव बदलायला लावून तटकरे यांनी नियत दाखवली. रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय. सुनील तटकरे कार्यकर्त्यांना ब्लॅक मेल असा घणाघात महेंद्र दळवी यांनी केलाय. माणगावमधील नेते राजीव साबळे यांच्या नर्सिंग कॉलेजला मंत्री भरत गोगावले यांच्या मातोश्रींचे नाव देण्यात आले होते परंतु राजीव साबळे यांना पक्षात घेऊन गोगावले यांच्या मातोश्रींचे नाव तटकरे यांनी काढायला लावले असा आरोप महेंद्र दळवी यांनी केलाय. यातून सुनील तटकरे यांनी आपली नियत दाखवली ही नालायक बुद्धी असून हे कुणालाही मान्य नाही असं महेंद्र दळवी म्हणाले.
11
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top