Back
बी फायनल रिपोर्ट से अनिल देशमुख पर हल्ला मामला झूठा सामने आया
AKAMAR KANE
Sept 30, 2025 17:30:25
Nagpur, Maharashtra
अनिल देशमुख यांच्यावर विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात 18 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या कथित हल्ल्याची घटना पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात खोटी निघाली आहे. त्यामुळे नागपूर ग्रामीण पोलिसांनी या संदर्भात न्यायालयात "बी फायनल रिपोर्ट" पाठवल्याची खात्रीलायक माहिती आहे. पोलिसांनी त्यांच्या बी फायनल रिपोर्ट मध्ये असे अनेक तर्क दिले आहे ज्यावरून हल्ल्याची ही घटना खोटी असल्याचा पोलिसांचा दावा मजबूत होत आहे. १) अनिल देशमुख यांच्या फोर्ड एंडेवर कारचा समोरचा काच re-inforce तंत्राचा होता.. त्यामुळे समोरून दगड मारल्यावर तो तडकला असता, मात्र तुटला नसता... दगडांची वारंवार प्रहार केल्यानंतरच तो तुटला असता... मात्र अनिल देशमुख यांच्या कारचा समोरील काच तडकला ही नव्हता तसेच तुटला ही नव्हता... २) अनिल देशमुख यांना झालेल्या जखमेचा mis match - साधारणपणे काच तुटल्यावर काचेचे टोकदार तुकडे कारचालकाच्या बाजूला बसलेल्या देशमुख यांना लागले असते, तर त्यांना त्या पद्धतीचे घाव झाले असते, मात्र अनिल देशमुख यांच्या डोक्यावर झालेली जखम त्या स्वरूपाची आढळलेली नाही... ३) अनिल देशमुख यांच्या कार मध्ये आढळलेला मोठा दगड मागच्या खिडकीतून आत मध्ये आल्याचे सांगण्यात आले होते.. फॉरेन्सिक तपासात मागील खिडकीतून आत मध्ये आलेला दगड समोरच्या सीटवर बसलेल्या अनिल देशमुख यांना डोक्याच्या समोरील बाजूला लागणे अशक्य असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहे... त्यामुळे पोलिसांनी या फॉरेन्सिक आणि वैज्ञानिक तपासनंतर आढळलेल्या विसंगती तसेच मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर हल्ल्याच्या या घटनेला खोटं सांगत न्यायालयात बी फायनल रिपोर्ट पाठवल्याची माहिती आहे.. आता पोलिसांच्या या बी फायनल रिपोर्ट नंतर राजकीय भूकंप येण्याची शक्यता नाकारता येत नाही.. 18 नोव्हेंबर 2024 म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी संध्याकाळच्या सुमारास अनिल देशमुख यांच्यावर नरखेड - काटोल मार्गावर बैल फाटा जवळ झुडपांमध्ये लपलेल्या चार जणांनी गाडीवर दगडफेक करत हल्ला चढवल्याची तक्रार करण्यात आली होती.. तेव्हा अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इतर कार्यकर्त्यांनी काटोल मधून भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदार चरणसिंह ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्या संदर्भातला आरोप केला होता...
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 30, 2025 18:30:130
Report
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 17:01:050
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 30, 2025 17:00:550
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 30, 2025 16:22:218
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 30, 2025 15:50:152
Report
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 15:49:385
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 30, 2025 15:45:180
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 30, 2025 15:37:192
Report
ABATISH BHOIR
FollowSept 30, 2025 14:30:391
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 30, 2025 13:51:322
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 30, 2025 13:48:481
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 30, 2025 13:48:371
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 30, 2025 13:32:160
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 30, 2025 13:00:435
Report