Back
अकोला बार्शीटाकळी में किसानों का रोष: मुआवजे की मांग पर प्रदर्शन
JJJAYESH JAGAD
Oct 01, 2025 01:30:12
Akola, Maharashtra
अकोला जिलेतील बार्शीटाकळी परिसरात शेतकऱ्यांचा रोष उफाळला. अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी प्रशासनाकडून ठोस हालचाल न झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनीmurतिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर धडक मोर्चा काढला. जून ते सप्टेंबर या काळात सतत पडलेल्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला असून पंचनाम्यासाठी देखील कोणताही अधिकारी हजेरी लावत नसल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. शेतकऱ्यांनी आमदार पिंपळे यांच्या निवासस्थानासमोर जमले आणि घोषणाबाजी करत आंदोलन केले. निवेदन देण्याच्या कारणावरून आंदोलक व आमदार यांच्यात काही काळ शाब्दिक वाद झाला. परिस्थिती तणावग्रस्त होताच पोलिसांनी जमाव शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर आमदार हरिश पिंपळे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत निवेदन स्वीकारले. यानंतर आंदोलक शांत झाले. मात्र शेतकऱ्यांनी शासनाने त्वरीत मदत जाहीर करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आणि अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowOct 01, 2025 02:47:380
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 01, 2025 02:47:260
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 01, 2025 02:46:520
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 01, 2025 02:46:360
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 01, 2025 02:33:140
Report
PNPratap Naik1
FollowOct 01, 2025 01:31:370
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 01, 2025 01:31:230
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 01, 2025 01:30:550
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 01, 2025 01:30:250
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 30, 2025 18:30:130
Report
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 17:30:251
Report
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 17:01:054
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 30, 2025 17:00:553
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 30, 2025 16:22:2111
Report