Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर में चंद्रभागा के बजाय गंगे के पानी से अभिषेक, विवाद शुरू

SKSACHIN KASABE
Oct 01, 2025 02:46:36
Pandharpur, Maharashtra
जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा असे संत Namdev यांनी त्यांच्या अभंगात लिहून ठेवले आहे. आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नव्याने श्री विठ्ठल अभिषेक साठी चंद्रभागेच्या पाण्या ऐवजी थेट गंगेचे पाणी आणल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी अभिषेक साठी पूर्वापार चंद्रभागा नदीतून पाणी आणले जायचे त्यासाठी काही सेवेकरी सुद्धा होते. पण सध्या या मंदिर समितीने चंद्रभागचे पाणी सोडून नवा पायंडा पाडत गंगेच पाणी आणले आहे. यावर महर्षी वाल्मीक संघाने आक्षेप घेतला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मनमानी कारभार करत आहे. जर हा प्रकार थांबला नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Oct 01, 2025 04:17:30
Nashik, Maharashtra:नाशिक शहरातील सातपूर, नाशिक रोड, गंगापूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील दहा सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांकरिता शहरासह जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकमधून गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टोळीप्रमुख अनिकेत ऊर्फ अंड्या शार्दूल हा मध्यवर्ती कारागृहात आहे. तसेच त्याचे उर्वरित संशयित आरोपी सराईत विजय खोटरे, कपिल गांगुर्डे, रोहित वाडगे, प्रतीक जाधव यांना दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले, असे उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले. तसेच नाशिक रोड, सातपूर भागातून संशयित आरोपी निखिल पवार, कृष्णा चव्हाण, आदित्य हंश, पीयुष दोंदे, विकास परदेशी आणि रहेमान शेख यांना तडीपार करण्यात आले आहे. शहरात वाटणाऱ्या गुन्हेगारीला अळा बसावा यासाठी हे कारवाई करण्यात आले असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आला आहे
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 01, 2025 04:16:59
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 01, 2025 04:01:43
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 01, 2025 04:01:22
Nashik, Maharashtra:हॉटेलमधून एमडी ड्रग्ज विक्रीचा डाव उधळला नाशिक शहर व परिसरात अमली पदार्थ खरेदी-विक्रीप्रकरणी 'झिरो टॉलरन्स' नुसार कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त यांनी दिलेत... यानुसार गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने गोपनीय माहितीच्याअधारे द्वारका येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका महिलेसह तिघांना रंगेहात अटक केलीये.... त्यांच्याकडून चार लाख पाच हजार रुपये किमतीची ड्रग्ज पावडर जप्त केलीये...अमली पदार्थाची चोरीछुपी खरेदी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त यांनी दिले आहेत. द्वारका परिसरातील हॉटेल स्वागत येथे संशयित आरोपी मुजफ्फर ऊर्फ मुज्जू शेख आणि त्याचे üç साथीदार आले. यावेळी साध्या वेशातील पोलिसांनी संशयित मुजफ्फर याच्यासह फरहान शेख, अनिल वर्मा, हिना जीवन कापसे यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ३० ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर आढळून आली. पोलिसांनी कारसह मोबाइल असा सुमारे १७ लाख १५ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा भद्रकाली पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय...
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 01, 2025 04:01:05
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 01, 2025 03:49:24
Bhandara, Maharashtra:खुर्शिपार येथील विद्यार्थ्यांचा पक्क्या रस्त्या अभावी चिखलातून प्रवास...शाळेपुढील रस्ता बनवून देण्याची मागणी. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील गटग्रामपंचायत न्याहारवानी-डोंगरगाव अंतर्गत येणाऱ्या खुर्शीपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोरचा रस्ता पूर्णतः चिखलमय झालेला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनाही त्या चिखलमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.या रस्त्यावर अनेकदा विद्यार्थी पडतात त्यामुळे शालेय गणवेश चिखलाने माखून जातो तर अनेकदा पडल्यामुळे विद्यार्थ्यांना दुखापती ही होतात त्यामुळे हा रस्ता शासनाने बनवून द्यावा अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 01, 2025 03:49:10
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Oct 01, 2025 03:48:21
Mumbai, Maharashtra:शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे आणि त्याचा अनुषंगाने मुंबईत वातावरण निर्मिती करण्यासाठी सर्वत्र शिवसेनेक धनुष्यबाण चिन्ह असलेला शिवसेनेचा भगवा झेंडा आणि बॅनर लावण्यात आले आहेत तसेच रस्त्याच्या दुतर्फा आणि दुभाजकावर बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनर वर एकनाथ शिंदे यांचा फोटो असून बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी भगवी शाल ओढलेला फोटो लावण्यात आला आहे. सोने विचारांचे देऊ भगवे विचार आणि भगवच रक्त असा मजकूर बनवत लिहिण्यात आला आहे. शिवसेनेचा हा दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को मध्ये आयोजित करण्यात आला आहे आणि त्यासाठीच या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्यात येत आहे
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 01, 2025 03:47:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पैठण तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे, गोदावरीला आलेल्या महापुरामुळे १२ मंडळांमधील १९० गावांतील सुमारे ९२ हजार ३८६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातील २ हजार ४०० घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्राथमिक अहवाल दिला आहे, महापुरामुळे 'गोदाकाठ' परिसरातील ग्रामीण भागातील १,६०० घरांत पाणी घुसले. यात एकट्या मायगावमध्येच सर्वाधिक घरं पाण्याखाली गेली आहेत. याशिवाय पैठण शहरातील सुमारे ४०० दुकाने आणि ८०० घरे पुराच्या पाण्याखाली गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील अनेक रस्ते उखडले असून, दोन पूल पूर्णपणे नादुरुस्त झाले आहेत. १६ पाझर तलावांपैकी लोहगाव येथील तलाव फुटल्यामुळे आसपासच्या शेतजमिनींना मोठे नुकसान झालंय, जायकवाडी धरणातून गोदावरीनदी पात्रात धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे १४ गावातील शेतजमिनींचा बळी गेला आहे. पुर परिस्थितीमुळे शेतशिवार वाहुन गेलं आहे, पैठण तालुक्यातील पाच हजार एकर शेतीतील माती वाहून गेल्याने पुढे जगावे कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडलाय.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 01, 2025 03:47:20
Latur, Maharashtra:ओल्या दुष्काळावरून लातूर मध्ये चांगलंच राजकारण तापलंय. काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री अमित देशमुख यांनी सरकारवर गंभीर टीका केली आहे. शासनाच्या शब्दकोशामध्ये ‘ओला दुष्काळ’ हा शब्द नाही, पण शेतकऱ्यांच्या मनात ‘ओला दुष्काळ जाहीर करा’ अशी भावना आहे. त्या भावनेची चेष्टा करू नका, अनादर करू नका. हे सरकार गंभीर नाही, अशी टीका त्यांनी केली. पण या टीकेला आता भाजपाचे आमदार व माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पलटवार केला आहे. अमित देशमुख यांना यावर कधी ना कधी मी उत्तर देईनच. पण सरकारने ‘ओला दुष्काळा’च्या दोन पावलं पुढे जाऊन शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून प्रयत्न केले आहेत. आपण विरोधी पक्षात असलो तरी शेतकऱ्यांच्या लढाईसाठी एका जिल्ह्यातील म्हणून एकत्र यायला हवं. राजकारण करण्यासाठी व्यासपीठं खूप आहेत.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 01, 2025 03:38:57
Ratnagiri, Maharashtra:पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रत्नागिरीतील 'हेल्पिंग हँड्स' संस्था सरसावली आपत्कालीन परिस्थितीत मानवी मदतीचा हात पुढे करीत रत्नागिरीकर पुन्हा एकदा एकवटलेले आहेत. रत्नागिरीतील 'हेल्पिंग हँड्स' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरीतील नागरिकांनी मराठवाडा पूरग्रस्तांसाठी मदत एकत्र करण्याची योजना आखली आहे. हेल्पिंग हँड्सच्या स्वयंसेवकांनी जयेश मंगल कार्यालयात प्राथमिक बैठक घेऊन मदतीचं नियोजन केलं आहे. या बैठकीत १८ जणांच्या उपस्थितीत जवळजवळ दोन लाख रुपये निधी एकत्र झाला. तसेच पूरग्रस्तांना रोख स्वरुपात मदत देण्यासाठी नागरिकांनी हॉटेल हर्षा, वेद इलेक्ट्रॉनिक्स, हॉटेल गोपाळ, मानस जनरल स्टोअर्स, नोटरी श्रद्धा ढेकणे, मलुष्टे स्टील अँड पाईप्स, बाजारपेठ, जैन अँड जैन- आठवडा बाजार, हॉटेल सी फॅन्स, मांडवी येथे संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.. 10 ऑक्टोबरपर्यंत ही मदत जमा करून पुरग्रस्तांपर्यंत पोहचवली जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली...
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top