Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
DhuleDhule

धềuळे महापालिका महापौर चुनाव: भाजपा बहुमत, शिंदे गट-राष्ट्रवादी ने उम्मीदवारी उतारी

PPPRASHANT PARDESHI
Feb 02, 2026 09:33:41
Dhule, Maharashtra
धुळे महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादीने देखील एन्ट्री घेतली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महापौर पदासाठी गीता नवले तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी तर्फे अन्सारी फजलू इरफान रहमान यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे महापालिकेच्या एकूण 74 जागांपैकी तब्बल 50 जागा जिंकत भाजपा बहुमताज सत्तेत आली आहे. तर निवडणुकीत भाजपाच्या विरोधात लढलेल्या महायुतीतील राष्ट्रवादीने आठ तर शिवसेना शिंदे गटाने पाच जागा जिंकल्या आहेत. दरम्यान महापौर निवडीसाठी पुरेस संख्याबळ नसताना देखील महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून शिवसेना राष्ट्रवादी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीच्या वतीने महापौर तसेच उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे आता महापौर पदाचा फैसला हा 6 फेब्रुवारी रोजीच होणार असल्याचं स्पष्ट झाला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Feb 02, 2026 12:03:36
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 02, 2026 11:52:55
Akola, Maharashtra:Anchor : संत शिरोमणी गुरु रविदास यांच्या ‘बेगमपुरा’ या समतावादी संकल्पनेतून प्रेरणा घेत अकोला शहरातील न्यू तापडिया नगर येथे गुरु रविदास प्रतिष्ठानच्या वास्तूचे भूमिपूजन सोहळा पार पडला.विविध धर्मगुरूंच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सामूहिक रविदास जयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.समाजहितासाठी उभारण्यात येणाऱ्या या लोकाभिमुख उपक्रमात चर्मकार समाजासह सर्व समाजघटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.प्रस्तावित प्रकल्पांतर्गत या ठिकाणी १०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा संकल्प असून, पुढील टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना, विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण सहाय्य, तसेच आरोग्य व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाला चर्मकार समाजातील अधिकारी, कर्मचारी, समाजबांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 02, 2026 11:52:12
Baramati, Maharashtra:अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी गर्दीत दागिन्यांची चोरी....चोरी करणारे ७ चोरट्यांना बारामती तालुका पोलिसांकडून अटक..... राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्कारा वेळी भल्या मोठ्या गर्दीत गैरफायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी उपस्थित नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम असा अंदाजे २० लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी केल्यानंतर राज्यभरातून त्या ठिकाणी अनेक अजित पवार प्रेमी उपस्थित होते त्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले ते दागिने आपल्याला परत मिळतील मात्र सोन्यापेक्षा जास्त मौलवान असे अजित पवार आपल्याला पुन्हा मिळणार नाहीत अशी प्रतिक्रिया अंत्यविधी ठिकाणाहून चोरी झालेल्या व्यक्तीने प्रतिक्रिया दिलीय. बारामती तालुका पोलिसांनी सात चोरट्यांना अटक केली आहे. राजकुमार बाबुराव आठवले , मोहम्मद अनीस मोहम्मद युनूस , एजाज भगु मीरावले , मोहम्मद सादिक मोहम्मद गफार, बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे, तुषार कैलास मासाळ, नितीन अंकुश गायकवाड आदी आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी अटक आली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलीस तपास सुरू असून, आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, सहा.पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार किशोर वीर, तसेच पोलीस अंमलदार राजू बन्ने, मनोज पवार, जितू शिंदे, हनुमंत खटके यांनी सहभाग घेतला आहे. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील हे करत आहेत.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 02, 2026 11:46:18
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 02, 2026 10:50:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर में शिवसेना और भाजप, युति के रूप में जिल्हा परिषद निवडणुका लढवत आहेत मात्र ही सर्व काही कागदावरच आहे का असा प्रश्न पडतोय कारण निवडणुकांच्या प्रचारात भाजप शिवसेने विरोधात चांगलं आक्रमक झाला आहे पालकमंत्र्यांनी धोका दिला दगाबाजी केली अशा पद्धतीचा आरोप ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी प्रचार सभेत केला आहे आणि त्यामुळे वातावरण चांगलंच तापले आहे जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात आला आहे या सगळ्या महापालिकेची चूक सुधारून शिवसेना-भाजपने युती केली मात्र प्रत्यक्षात ही युती फक्त कागदावरच आहे एकूण 63 जागांपैकी फक्त 16 जागांवरच या दोन्ही पक्षांची युती आहेत, इतर जागांवर दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना बी फॉर्म दिले आहेत त्यामुळे थेट आमने सामने लढत आहे त्यात लढत मैत्रीपूर्ण लढू अशा पद्धतीचा सुरुवातीला सांगण्यात येत असताना भाजपाने पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर हल्लाबोल केला आहे पालकमंत्र्यांनी दगा दिला शिवसेनेने बेईमानी केली अशा पद्धतीचा आरोप भाजप नेते अतुल सावे यांनी केला आहे आणि त्यामुळे भाजपाला निवडून द्या असा आवाहन ते जनतेला करत आहेत... भाजपची ही सातत्याने टीका शिवसेना आलेला आहे झोंबत आहे त्यामुळे आता शिवसेनेनेही पलटवार केला आहे, ते कामही करू शकतो मात्र आम्ही शांत आहोत आमच्या सोबत बसा कोणी युती तोडली आणि कोण दगाबाज आहे याचे उत्तर मिळेल असं शिवसेनेचे म्हणणं आहे एकीकडे दोन्ही पक्ष युतीत आहेत, आणि एकमेकांवर टीका करण्याचे हे पक्ष संधी सोडत नाहीये.. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा परिषद निवडणुकांचा हा प्रचार मतदारांचा मात्र चांगलंच मनोरंजन करत आहे, त्यात मतदार या टीकेच्या प्रचारात कोणाला कौल देतात यावरच दोन्ही पक्षाचं विजयाचे गणित अवलंबून आहे
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 02, 2026 10:47:00
Dharashiv, Maharashtra:धाराशिव मी महायुतीचा समन्वयक म्हणून काम केलंय या दोन वर्षांच्या काळात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाचा विषय कधीच काढला नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्या बैठका, व्हायच्या माहिती राबवत असलेले योजना धोरण याच्यावर चर्चा झाली होती, यात सुनील तटकरे व प्रफुल पटेल हा विषय कधीच ठरलेला नव्हता. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलनीकरणावर चर्चा अजित दादांनी केली नसल्याचं मत व्यक्त केलं होतं, त्यानंतर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण दावा केला आहे. अजित दादा महाराष्ट्राचे भूषण होते, त्यांच्या नेतृत्वाला कोणीच डाग देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्या घातपाताचा विचारही कोणी करू शकत नाही; मात्र ब्लॅक बॉक्स तपास यंत्रणेकडे आहेत आणि सत्य जे दिसेल ते बाहेर येईल. अश्याच परिस्थितीत अजित दादांच्या अपघाताबद्दल उगाच संभ्रम निर्माण नये यासाठीही बावनकुळे यांनी स्पष्टवक्ता भूमिका घेतली आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 02, 2026 10:46:12
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे पत्रकार परिषद काल अर्थ संकल्प सादर करण्यात ला जिल्हा परिषद निवडणुकीच्या धमधूमीत त्याकडे दुर्लक्ष होऊ नये त्यात आमच्या जिल्ह्याला जे मिळाल त्यावर प्रकाश टाकण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली आहे कालच बजेट कोकणाच्या अर्थ कारणच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहे 500 नवीन तलाव उभारण्यात येणार आहेत त्यामुळे मासेमारीला चालना मिळेलолд अभ्यासिक रूप से समुद्रात पकडलेले मासे कर मुक्त करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय फळ उत्पादनाला हाय वाल्यू क्रॉप चा दर्जा देण्यात आलाय कोकणातील नारळ बागांसाठी सुद्धा योजना राबविण्यात येणार आहे त्याचा फायदा कोकणाला मिळणार मुख्यमंत्रीांनी केवळ बैठका घेतल्या नाहीत तर कोकण आणि कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी 3244 कोटीची तरतूद केंद्र सरकार कडून करुन घेतलीय सी प्लेन विझीएफ योजना सुरु करण्यात आलीय त्याचा फायदा कोकणातील पर्यटणाला मोठी कलाटणी मिळेल भारताला आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प नरेंद्र मोदीजींनी केलाय त्यानुसार ते त्या दिशेने वाटचाल करत आहेत येणाऱ्या चार वर्षात कोकणाचा काया पालट होईल जनतेचा सकारात्मक प्रतिसाद आहे महायुतीसाठी पोषक वातावरण आहे धनुष्य बाण आणि कमळ चिन्ह वाल्याना निधी मिळणार अपक्ष उमेदवार असलेल्याना काही मिळणार नाही अपक्षाला मत घालून आपलं मत वाया घालवू नका विरोधक कमकुवत आहेत त्यामुळे बिनविरोध पॅटर्न दिसला हि सुरवात आहे उबाठा कडून उमेदवारांना ताकद मिळत नाही कमळ आणि धनुष्यबान समोरील बटण दाबा आणि भरघोस निधी मिळवा मंत्री नितेश राणे यांची घोषणा ऑन एकनाथ शिंदे दौरा महायुती म्हणुन त्यांच आम्ही स्वागत करू अर्थ संकल्पावर हिंदी byte ऑन ए आर रहमान जो ए आर रहमान ने हिंधू राष्ट्र के विरुद्ध टिपणी कि उसके बाद उसको कपिल शर्मा शो मे बुलाया गया अगर ऐसा कोई इस्लाम के खिलाप बोला तो उसको मारा जाता हमारे हिंदू राष्ट्र के बारे मे ऐसा बोलेगा तो हम चूप नाही बैठेंगे
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 02, 2026 10:37:33
Yeola, Maharashtra:• मंत्री छगन भुजबळ पत्रकार परिषद मुद्दे • मंत्री छगन भुजबळ On राष्ट्रवादी विलीनीकरण... - दोघे ठाकरे जसे एकत्र आले तशी पवार एकत्र यावे - परंतु अशा काही चर्चा झाल्या, असे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगले की माझ्याशी कधीही हे बोलले नाही..कल्पनाही नाही.. - जे काही करायचे ते आम्हाला बीजेपी सोबत राहून करायचे.. - असं काही करायचे असले तर त्याबाबत आम्हाला bjp ला विचारावे लागेल.. - भाजपचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहे त्यांनाही विचारावं लागेल कोणाला घ्यायचे कोणाला नाही घ्यायचे... - काय बोलणं झाले हे किंवा बोलणे झाले असेल, काय बोलणे झाले हे माझ्यासहीत कोणालाही माहीत नाहीये.. - मुख्यमंत्र्यांना तर विचारावेच लागेल ना.. - यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत त्यांना तर विचारावे लागेल ना... - जर सरकार मधून बाहेर पडायचे असेल NDA बरोबर जायचं असेल तर ती गोष्ट वेगळी आहे... - असा विचार दादांनी केला असेल हे कदापिही आम्हाला वाटत नाही... - आम्ही उपमुख्यमंत्रीची निवड केली...त्यांचे नेतृत्व आहे.. - त्यांच्या नेतृत्वात चर्चा होगील ना, आजच व्हायला पाहिजे, उद्याच व्हायला पाहिजे असे काही नाही... - राजकारणाच्या गोष्टी कधी होतात कधी नाही होतात... • मंत्री छगन भुजबळ On शशिकांत शिंदे ( शपथ घेऊन सांगितले ) - बरं झाले असेल ; - परंतु आता परिस्थिती बदलली नेते बदलले आहेत... - त्यांना त्याची काही माहिती होती का घरात ? सुनेत्रा ताईना.. - विचारतील बघतील त्यांना काय करायचे ते.. - त्यांच्या नेतृत्वाखालील बाकी नेते देखील चर्चा करतील.. - शेवटि हा निर्णय सामुदायिक रीतीने घ्यावे लागेल.. - त्याचबरोबर त्या निर्णयाच्या पाठीमागे भाजपला सुद्धा उभे राहणे आवश्यक आहे ...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 02, 2026 10:31:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:नशेखोरांच्या त्रासामुळे संतप्त ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन. सांगलीमध्ये खुनाची मालिका सुरूच आहे, खुनाच्या घटनेवरून संतप्त झालेल्या नागरिकांनी आज थेट सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला, पोलीस अधीक्षकांकडुन निवेदन स्वीकारण्यात येत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात घुसून ठिय्या आंदोलन केलं. सुमारे तास भर पोलीस अधीक्षक कार्यालयात मोठा गोंधळ सुरू होता, दोन दिवसांपूर्वी इनाम धामणी येथील एका शेतकऱ्याचा विश्रामबाग लिमया मळा येथे नशेखोरांकडून निर्घृण खून करण्यात आला होता, त्यानंतर शहरातल्या नशेखोरी व गुन्हेगारी वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झाल्याने, संतप्त इनाम धामणीतील नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत आपला निषेध नोंदवला आहे, त्याचबरोबर वाढती गुन्हेगारी आणि नशेखोरीवर पोलिसांनी तातडीने आळा घालावा, अशी मागणी करत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आली आहे. अखेर पोलीस अधीक्षका संदिप घुगे यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारत, तातडीने याबाबत कारवाई केली जाईल, असा आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 02, 2026 10:21:27
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजप ही महायुती म्हणून लढते तर काही ठिकाणी स्वतंत्र लढते या पार्श्वभूमीवर जिल्हा भाजपा कार्यालयात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते. या जाहीरनाम्यात जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसह आरोग्य व्यवस्था भक्कम करणे... अंगणवाड्या समृद्ध करणे यांसह ग्रामीण भागातील रस्ते आणि पूल प्रशस्त करण्याचा समावेश त्यासोबतच राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या नवनवीन योजना या घरोघरी पोहोचवून त्याचा लाभ नागरिकांना करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे...
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 02, 2026 10:16:57
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यात हप्तेखोरीच्या आरोपांमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. शासकीय कार्यालयांतून आमदाराला हप्ते जात असल्याच्या आरोपांमुळे आरोप–प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. एकीकडे गंभीर आरोप, तर दुसरीकडे थेट इशारे दिले जात असल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण तापले आहे पाहुयात याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट.... लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघातील शासकीय यंत्रणांवर गंभीर आरोप करत आमदार अमित देशमुख यांनी थेट भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर हत्ती खोरीचा आरोप केला आहे. निलंगा मतदारसंघात एकही शासकीय कार्यालय असं नाही जिथून हप्ते जात नाहीत, असा खळबळजनक दावा अमित देशमुख यांनी केला. या आरोपांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जोरदार आणि आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे. मी जर बोलायला सुरुवात केली, तर अमित देशमुख यांना लातूर सोडून जावं लागेल, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. आपल्याकडेही अनेक गोष्टी बाहेर काढण्यासारख्या असल्याचं सूचक वक्तव्य करत त्यांनी देशमुखांच्या आरोपांना आव्हान दिलं आहे. हवपटेखोरीच्या आरोपांवरून लातूर जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांमधील हा वाद आता चिघळताना दिसतोय. एकीकडे अमित देशमुख यांचे गंभीर आरोप, तर दुसरीकडे संभाजी पाटील निलंगेकर यांचा आक्रमक इशारा यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या आरोप–प्रत्यारोपांचा परिणाम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर काय होणार, याकडे संपूर्ण लातूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.....
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 02, 2026 10:04:55
Jalna, Maharashtra:जालना : ब्रेकिंग मनोज जरांगेंसह शिष्टमंडळावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी जामिनावर असलेल्या अमोल खूणे यांची माहिती माझ्यासह जरांगेची नार्को टेस्ट,सीबीआय चौकशी करा,पोलीस अधीक्षकांकडे अमोल खुणे यांची मागणी आंदोलनात कुणी किती गबाळं घेतलं बाहेर येईल मराठा आंदोलक मनोज जरागेंसह त्यांच्या शिष्टमंडळावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती अमोल खुने यांनी दिलीये. मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी अमोल खुणे यांना अटक करण्यात आली होती. तीन महिन्यांनंतर खुणे यांना कोर्टाने जामीन दिलाय. जामिनावर असलेल्या अमोल खुणे यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं या निवेदनात खुणे यांनी माझ्यासह जरांगेची नार्को टेस्ट करा,सीबीआय आणि ईडी चौकशीही करा अशी मागणी केली आहे.जरांगे यांनी वकील मॅनेज करून माझा जामीन होऊ दिला नाही असा आरोप देखील खुणे यांनी केला आहे. आंदोलनातल्या मला सर्व गोष्टी माहित असल्यानेच मला या प्रकरणात अडकवलं असल्याचा संशय खुणे यांनी केला असून जरांगे यांच्या आंदोलनात कुणी किती गबाळं घेतलं हे नार्को टेस्ट नंतर बाहेर येईल.त्यामुळे जरांगे यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी खुणे यांनी केली. दरम्यान कोपर्डीतील आरोपींना मारहाण नाही केली तर मि फाशी घेईल अशी धमकी जरांगे यांनी दिल्याने कोपर्डी प्रकरणातील आरोपींना आम्ही मारहाण केल्याचंही खुणे यांनी म्हंटलं आहे. बाईट: अमोल खुणे, जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असणारी व्यक्ती
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 02, 2026 10:00:34
Beed, Maharashtra:बीड बस स्टेशनात प्रवाशांचे सुरक्षा वाऱ्यावर. दोन तृतीयपंथकडून तरुणाला बेदम मारहाण.. सुरक्षारक्षक असताना चोरटे आणि दारुड्यांचा धुडगूस.. महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न.. बीड बस स्थानकामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरटे आणि दारुडे यांनी धुडगूस घातला आहे. दारूच्या नशेत दोन तृतीयपंथाने एका युवकाला अमानुष मारहाण केल्याचां प्रकार समोर आला आहे. बस स्थानकात सुरक्षारक्षक असताना असे प्रकार घडतात कसे असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत. गैरप्रकार होत असल्याने प्रवासी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.. बस स्थानकातच एका अंध आणि बेवारस असलेल्या स्त्रीवर एक नशेतील युवक तिच्यापांघरुनात झोपून तिच्याशी अश्लील चाळे करत होता. त्यामुळे सुरक्षा रक्षकाच्या कामकाजावर देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 02, 2026 09:52:04
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 02, 2026 09:48:01
Ambernath, Maharashtra:अनधिकृत बांधकामांवर बदलापूर नगरपालिकेची धडक कारवाई अंबरनाथ-बदलापूर रोड आणि पनवेलकर हायवे वरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त शहरातील 400 हून अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतलीय. आज पालिकेमार्फत अम्बरनाथ-बदलापूर हायवे तसेच पनवेल हायवे लगतची अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली. पुढील आठ ते दहा दिवस ही कारवाई सुरू राहणार असून शहरातील 400 हून अधिक अनधिकृत बांधकामं हटवण्यात येतील अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिलीय. गेल्या काही वर्षात बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. यात व्यावसायिक दुकानांचं प्रमाण सर्वाधिक आहे. या बांधकामांबाबत मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेला आदेश दिले होते. त्यानुसार नगरपालिका प्रशासनांना ही धडक मोहीम हाती घेतलीय. नगरपालिकेनं शहरातील 400 हून अधिक अनाधिकृत बांधकामांची यादी तयार केलीय. पुढील आठ ते दहा दिवसात हे सर्व अनधिकृत बांधकामे हटवण्यात येणार आहेत. बदलापूर मधल्या नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलय.
0
comment0
Report
Advertisement
Back to top