Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

AI खोज से युवक पर शक, पुलिस मारपीट के आरोप से इंकार

PTPRAVIN TANDEKAR
Feb 27, 2026 05:18:45
Bhandara, Maharashtra
एआय सर्चमुळे तरुणावर संशय.....पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप.... भंडाराच्या गोबरवाही परिसरातील घटना.... पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले.... भंडाऱ्याच्या गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीत 15 फेब्रुवारी रोजी विजय भोरगडे यांच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणी प्रमोद व कुणाल भोरगडे यांची नावे तक्रारीत नमूद झाली. स्वतःचे नाव संशयित म्हणून आल्यानंतर घाबरलेल्या कुणालने “संशयित आरोपी असल्यास बचाव कसा करावा?” असा प्रश्न गुगलवर शोधला. हा सर्च हिस्टरी पोलिसांच्या हाती लागल्याने संशय अधिकच बळावल्याचा आरोप आहे. चौकशीसाठी ताब्यात घेताना मोबाईल जप्त करण्यात आला. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने कुणाल याला ताब्यात घेतले व भंडारा येथे आणून मारहाण केल्याने हात फ्रॅक्चर झाल्याचा दावा कुणालने पत्रकार परिषदेत केला असून, या प्रकरणी न्याय व निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात येत आहे. तर पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले आहे..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Feb 27, 2026 08:19:28
Kalyan, Maharashtra:डोंबिवली पीएंडटी कॉलनी परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचे संतप्त नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली. निवडणुकीच्या काळात मुबलक पाणीपुरवठा करण्यात आला, मात्र निवडणुका संपताच पुन्हा टंचाई सुरू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाइपलाइन टाकण्यात आल्या असल्या तरी त्या लाईनमधून पाणीच येत नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली. फक्त पाइप टाकून फोटो काढले, प्रत्यक्षात नळ कोरडेच आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. सध्या परिसरात टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, टँकरच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी गंभीर शंका व्यक्त केल्या आहेत. टँकरचे पाणी पिण्यास अयोग्य आहे. त्यामुळे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे, असा आरोप करण्यात आला.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 27, 2026 08:17:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:2025 मध्ये राज्यात गरपीट आणि अतिवृष्टी झाली त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले सरकारने मोठी मदत केली मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर काही ठिकाणी प्रशासनाच्या चुकीने 2 वेळ मदतीचे पैसे आले त्याना सरकारने वसुलीसाठी नोटीस पाठवल्या आहेत यामुळं मदतीचा हा घोळ संपता संपत नाही असे चित्र आहे.. पाहुयात काय आहे प्रकार सरकारकडून शेतकऱयांच्या मदतीचा गोंधळ अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मदत अजुनही मिळाली नाही... तर काही ठिकाणी दुबार मदत मिळाल्याने शेतकऱ्यांना नोटीस... गारपीट आणि अतिवृष्टी ची शेतकऱ्यांना मिळणारी मदतीचा गोंधळ संपता संपता नाही असे चित्र आहे.. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अजूनही जाहीर केलेली मदत मिळाली नाहीय, काही ठिकाणी के वाय सी ची अडचणी तर काही ठिकाणी अजून काही गोंधळ, एकट्या मराठवाड्यात अजूनही 2025 ला जी अतिवृष्टी झाली अशा 2 लाख 38 हजार 217 शेतकऱ्यांना इ के वाय सी अडचणीमुळे मदत मिळू शकली नाहीय, या शेतकऱ्यांचे तब्बल 129 कोटी अजुन वाटप होऊ शकले नाहीय.. म्हणजे अजूनही 23 टक्के शेतकरी मदती पासून वंचित आहे, महत्त्वाचं म्हणजे ही थांबलेली मदत आहे जून जुलै अतिवृष्टी ची, धक्कादायक प्रकार म्हणजे मे 2025 मध्ये मराठवाड्यात गरपीट झालेली मोठे नुकसान झाले त्याबाबत ही मदत जाहीर झाली , ही मदत तर अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही, यासाठी स्वयं तहसीलदार दर्जाचे अधिकारी राज्य सरकारला पत्र पाठवून शेतकरी चक्रा मारताय अनुदान द्या अशी मागणी करताय, जालना जिल्ह्यातील बदनापूर तहसीलदार चे असे एक पत्र झी 24 तासच्या हात्री आले आहे हे पत्र सरकार कडून मिळणाऱ्या मदतीची भीषणता दाखवण्यास पुरेसे आहे.. 2025 अतिवृष्टी न मिळलेले शेतकरी संख्या आणि पैसे संभाजी नगर 38666 शेतकरी वंचित 23.39 कोटी प्रलंबित जालना 29875 शेतकरी वंचित थकीत रक्म 15 कोटी परभणी 37817 शेतकरी 19 कोटी थकीत हिंगोली 6593 शेतकरी 4 कोटी प्रलंबित नांदेड 47314 शेतकरी 24.85 कोटी प्रलंबित बीड 23499 शेतकरी 12.53 कोटी प्रलंबित लातूर 34681 शेतकरी 17.39 कोटी प्रलंबित धाराशिव 19772 शेतकरी 14.17 कोटी प्रलंबित.. या सगळ्या बाबत मराठवाडा विभागीय आयुक्त मात्र सावध भूमिका घेत तांत्रिक अडचणी असतील मात्र लवकरच पैसे मिळतील असे सांगत आहेत... छत्रपती संभाजी नगरच्या गंगापूरमध्ये शासकीय अनुदानाचा वेगळाच घोळ पुढं आला आहे, या शेतकऱ्यांना 2022-23 चे अनुदान 2024 ला आले मात्र त्यात प्रशासनिक चुकीमुळे त्यांना दुबार अनुदान आले .. प्रशासकीय स्तरावर झालेल्या तांत्रिक चुकीमुळे शेतकऱ्यांना मिळालेल्या 'अतिरिक्त अनुदानाच्या वसुलीसाठी तहसील कार्यालयाकडून नोटिशी बजावण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे पैसे न भरल्यास मालमत्तेवर बोजा टाकण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या निर्णयामुळे आधीच अस्मानी आणि सुल्तानी संकटात सापडलेला शेतकरी आता अधिकच हवालदिल झाला आहे. बाईट्स शेतकरी 3 बाईट्स आहे ही शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीची अवस्था दयनीय अशीच म्हणावी लागेल, कुठं येतंच नाही कुठं आलं तर वसुली साठी नोटिसा, सरकार शेतकऱ्यांच्या नावाने घोषणा मोठमोठ्या करते, मात्र मदत मिळण्याची ही कासावगती शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे त्यामुळं घोषणा करताना आणि मदत देताना यात गंभीर्य येणे ही तितकेच गरजेचे आहे... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 27, 2026 07:47:44
Yeola, Maharashtra:नाशिक जिले के लासलगांव कृषि उपज बाजार समिति में प्याज किसान 'शोले शैली' में विरोध प्रदर्शन कर रहे हैं। उन्होंने प्याज की नीलामी रोक दी है और सीधे पानी की टंकी पर बैठ गए हैं। उन्होंने गले में प्याज की माला पहनकर विरोध शुरू किया है。 किसानों की मांग है कि प्याज के लिए मूल्य विनिमय योजना तुरंत लागू की जाए, गारंटीकृत मूल्य घोषित किया जाए और पहले से बिके प्याज पर सब्सिडी दी जाए। इसके अलावा, किसानों ने आक्रामक रुख अपनाते हुए मांग की है कि नाशिक जिले के सभी 15 विधायक सत्र में प्याज का मुद्दा मजबूती से उठाएं, अन्यथा वे सत्र से बाहर चले जाएंगे。 इस बीच, इस विरोध प्रदर्शन से इलाके में तनावपूर्ण माहौल बन गया है और पुलिस प्रदर्शनकारियों को समझाने की कोशिश कर रही है。
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 27, 2026 07:47:24
Satara, Maharashtra:सातारा: फलटण तालुक्यातील विडणी येथील कोकरेवाडी परिसरात जंगली रानगव्याने वस्तीमध्ये घुसून धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात राजेंद्र सदाशिव जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. विडणी येथे कोकरेवाडी परिसरात अचानक घुसल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली यादरम्यान राजेंद्र जाधव यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.या घटनेनंतर संपूर्ण कोकरेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वन विभागाकडून रानगव्याला पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून या भागात रानगाव याला पकडण्यासाठी विशेष म्हणून राबवली जात आहे
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 27, 2026 07:31:01
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड मध्ये अवघ्या 20 रुपयांसाठी मित्राच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय....! पिंपरी मध्ये रवींद्र आणि सत्यजित कांबळे यांच्या मध्ये बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. ‘माझे तुझ्याकडे 20 रुपये उधार आहेत’ असे म्हणत सत्यजितने रवींद्रच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात रवींद्र गंभीर जखमी झाला असून त्यांना तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान, हल्ल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक लातूर रवाना झाले आणि त्याला बेड्या ठोकण्यात यश आले.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 27, 2026 07:22:10
Bhandara, Maharashtra:एआय सर्चमुळे तरुणावर संशय.....पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप.... भंडाराच्या गोबरवाही परिसरातील घटना.... पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले.... Anchor :- एआय वर सर्च करणे एका तरुणाला महागात पडले आहे.. एआय वर सर्च केल्याने पोलिसांनी ताब्यात घेत मारहाण केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.... Vo :- भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीत 15 फेब्रुवारी रोजी खंदाळ येथील रहिवासी विजय भोरगडे यांच्या घरी चोरी झाली. त्यांनी याची तक्रार गोबरवाही पोलिसात दिली. या चोरीचा संशय घेत त्यांनी गावातील तिघांचा नाव घेतलं. त्यात प्रमोद बोरघरे , व कुणाल बोरघरे यांची नावे तक्रारीत नमूद झाली. स्वतःचे नाव संशयित म्हणून आल्यानंतर घाबरलेल्या कुणालने “संशयित आरोपी असल्यास बचाव कसा करावा?” असा प्रश्न गुगलवर शोधला. हा सर्च हिस्टरी पोलिसांच्या हाती लागल्याने संशय अधिकच बळावल्याचा आरोप आहे. चौकशीसाठी ताब्यात घेताना मोबाईल जप्त करण्यात आला. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने कुणाल याला ताब्यात घेतले व भंडारा येथे आणून मारहाण केल्याने हात फ्रॅक्चर झाल्याचा दावा कुणालने पत्रकार परिषदेत केला. हाताला गंभीर दुखापत झाली असून शरीरावरही मारहाणीच्या खुणा असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर पोलिसांनी त्यांच्या नाकात काहीतरी टाकून त्रास दिला व जबरदस्तीने कबुली कबुली देण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. यावेळी कोणताही गुन्हा नोंद नसतानाही मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सामान्य रुग्णालयात नेले. मात्र तेथेही मारहाणीबद्दल कुणाला सांगितले तर तुमच्या वडिलांनाही गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिल्याचा आरोप कुणाल बोरघरे यांनी केला आहे. नंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिल्यानंतर कुणाल बोरघरे यांनी आपल्या गावातील रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घेतली. तपासणीत त्यांच्या हाताला फॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी आ. चरण वाघमारे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने चौकशी करून दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 27, 2026 06:47:50
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडून शोले स्टाईल’ आंदोलन करत शेतकरी थेट पाण्याच्या टाकीवर चढून बसले आहेत. कांद्याच्या माळा गळ्यात घालून लक्ष आंदोलन सुरू केले आहे. कांद्याला तात्काळ भावांतर योजना लागू करावी, हमीभाव जाहीर करावा आणि आधीच विकलेल्या कांद्याला अनुदान द्यावे. तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ आमदारांनी अधिवेशनात कांद्याचा प्रश्न ठामपणे मांडावा, अन्यथा सभात्याग करावा, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.दरम्यान, या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 27, 2026 06:17:22
Nanded, Maharashtra:नांदेड शहरात चैन स्नॅचिंगच्या घटनात वाढ होत असून काल गुरुवारी सायंकाळी एका महिलेच्या गळ्यातील चैन ओरबाडून चोरट्यानी दुचाकीवरून पळ काढला. चैन स्नॅचिंगची ही घटना सिसिटीव्ही मध्ये कैद झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुनील नानवटे यांच्या पत्नी आणि मुलगा काल सायंकाळी आपल्या जय भवानी नगर मधील रोडवर सयंकाळी फिरत होते. त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवरून दोन चोरटे आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील चैन ओरबाडली. या महिलेने हिम्मत दाखवत चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण चोरटे दुचाकीवरून पसार झाले. पाच दिवसांपूर्वीच तरोडेकर शाळेसामोरील अत्यंत राहदारीच्या मुख्य रस्त्यावरून अश्याचप्रकारे चैन स्नॅचिंग झाली होती. पुन्हा एकदा भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच ही घटना घडल्याने पोलीसांसमोर आव्हाण निर्माण झाले आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 27, 2026 06:05:32
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात 27 व 28 फेब्रुवारी रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन, आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने शहरातून निघाली ग्रंथ दिंडी, ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे होत आहे आयोजन अँकर: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय चंद्रपूर व जिल्हा मराठी भाषा समितीद्वारे 27 व 28 फेब्रुवारी रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचलनालय, चंद्रपूर येथे ग्रंथोत्सव तसेच ग्रंथ प्रदर्शन, विक्री व विविध साहित्यीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयापासून जिल्हा ग्रंथालयापर्यंत एका ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. शहरातील ग्रंथप्रेमी वाचक, नागरिक आणि विद्यार्थी यात सहभागी झाले. या निमित्ताने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच्या संधी आणि आव्हाने , वाचन संस्कृतीच्या विकासात सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान या विषयावर परिसंवाद होणार है. याशिवाय ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने कवी संमेलन देखील आयोजित करण्यात आले आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 27, 2026 06:03:44
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे शिक्षकाला बेदम मारहाण; पॉस्को गुन्ह्याच्या आरोपांमुळे गावात तणावपूर्ण शांतता Anchor link-पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात श्री गुरुदेव दत्त विद्यालयातील शिक्षक नितीन चव्हाण यांना 20 ते 25 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे. VO -मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकांना त्यांच्या घरातून बाहेर काढून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून गावाबाहेर नेण्यात आले. तेथे त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर पुन्हा गावातील चौकात आणून जमावासमोर मारहाण करत धमकी देण्यात आल्याचे समजते. गंभीर मारहाणीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विद्यालयाची सहल महाबळेश्वर येथे गेली होती. त्या सहलीदरम्यान पाचवीतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप नितीन चव्हाण यांच्यावर करत टोळक्याने मारहाण केल्याचा समजते. या प्रकरणी संबंधित मुलीच्या पालकांनी शिरूर पोलीस ठाण्यात पॉस्को (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. Byte: सुलक्षणा दुसाणे (सहकारी शिक्षक) Byte: बी बी दौंडकर (प्राचार्य) VO...दुसरीकडे, मारहाण झाल्याप्रकरणी नितीन चव्हाण यांनी टाकळी हाजी येथे तक्रार दाखल केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल पोलीस सविंदणे गावात चौकशीसाठी आले असता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. “आमच्या शिक्षकांना वाचवा” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला. विद्यालय देखील काही काळ बंद ठेवण्यात आले.गावकरी मात्र शिक्षकांच्या बाजूने उभे असल्याचे चित्र दिसत आहे.एकीकडे शिक्षकाविरोधात पॉस्को अंतर्गत गंभीर आरोप असून दुसरीकडे त्यांच्यावर झालेल्या जमावाकडून मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. या दोन्ही घटनांमुळे गावात वातावरण तापले असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. आजही काही पालक व विद्यार्थी शिरूर पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.Byte: ग्रामस्थEnd Vo...या संपूर्ण प्रकरणात नेमके सत्य काय, आरोपांमध्ये किती तथ्य आहे, तसेच मारहाणीमागील कारणे काय याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. दोन्ही बाजूंकडून दाखल तक्रारींच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.प्रतिनिधी हेमंत चापुडेझी मिडीया शिरूर पुणे...
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 27, 2026 06:03:22
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 27, 2026 06:03:02
Nagpur, Maharashtra:नागपूर शिवलिंग पटवे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ नागपूर* 121 है... प्रश्नपत्रिका फुटने, भौतिकशास्त्र अंडरसायनशास्त्र पाठोपाठ गणित पेपर फुटला; बोर्डाच्या सीलबंद लिफाफ्यात बारावीची एक प्रश्नपत्रिका कमी कशी? - गणित पेपर फुटला - पोलिसांच्या तपासात अनेक मोबाईल हस्तगत करण्यात आले होते; त्यांच्या संशोधनानुसार याबाबी आढळून आले आहेत; कारवाई केली जाणार आहे; दोषी ज्या आहे ते पकडले जातील - मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे; तपासात काही बाबी आढळून आल्यात - प्रश्नपत्रिकांचा पूर्ण सीलबंद बंडल असतो; वर्गनिहाय 25-25 चे पॅकेट्स असतात; सील अत्यंत टिकून असते; कोणत्याही अवस्थेत फोडणे शक्य नसते; अकरा वाजता विद्यार्थ्यांच्या समोर स्वाक्षरी घेऊनच ते फोडलं जातं; प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसमोरच मोजल्या जातात; एखाद्या ठिकाणी 25 ऐवजी 24 प्रश्नपत्रिका निघाल्या असल्याची रिपोर्टिंग केली जाते; राज्य मंडळालाही तशी माहिती दिली जाते - हे गोपनीय प्रेसकडून आलेलं मटेरियल असून, पेपर कुठेही जाऊन गेलेला नसतो; पेपर मोजताना चूक होऊ शकते; बाहेर जाणे असंभव आहे - पेपर आपण अकरा वाजता उघडतो; गैरप्रकार करण्याच्या उद्देशाने अकराच्या आधी कोणीतरी केला; विद्यार्थ्यांना कोणतेही मटेरियल आलेले नसते; घटना तपासण्यातल्या यंत्रणेने दोषी व्यक्तीला कंठशह ठोकले - प्रकरण तपासून पुढील पावलं उचलण्याची प्रक्रिया सुरू आहे - सेंट उर्सुला केंद्रावरील यंत्रणा आम्ही बदलीलेली आहे; केंद्र संचालक पर्यवेक्षक बदलले गेले आहेत - पोलिसांच्या रिपोर्टिंगनंतर आणखी कठोर पावलं उचलू
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top