Back
शिरूर के सविंदणे में शिक्षक पर विनयभंग के आरोप, मारहाण से गाव में तनाव
HCHEMANT CHAPUDE
Feb 27, 2026 06:03:44
Shirur, Maharashtra
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे शिक्षकाला बेदम मारहाण; पॉस्को गुन्ह्याच्या आरोपांमुळे गावात तणावपूर्ण शांतता Anchor link-पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात श्री गुरुदेव दत्त विद्यालयातील शिक्षक नितीन चव्हाण यांना 20 ते 25 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे. VO -मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकांना त्यांच्या घरातून बाहेर काढून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून गावाबाहेर नेण्यात आले. तेथे त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर पुन्हा गावातील चौकात आणून जमावासमोर मारहाण करत धमकी देण्यात आल्याचे समजते. गंभीर मारहाणीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विद्यालयाची सहल महाबळेश्वर येथे गेली होती. त्या सहलीदरम्यान पाचवीतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप नितीन चव्हाण यांच्यावर करत टोळक्याने मारहाण केल्याचा समजते. या प्रकरणी संबंधित मुलीच्या पालकांनी शिरूर पोलीस ठाण्यात पॉस्को (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. Byte: सुलक्षणा दुसाणे (सहकारी शिक्षक) Byte: बी बी दौंडकर (प्राचार्य) VO...दुसरीकडे, मारहाण झाल्याप्रकरणी नितीन चव्हाण यांनी टाकळी हाजी येथे तक्रार दाखल केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल पोलीस सविंदणे गावात चौकशीसाठी आले असता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. “आमच्या शिक्षकांना वाचवा” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला. विद्यालय देखील काही काळ बंद ठेवण्यात आले.गावकरी मात्र शिक्षकांच्या बाजूने उभे असल्याचे चित्र दिसत आहे.एकीकडे शिक्षकाविरोधात पॉस्को अंतर्गत गंभीर आरोप असून दुसरीकडे त्यांच्यावर झालेल्या जमावाकडून मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. या दोन्ही घटनांमुळे गावात वातावरण तापले असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. आजही काही पालक व विद्यार्थी शिरूर पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.Byte: ग्रामस्थEnd Vo...या संपूर्ण प्रकरणात नेमके सत्य काय, आरोपांमध्ये किती तथ्य आहे, तसेच मारहाणीमागील कारणे काय याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. दोन्ही बाजूंकडून दाखल तक्रारींच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.प्रतिनिधी हेमंत चापुडेझी मिडीया शिरूर पुणे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowFeb 27, 2026 11:49:250
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 27, 2026 11:47:240
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 27, 2026 11:33:570
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 27, 2026 11:07:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 27, 2026 11:06:110
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 11:00:190
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 27, 2026 10:46:180
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 27, 2026 10:09:430
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 27, 2026 10:09:160
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 27, 2026 09:53:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 09:45:490
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 27, 2026 09:45:310
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 27, 2026 09:22:350
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 27, 2026 09:21:510
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 27, 2026 09:15:340
Report
