Back
मराठवाड़ा में गरपीट-अतिवृष्टी राहत घोटाला: मदद नहीं मिली, नोटिस जारी
VKVISHAL KAROLE
Feb 27, 2026 08:17:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
2025 मध्ये राज्यात गरपीट आणि अतिवृष्टी झाली त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले सरकारने मोठी मदत केली मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर काही ठिकाणी प्रशासनाच्या चुकीने 2 वेळ मदतीचे पैसे आले त्याना सरकारने वसुलीसाठी नोटीस पाठवल्या आहेत यामुळं मदतीचा हा घोळ संपता संपत नाही असे चित्र आहे.. पाहुयात काय आहे प्रकार
सरकारकडून शेतकऱयांच्या मदतीचा गोंधळ
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मदत अजुनही मिळाली नाही...
तर काही ठिकाणी दुबार मदत मिळाल्याने शेतकऱ्यांना नोटीस...
गारपीट आणि अतिवृष्टी ची शेतकऱ्यांना मिळणारी मदतीचा गोंधळ संपता संपता नाही असे चित्र आहे.. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अजूनही जाहीर केलेली मदत मिळाली नाहीय, काही ठिकाणी के वाय सी ची अडचणी तर काही ठिकाणी अजून काही गोंधळ, एकट्या मराठवाड्यात अजूनही 2025 ला जी अतिवृष्टी झाली अशा 2 लाख 38 हजार 217 शेतकऱ्यांना इ के वाय सी अडचणीमुळे मदत मिळू शकली नाहीय, या शेतकऱ्यांचे तब्बल 129 कोटी अजुन वाटप होऊ शकले नाहीय.. म्हणजे अजूनही 23 टक्के शेतकरी मदती पासून वंचित आहे, महत्त्वाचं म्हणजे ही थांबलेली मदत आहे जून जुलै अतिवृष्टी ची, धक्कादायक प्रकार म्हणजे मे 2025 मध्ये मराठवाड्यात गरपीट झालेली मोठे नुकसान झाले त्याबाबत ही मदत जाहीर झाली , ही मदत तर अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही, यासाठी स्वयं तहसीलदार दर्जाचे अधिकारी राज्य सरकारला पत्र पाठवून शेतकरी चक्रा मारताय अनुदान द्या अशी मागणी करताय, जालना जिल्ह्यातील बदनापूर तहसीलदार चे असे एक पत्र झी 24 तासच्या हात्री आले आहे हे पत्र सरकार कडून मिळणाऱ्या मदतीची भीषणता दाखवण्यास पुरेसे आहे..
2025 अतिवृष्टी न मिळलेले शेतकरी संख्या आणि पैसे
संभाजी नगर 38666 शेतकरी वंचित 23.39 कोटी प्रलंबित
जालना 29875 शेतकरी वंचित थकीत रक्म 15 कोटी
परभणी 37817 शेतकरी 19 कोटी थकीत
हिंगोली 6593 शेतकरी 4 कोटी प्रलंबित
नांदेड 47314 शेतकरी 24.85 कोटी प्रलंबित
बीड 23499 शेतकरी 12.53 कोटी प्रलंबित
लातूर 34681 शेतकरी 17.39 कोटी प्रलंबित
धाराशिव 19772 शेतकरी 14.17 कोटी प्रलंबित..
या सगळ्या बाबत मराठवाडा विभागीय आयुक्त मात्र सावध भूमिका घेत तांत्रिक अडचणी असतील मात्र लवकरच पैसे मिळतील असे सांगत आहेत...
छत्रपती संभाजी नगरच्या गंगापूरमध्ये शासकीय अनुदानाचा वेगळाच घोळ पुढं आला आहे, या शेतकऱ्यांना 2022-23 चे अनुदान 2024 ला आले मात्र त्यात प्रशासनिक चुकीमुळे त्यांना दुबार अनुदान आले .. प्रशासकीय स्तरावर झालेल्या तांत्रिक चुकीमुळे शेतकऱ्यांना मिळालेल्या 'अतिरिक्त अनुदानाच्या वसुलीसाठी तहसील कार्यालयाकडून नोटिशी बजावण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे पैसे न भरल्यास मालमत्तेवर बोजा टाकण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या निर्णयामुळे आधीच अस्मानी आणि सुल्तानी संकटात सापडलेला शेतकरी आता अधिकच हवालदिल झाला आहे.
बाईट्स शेतकरी 3 बाईट्स आहे
ही शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीची अवस्था दयनीय अशीच म्हणावी लागेल, कुठं येतंच नाही कुठं आलं तर वसुली साठी नोटिसा, सरकार शेतकऱ्यांच्या नावाने घोषणा मोठमोठ्या करते, मात्र मदत मिळण्याची ही कासावगती शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे त्यामुळं घोषणा करताना आणि मदत देताना यात गंभीर्य येणे ही तितकेच गरजेचे आहे...
विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 27, 2026 09:53:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 09:45:490
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 27, 2026 09:45:310
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 27, 2026 09:22:350
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 27, 2026 09:21:510
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 27, 2026 09:15:340
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 27, 2026 09:04:380
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 27, 2026 09:01:230
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 27, 2026 09:00:560
Report
AKAMAR KANE
FollowFeb 27, 2026 09:00:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 27, 2026 08:46:090
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 27, 2026 08:19:280
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 27, 2026 07:47:440
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 27, 2026 07:47:240
Report
