Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

नांदेड में चैन स्नैचिंग की घटनाओं में तेज़ी, महिला की गला से चेन छीने बदमाश भागे

SMSATISH MOHITE
Feb 27, 2026 06:17:22
Nanded, Maharashtra
नांदेड शहरात चैन स्नॅचिंगच्या घटनात वाढ होत असून काल गुरुवारी सायंकाळी एका महिलेच्या गळ्यातील चैन ओरबाडून चोरट्यानी दुचाकीवरून पळ काढला. चैन स्नॅचिंगची ही घटना सिसिटीव्ही मध्ये कैद झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुनील नानवटे यांच्या पत्नी आणि मुलगा काल सायंकाळी आपल्या जय भवानी नगर मधील रोडवर सयंकाळी फिरत होते. त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवरून दोन चोरटे आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील चैन ओरबाडली. या महिलेने हिम्मत दाखवत चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण चोरटे दुचाकीवरून पसार झाले. पाच दिवसांपूर्वीच तरोडेकर शाळेसामोरील अत्यंत राहदारीच्या मुख्य रस्त्यावरून अश्याचप्रकारे चैन स्नॅचिंग झाली होती. पुन्हा एकदा भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच ही घटना घडल्याने पोलीसांसमोर आव्हाण निर्माण झाले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Feb 27, 2026 11:07:56
Jalna, Maharashtra:जालन्यात तब्बल 21 धारदार तलवारींचा साठा जप्त. सदर बाजार पोलिसांची धडाकेबाज कारवाई. एकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल. जालना शहरातील महावीर चौक परिसरातील "जय माता दी मेन्स वेअर" या कापड दुकानात मोठ्या प्रमाणावर तलवारींचा साठा असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित दुकानावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान दुकानातून तब्बल 25 हजार 900 रुपये किंमतीच्या 21 लहान-मोठ्या तलवारी जप्त करण्यात आल्या. दुकानाचा चालक मनीष निहलानी याच्याकडे तलवारींबाबत परवान्याची विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे आढळून आले. यानंतर पोलيسांनी मनीष निहलानी याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 25 हजार 900 रुपये किंमतीच्या 21 स्टीलच्या धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी मनीष निहलानी याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 27, 2026 11:06:11
Navi Mumbai, Maharashtra:मॅट्रिमोनियल संकेतस्थळांवर बनावट प्रोफाइल तयार करून स्वत:ला इस्रोमध्ये शास्त्रज्ञ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात उच्च पदावर कार्यरत असल्याचे भासवून अनेक महिलांची आर्थिक आणि लैंगिक शोषणाद्वारे फसवणूक करणाऱ्या दोघांना नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे 16 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून त्यापैकी 9 लाख 40 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपी विविध मॅट्रিমोनियल साईटवर आकर्षक प्रोफाइल तयार करुन त्यात उच्च शिक्षण, मोठ्या पदावरील नोकरी, आलिशान जीवनशैली, स्वतःची गाडी व मालमत्ता असल्याचे महिलांना भासवून सुशिक्षित महिलांशी संपर्क साधत त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होता. याप्रकरणी नवी मुंबईसह ठाणे, मुंबई व पुणे परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले असून तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याला साथ देणाऱ्या तरुणीलाही अटक केलेय. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून आणखी पीडित महिलांचा शोध घेतला जात आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 27, 2026 10:09:43
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 27, 2026 10:09:16
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील लाँग मार्चला मोठ यश... लाँग मार्चची यशस्वी सांगता.. पालकमंत्री विखे व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेनी VC द्वारे केले संबोधित.. वनजमिनी , तळ जमिनीच्या मागण्यांसह अर्ध वेळ कर्मचारी आणि शालेय पोषण कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय... अर्ध वेळ कर्मचाऱ्यांच्या मानधनात दोन हजार तर शालेय पोषण कर्मचाऱ्यांच्या मानधनात एक हजारांची वाढ Raj्यातील बांधकाम कामगारांच्या मेडिक्लेम योजने सह चौदा मागण्या मान्य... वन जमिनी व तळ जमिनी बाबत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू... अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांच्या उपस्थितीत आंदोलनाची यशस्वी सांगता.... विखेंच्या गावात मोर्चा पोहोचण्यापूर्वीच सरकारचा मोठा निर्णय...
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 27, 2026 09:53:39
Ahilyanagar, Maharashtra:मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक प्रेरणादायी उपक्रम अहिल्यानगर जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील रामनाथ लेंडाळ यांनी आपल्या मुलीच्या लग्नात आवाजावी खर्च न करता गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी २१ हजार रुपयांची देणगी देत ‘कुसुमाग्रज ग्रंथालय’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सध्या विवाह समारम्भांमध्ये वाढता दिखावा आणि अनावश्यक खर्च दिसून येत असताना, लेंडाळ यांनी आपल्या मुलाच्या लग्नाचा मुहूर्त साधत हा खर्च शिक्षणासाठी वळवण्याचा निर्णय घेतला. आपल्या बालपणी ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांनी शिक्षण घेतले, त्याच शाळेच्या विकासासाठी त्यांनी २१ हजार रुपयांची देणगी धनादेशाद्वारे सुपूर्द केली. या निधीतून शाळेत सुसज्ज कुसुमाग्रज ग्रंथालय उभारण्यात येणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 27, 2026 09:45:49
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद... आज बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने मी आलेलो आहे, जगात अनेक विचारवंत झाले मात्र गौतम बुद्ध हे शांतीचे संदेश देणारे विचारवंत होऊन गेले आमची मागणी आहे की बोधी वृक्ष असलेल्या संस्थेत ट्रस्टी कुणीच नसावे, बाबासाहेबांनी सविधान देण्या अगोदरचा हा एक्ट आहे, त्यामुळे बिहार सरकारकडे विनंती केली आहे, कुणावर अन्याय करण्याची आमची भूमिका नाही, मात्र त्यात ट्रस्टी नसावे काल टाका नावाचे गाव आहे तेथील एका मुलीच्या घरी मी भेट दिली, तिथे तिच्या आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे, तिने गळफास घेतल्यावर तिच्या आई वडलांना बोलवायला हवे होते, म्हणून यामागे घातपात असल्याची शंका तिच्या आईला आहे ती बॉडी हॉस्पिटल मधे ठेवल्या नंतर तिच्या आई वडलांना बोलवण्यात आले, ती अत्यंत हुशार मुलगी आहे, आम्ही 1 लाख तर समाजकल्याण खात्याची 4 लाख मदत त्यांना मिळाली आहे. मात्र यामागे काही तरी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, म्हणून यात खुनाचा गुन्हा दाखल व्हावा आणि चौकशी व्हावी मनपा आणि इतर निवडणूक आम्ही पहिल्या अनेक ठिकाणी आमचे 2-3 लोक निवडून यायचे मात्र प्रभाग पद्धत रद्द करावी अशी मुख्यमंत्री यांना आमची मागणी आहे, सरकार मध्ये आम्ही असलो तरी न्यायालयात जाण्याची आमची तयारी आहे अजित दादा यांचे सर्व क्षेत्रात मित्र aa असणारा नेता आहे,CBI चौकशी कराची असेल तर राज्याने मागणी करायला हवी, यामागे काही घातपात आहे का याची चौकशी झाली पाहिजे, रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी अनेक प्रश्न निर्माण केला आहे घातपात असेल असे आम्हाला वाटत नाही, जे विमान होते अतिशय महाग असते, अनेक ठिकाणी घटना घडतात त्यामुळे अश्या गोष्टी घडू शकत नाही पाच राज्यांच्या निवडणुका निवडणूक आयोग जाहीर करेल, त्यामुळे त्यात पारदर्शकता असायला हवी , ज्यांची बोगस नावे आहेत किंवा जे डेथ झाले आहेत त्यांची नावे वगळावी, खोटे कागदपत्र देऊन लोक नाव नोंदून घेतात त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी ममता बॅनर्जी यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत, राहुल गांधी यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत, दुबार नाव असल्याच्या भूमिकेबाबत जवळपास बहुतांश राज्यात आम्हाला मान्यता आहे, दोन राज्यात आम्हाला नाही 4 पक्ष देशात आहेत, काँग्रेस, भाजपा, बसपा आणि आप हे पक्ष यात आहेत, त्यामुळे आम्हाला जर दोन राज्यात मिळाली तर आम्ही पण त्यात येऊ आमचे मनपा निवडणुकीत 50-60 लोक यावेळी निवडून आलेले आहेत, फक्त पक्ष चिन्ह वेगळी आहेत ON राहुल गांधी in AI समीट विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काही गोष्टींचे कौतुक करायला हवे होते, त्याला 30-40 देशाचे प्रतिनिधी होते, त्यामुळे काँग्रेस असच वागत राहिला तर त्यांना भविष्य नाही असं मला वाटत ON राज्यसभा माझा कार्यकाळ संपणार आहे मात्र पुन्हा राज्यसभा मिळेल असा मला विश्वास आहे, माझी पुन्हा हॅटट्रिक होईल,मोদি यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. ON ट्विट माझी भूमिका आहेच, तुकड्या तुकड्या मध्ये राहणाऱ्यांना जोडण्याचे काम आपण केले पाहिजे बाळासाहेबांनी भूमिका घेतली तर ते शक्य आहे, गेल्या अनेक वर्ष ते स्वबळावर लढत आहेत आम्ही जर एकत्र आले तर प्रकाश आंबेडकर अजून पुढे जातील ON बाळासाहेब आंबेडकर भूमिका आम्ही आंबेडकर वादी आहोत म्हणून एकत्र आहोत, मोदी पण आंबेडकरवादीला मानतात, ज्यांना देशात राहायचे त्यांना संविधान मानावे लागेल ON EVM बॅलेट बंद काँग्रेसने केले आहेत, भाजपने नाही माझ्या मता नुसार जश्या मशीनवर सुरू आहेत तश्या निवडणुका व्हाव्या, लोकसभेत आमचा चुकीचा प्रचार झाला तेव्हा आम्ही तक्रारी केल्या नाहीत ON भाजप सोबत फायदा काय? देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे एक विधान परिषद आणि 1-2 मंडळात आम्हाला जागा मिळेल. ON औरंगजेब इतिहास देवेंद्र फडणवीस त्यांनी बरोबर सांगितले आहे, इथेले मुस्लिम आणि तिथले मुस्लिम हे वेगळे वेगळे आहेत, औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा उदो उदो करण्याची गरज नाही. त्यांनी इथल्या मुस्लिम लोकांनी समजून घ्यावे की औरंगजेब आणि टिपू सोबत त्यांचा काही संबंध नाही ON एपस्टीन फाईल मोदी राजनामा मोदी देशाचे लोकप्रिय नेते आहेत, त्यांचा याशी काही संबंध नाही, काही लोकांना यात बदनाम केले जात आहे, त्यांनी राजीनामा द्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 27, 2026 09:45:31
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 27, 2026 09:22:35
Akola, Maharashtra:अकोला शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सिंधी कॅम्प परिसरातून एका चारचाकी गाडीची अत्यंत शिताफीने चोरी करण्यात आली आहे. खदान परिसरातील घरासमोर उभी असलेली ही चारचाकी गाडी चोरट्यांनी काही मिनिटांतच लंपास केली. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चारचाकी गाडीतून आलेल्या चोरट्यांनी प्रथम गाडीचा काच फोडला , त्यानंतर त्यांनी लॅपटॉपच्या साहाय्याने गाडी सुरू केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरट्यांनी यापूर्वी एका शोरूममधून चारचाकी गाडी चोरी केली. त्याच गाडीचा वापर करून त्यांनी ही दुसरी चोरी केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे ही चोरी पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी गाडी मालक नितीन नेभानी यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी आणि वाहनधारकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 27, 2026 09:21:51
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरात एफआरपीच्या अंमलबजावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक - सोलापुरात एफआरपीच्या अंमलबजावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक - ऊस गाळप बंद होऊन दीड महिना लोटला तरी ऊस बील न दिल्याने स्वाभिमानी आक्रमक - साखर सहसंचालक कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर शेतकाऱ्यांचे ठिय्या आंदोलन - जिल्ह्यातील एकाही कारखान्याने FRP नुसार अद्याप ऊस बील दिले नाही. - साखर सहसंचालकांनी जिल्ह्यातील कारखानदारांवर कारवाई करावी. - जिल्ह्यातील गोकुळ शुगर कारखान्याने सील तोडून गाळप केले त्यावर अधिकाऱ्यांनी कसलीही कारवाई केली नाही. बाईट - विजय रणदिवे ( स्वाभिमानी शेतकरी संघटना ) बाईट - अजित बोरकर ( स्वाभिमानी शेतकरी संघटना )
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 27, 2026 09:15:34
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top