
नाशिकमध्ये शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली ७ लाखांची फसवणूक करणारा शेअर ब्रोकर अटकेत
सेवानिवृत्त व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचं आमिष देत ७ लाखांची फसवणूक करून ११ महिन्यांपासून फरार असलेल्या मधुकर कोळी या शेअर ब्रोकरला अखेर अटक करण्यात आली आहे. नाशिक गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातून त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणी ३ जुलै २०२४ रोजी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने अंबड लिंक रोड परिसरात राहणाऱ्या व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचं आमिष दाखवून आर्थिक गंडा घातला होता. प्रशांत मरकड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास करून सापळा रचत आरोपीला अटक केली आहे.
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|