Back
Diwali Special FDA Drive in Jalna: 41 Samples Collected to Check Food Adulteration
NMNITESH MAHAJAN
Oct 17, 2025 01:46:39
Jalna, Maharashtra
जालना | दीपावली सणानिमित्त अन्न आणि औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम सुरु भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यावर कायदेशिर कार्यवाही होणार अँकर | सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमधील संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने जालना जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत जालना शहरासह जिल्ह्यातील खाद्यपदार्थ उत्पादक, घाऊक विक्रेते, वितरक, मिठाई उत्पादक आणि विक्रेते यासारख्या आस्थापनांच्या तपासण्या करुन एकूण 41 अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या नमुन्यामध्ये दूध, खवा, पनीर, तूप, खाद्यतेल, मिठाई आणि सुकामेवा आदी अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरुन खाद्यतेलाचा 13 हजार 899 किलोग्रॅम एकूण 21 लाख 27 हजार 742 रुपये किंमतीचा साठा नमुने विश्लेषणाकरीता घेऊन जप्त करण्यात आला आहे. या नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा तसेच मानके कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असं अन्न आणिऔषध प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. ही तपासणी मोहिम दिवाळीपर्यंत राबविण्यात येणार आहे.
14
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RZRajnish zee
FollowNov 16, 2025 12:19:450
Report
PTPawan Tiwari
FollowNov 16, 2025 12:19:340
Report
MMMohammad Muzammil
FollowNov 16, 2025 12:19:250
Report
AKAtul Kumar
FollowNov 16, 2025 12:19:140
Report
SKSHIV KUMAR
FollowNov 16, 2025 12:19:040
Report
PCPUSHKAR CHAUDHARY
FollowNov 16, 2025 12:18:420
Report
MGMOHIT Gomat
FollowNov 16, 2025 12:18:240
Report
RDRAJKUMAR DIXIT
FollowNov 16, 2025 12:18:120
Report
AVArun Vaishnav
FollowNov 16, 2025 12:17:510
Report
DKDeepesh Kumar
FollowNov 16, 2025 12:16:170
Report
HHHarvinder Harvinder
FollowNov 16, 2025 12:16:070
Report
DBDevender Bhardwaj
FollowNov 16, 2025 12:15:480
Report
AGAbhishek Gour
FollowNov 16, 2025 12:15:220
Report
DKDeepesh Kumar
FollowNov 16, 2025 12:15:080
Report
0
Report