Back
भिगवण युवती अपहरण मामला: वीडियो वायरल, माता-पिता और गिरफ्तारी पर बहस
JMJAVED MULANI
Feb 20, 2026 19:00:31
Baramati, Maharashtra
भिगवण युवती अपहरण प्रकरणाला नवीन वळण... बारामती शहर पोलीस ठाण्यात झाले दोघेही हजर... मुलीचे प्रतिज्ञापत्र सोशल मीडियावर व्हायरल... मुलीचा आईकडे जाण्यास नकार... पोलिसांचा तपास आणखी सुरूच... इंदापूर तालुक्यातील घटना.. भिगवण येथे 21 वर्षीय मुलीचे तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून अपहरण झाले होते याबाबत इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला होता. अपहरण झालेली मुलगा आणि मुलगी गुरुवारी बारामती शहर पोलीस स्टेशनला हजर झाले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेपण लागल्याचे पाहायला मिळाले. ही बातमी कळताच संतप्त नागरिकांनी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर बुधवारी भिगवण बंद हाक देण्यात आली होती. या हाकेला भिगवणकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. दुपारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता मात्र त्यापूर्वीच मुलीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. यामध्ये माझे अपहरण झाले नसून मी स्वतःच्या मर्जीने त्या युवकासोबत गेल्याचे सांगितले मात्र मुलीवर दबाव टाकून हा व्हिडिओ काढल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता अपहरण झालेली मुलगी आणि मुलगा हे बारामती पोलीस स्टेशनला हजर झाले दरम्यान याच कालावधीत मुलीने प्रतिज्ञापत्र देखील सोशल मीडियावर व्हायरल केले. तरुण-तरुणी दोघेही बारामती पोलीस स्टेशनला आले होते त्यांचा जबाब नोंदवला आहे मुलीच्या आईच्या आणि मुलीच्या संवादात तफावत आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. मुलीला न्यायालयात हजर केले असता (crpc) कोर्टासमोरील जबाबात (164 कलम) आईकडे जाण्यास नकार दिला आहे. पोलिसांचा आणखी तपास सुरू असून या तपासातून काय पुढे येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
VSVishnu Sharma
FollowFeb 20, 2026 19:01:340
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 20, 2026 19:00:510
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowFeb 20, 2026 19:00:200
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowFeb 20, 2026 19:00:130
Report
KSKartar Singh Rajput
FollowFeb 20, 2026 18:46:290
Report
KAKapil Agarwal
FollowFeb 20, 2026 18:45:550
Report
ASAkash Sharma
FollowFeb 20, 2026 18:45:400
Report
0
Report
0
Report
ABAnnu Babu Chaurasia
FollowFeb 20, 2026 18:35:290
Report
AKAjay Kumar Rai
FollowFeb 20, 2026 18:34:560
Report
VSVishnu Sharma
FollowFeb 20, 2026 18:32:200
Report
ASAshutosh Sharma1
FollowFeb 20, 2026 18:31:490
Report