Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

मुंब्रा स्थानकावर लोकलमधून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

Shubham Koli
Jun 29, 2025 05:35:12
Thane, Maharashtra
मुंब्रा रेतीबंदर खाडी परिसरात लोकलमधून पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोहम्मद आयान जब्बार अली शेख (वय २२), रहिवासी शिमला पार्क, कौसा मुंब्रा, असे या तरुणाचे नाव आहे. तो मुंबईतील एका कंपनीत इंटर्नशिप करत होता. म्हणूनच सकाळी आपल्या कामावर जाण्यासाठी तो नेहमीप्रमाणे मुंब्रा स्थानकातून लोकलने मुंबईकडे रवाना झाला. मात्र सकाळची प्रचंड गर्दी असल्याने त्याला डब्यात शिरता आलं नाही आणि तो दरवाजात उभा राहून प्रवास करत होता. रेतीबंदर भागातील तीव्र वळणावरून लोकल भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट लोकलमधून खाली रेल्वे पुलावर फेकला गेला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement