Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

शिर्डीच्या साई संस्थानमध्ये बोगस सुरक्षारक्षक भरतीचा मोठा घोटाळा?

Kunal Jamdade
Jun 29, 2025 11:36:22
Shirdi, Maharashtra
Anc - शिर्डीच्या साई संस्थानमध्ये बोगस कर्मचारी भरतीचा आरोप केला जातोय.. माजी सैनिकांच्या नावाने बोगस सुरक्षारक्षक भरती झाल्याचा संशय असून जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीने कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.. V/O - शिर्डीच्या साईबाबा संस्थानमध्ये सुरक्षा विभागात कुशल कर्मचारी म्हणून अनेक माजी सैनिक नोकरी करत आहेत.. सध्या संस्थानमध्ये कंत्राटी पद्धतीने 84 माजी सैनिक सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत.. मात्र हीच नोकरी भरती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.. माजी सैनिकांच्या नावाने बोगस सुरक्षारक्षक भरती झाल्याचा आरोप केला जातोय.. जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीने कागदपत्रांची पडताळणी सुरू केली असून काही जणांकडे माजी सैनिक असल्याचे सबळ पुरावे नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.. त्यामुळे आता जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.. साई संस्थानमध्ये माजी सैनिकांच्या नावाने नोकरभरतीत घोटाळा झालाय का..? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झालाय.. Byte - अशोक दुशिंग, सामाजिक कार्यकर्ते V/O - शिर्डी संस्थानमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या माजी सैनिकांवर होत असलेल्या आरोप जर खरे ठरले तर संस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.. त्यामुळे जिल्हा माजी सैनिक कल्याण समीरचा अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या अहवालामध्ये नेमकं किती कर्मचाऱ्यांनी बोगस कागदपत्र दिले आहे हे स्पष्ट होणार आहे मात्र या प्रकरणामुळे संस्थानच्या नोकर भरतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताय....
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement