Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

डोंबिवलीतील ११० कोटींचा रस्ता का तोडला? नागरिकांचा संताप!

ATISH BHOIR
Jun 28, 2025 08:37:20
Kalyan, Maharashtra
डोंबिवली एमआयडीसीतील नवीन सीमेंट काँक्रीट रस्त्याची तोडफोड ११० कोटींच्या निधीतून झालेल्या रस्त्यांची सेवा वाहिन्या, गटारे किंवा इतर कारणांनी जागोजागी तोडफोड करदात्यांचा पैसा वाया ...पूर्वसूचना न देता काम सुरू करत असल्याने नागरिकांत संताप...अधिकाऱ्यांची चौकशी करत दोषींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी Anc...डोंबिवली एमआयडीसी फेज १ मधील श्री जी लाईफस्टाईल कंपनीसमोरच्या नव्याने बांधलेल्या सीमेंट काँक्रीट रस्त्याची अचानक तोडफोड करण्यात आल्याने स्थानिक रहिवासी आणि उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.या रस्त्यासाठी शासनाने गेल्या तीस वर्षांत पहिल्यांदाच ११० कोटींच्या निधीतून डोंबिवली एमआयडीसीत दर्जेदार रस्त्यांची कामे करण्यात आली होतीया निधीत एमआयडीसी व केडीएमसी यांचा समावेश होता. मात्र, रस्ते पूर्ण होण्याच्या अवघ्या काही महिन्यांतच सेवा वाहिन्या, गटारे किंवा इतर कारणांनी रस्त्यांची तोडफोड सुरू झाल्याने, कोणतीही पूर्वसूचना न देता दोन दिवसांपासून हा मजबूत रस्ता फोडण्यात आल्याने स्थानिकांनी ."नवीन रस्ता का फोडला जातोय? करदात्यांचा पैसा असा वाया घालवणं बंद व्हावं. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवून चौकशी झाली पाहिजे,"अशी मागणी नागरिक करत आहेत. डोंबिवलीतील नागरी प्रशासन, एमआयडीसी व ठेकेदार यांच्यातील समन्वय अभावामुळे रस्त्यांचा दर्जा आणि करदात्यांचा पैसा वाया जात असल्याने दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील जोर धरू लागली आहे आहे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement