Back
विद्यादीप बालगृहात छळ प्रकरण: चौकशी समिती स्थापन!
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn vidya deep issue av
Feed attached
विद्यादीप बालगृहातील कथित छळ प्रकरणानंतर पळ काढणाऱ्या ९ अल्पवयीन मुलींमुळे खळबळ उडाली होती. गाजलेल्या या प्रकरणाची गंभीर दखल घेत महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी चौकशी समिती गठित करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर समितीने शहरात भेट देत बालगृहातील मुलींची चौकशी केली, तर समितीच्या सदस्यांचीही चौकशी केली. चौकशीच्या या टप्यात अधिकाऱ्यांकडून विविध दस्तऐवजांची मागणी करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या समितीत महिला व बालकल्याण विभागाचे सहआयुक्त राहुल मोरे यांच्यासह चार वरिष्ठ अधिकारी सहभागी होते. समितीने प्रथम विद्यादीप बालगृहात जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. बालगृहाच्या अधीक्षकांची चौकशी केली गेली तसेच इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून नोंदींची तपासणी करण्यात आली.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी तालुक्यातील पावसमध्ये आज बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या एका ओमनी गाडीने आज दुपारी अचानक पेट घेतला. पावसमधील रस्त्यावर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत गाडी जळून खाक झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून, ही गाडी मेर्वी गावातील आहे.
0
Share
Report
Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Chaskaman Dam
File'01
Rep: Hemant Chapude(Khed)
ब्रेकिंग – भीमाशंकर, पुणे
भीमाशंकर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची संततधार सुरू
चास कमान धरणात जलसाठा ७३ टक्क्यांपर्यंत पोहोचला
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास उद्या भिमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता
नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
धरण परिसरात सुरक्षा यंत्रणा तैनात, आवश्यक उपाययोजना सुरू
नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
0
Share
Report
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग...
DHARA_R1_SUCIDE
आषाढी वारीतून दोन दिवसांपूर्वीच परतलेल्या 48 वर्षीय वारकऱ्याची आत्महत्या
धाराशिव तालुक्यातील वाघोली गावाच्या काकासाहेब खडके यांनी गळफास घेत संपवलं जीवन
मुलाविरोधात दाखल झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसानी त्रास दिल्यामुळे आत्महत्या केल्याचा
नातेवाईकांचा आरोप
काकासाहेब यांचा मुलगा धीरज काकासाहेब खडके याच्या विरोधात सोनसाखळी चोरीचा बार्शी पोलिसात गुन्हा आहे दाखल
सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचे वडील काकासाहेब खडके यांना चौकशीसाठी बार्शी पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात
चौकशी दरम्यान बार्शी पोलिसांनी केलेल्या मानसिक छळामुळे वारकरी असलेल्या खडके यांनी आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप
आरोपीला आम्ही स्वतः तुमच्या स्वाधीन करतो अशी पोलिसांना विनंती करूनही बार्शी पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली मानसिक छळ करून त्रास दिल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ खडके यांच्यावर आली असल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत...
बाईट...अमर खडके,नातेवाईक
0
Share
Report
Akola, Maharashtra:
Anchor : मोहरम हा इस्लामिक कॅलेंडरमधील पहिला महिना असून शिया मुस्लिम समुदायासाठी हा शोक व श्रद्धेचा काळ आहेय.. यावर्षी मोहरम साजरा करण्यात आले आणि शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले...मोहरमच्या उपलक्ष्याने अकोल्यात इमाम हुसेन यांच्या शहादतीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिया मुस्लिम बांधवांनी इस्लाम धर्माची महत्त्वाची शिकवण व कर्बला युद्धातील त्यागची आठवण करून दिली..मोहरम म्हणजे मुस्लिम समाजाचा नवा वर्ष म्हणूनही मानला जातो..
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - कडेगावच्या गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा उत्साहात संपन्न.
अँकर - हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असणारा सांगलीच्या कडेगावचा मोहरम मोठ्या उत्साहात साजरा झाला.मोहरम निमित्ताने गगनचुंबी ताबूत भेटींचा सोहळा मोठया जल्लोषात पार पडला. हिंदू आणि मुस्लिम बांधवांकडून शेकडो वर्षांपासून कडेगाव मध्ये मोहरम सण साजरा केला जातो, या निमित्ताने गगनचुंबी 100 ते 150 फुटी मानाच्या ताबूत भेटींचा सोहळा देखील पार पडला,शहरातल्या बाबा देशमुख चौकामध्ये हा गगनचुंबे ताबूत भेटींचा सोहळा संपन्न झाला,या निमित्ताने कडेगावसह पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते.
0
Share
Report
Buldhana, Maharashtra:
बुलढाणा -
*# हर्षवर्धन सपकाळ ऑन संजय गायकवाड....*
त्यांना या आधीच वाचाळ वीर ही पदवी देण्यात आलेली आहे.... आणि महापुरुषांचा अपमान करण्याचं काम या वाचाळ वीरांना नेमून देण्यात आलेला आहे.... ही दुर्दैवी वैचारिक दिवाळखोरी आहे....
*# on MVA.....TVA....*
शिंदे यांच्याशी संबंधित असलेले लोक कालपासून सुतकात आहेत.... त्यांची हवा गोल झालेली आहे... अनेक वर्षापासून अनेक संघर्षात काँग्रेस हा पक्ष देशाच्या संविधान टिकवून ठेवण्यासाठी उभा आहे त्यामुळे अशी वक्तव्य आमच्यासाठी नवीन नाहीत....
*# on आगामी निवडणुका...*
आगामी निवडणुका स्वबळावर लढायच्या किंवा कसे यावर निर्णय घेण्याची जबाबदारी आम्ही स्थानिक पातळीवर दिलेली आहे...
# ठाकरे बंधू हे कोणकोणत्या मुद्द्यांवर एकत्र आले आहे हे जसं जसं समोर येईल तसं तसं आम्ही वरिष्ठ नेतृत्वाची बोलून पुढील दिशा ठरवू...
# ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याचे निमंत्रण मला एक दिवसापूर्वीच मिळालं होतं मात्र माझ्या पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी जाऊ शकलो नाही...
# हिंदी सक्तीच्या विरोधाला राजकीय पक्ष विविध संघटना यांच्या सोबतच काँग्रेस पक्षाने सर्वात प्रथम विरोध केला होता........ *विजय मेळाव्याला जाणे न जाणे हा दुय्यम भाग आहे मात्र आगामी काळात मराठी भाषा वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे.....*
---------
बाईट्स - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
0
Share
Report
Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 0607ZT_INDAPURACCIDENT
FILE 2
भिगवण मध्ये दुचाकीला वाहनाची धडक,दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू..
अपघात सीसीटीव्हीत कैद...
Anchor_पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये दुचाकी ला अपघात झालाय. यात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे.मल्हारी पवार असं मृत व्यक्तीचं नाव असून तो श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावचा असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या MH 16 AG 2343 या दुचाकी ला चार चाकी वाहनाने जोराची धडक दिली यात मल्हारी पवार यांना गंभीर दुखापत झाली. यात पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघात ग्रस्त चार चाकी वाहन फरार झालं आहे. अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
0
Share
Report
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 0507ZT_DAUNDCCTV
FILE 1
स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद..... पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने आरोपींना केलं घेतलं ताब्यात..... आरोपींना ताब्यात घेतानाच सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.... 30 जून रोजी पहाटे सभा चार वाजता घडली होती भयानक घटना
Anchor_पुण्याच्या दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अत्याचार प्रकरणातील दोन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. समीर उर्फ लकी पठाण आणि विकास सातपुते अशी आरोपींची नावे असून या दोघांनाही पोलिसांनी आता जेरबंद केलं आहे.
रांजणगाव येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल आहे आणि या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलं आहे. यातील समीर उर्फ लकी पठाण हा माळशिरस तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे तर दुसरा आरोपी विकास सातपुते हा इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील असल्याची सूत्रांची माहिती आहे.
पोलिसांच्या पथकाला रांजणगाव या ठिकाणी आरोपी थांबला आहे याची खबर मिळाली होती आणि त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली आहे आणि या कारवाईची ही सीसीटीव्ही दृश्य समोर आली आहेत.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
कल्याण खडकपाडा पोलिसांची कारवाई
विना परवाना गावठी कट्टा आणि पोलिस गणवेश बाळगणाऱ्यास अटक
Anchor - विना परवाना गावठी कट्टा आणि पोलिस गणवेश बाळगणाऱ्यास खडकपाडा पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव सनीकुमार विजय पाल उर्फ चौहाण असे आहे. तो कल्याणच्या मिलिंदनगर परिसरात राहत होता.
Vo...खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गौरीपाडा मिलिंदनगर परिसरात एक व्यक्ती पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. खडकपाडा पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय गायकवाड यांनी 3 जुलै रोजी सापळा रचला. त्याठिकाणी एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे नाव सनीकुमार विजय पाल उर्फ चौहाण असे होते. त्याच्याकडे गावठी कट्टा मिळून आला. त्याच्या घरीचा झडती घेतली असता. त्याच्या घरी पोलिसांचे दोन जोडी गणवेश आढळून आले. गणवेशासोबत एक स्टारही मिळून आले. त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या इंस्टाग्रामवर त्याने पोलिसाचा गणवेश घालून हाती गावठी गट्टा घेत एक फोटोही पोस्ट केला आहे.
Byte :- कल्याणजी घेटे ( एसीपी )
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0607ZT_WSM_ZEE_NEWS_IMPACT
रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अमानी ते करंजी मार्गाची अत्यंत खराब अवस्था होती.रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि चिखलामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.झी 24 तासने ही बातमी प्रसारित केल्यानंतर बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेत रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू केले. या सकारात्मक बदलामुळे गावकऱ्यांनी झी 24 तासचे आभार मानले आहेत.
0
Share
Report