Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

आषाढी एकादशी: मुंबईत भव्य दिंडीने गाजवली यात्रा!

HARSHAD PATIL
Jul 06, 2025 17:30:10
Palghar, Maharashtra
Aanchor - आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने मुंबईतील मागाठाणे ते वाडा तालुक्यातील मिनी वृंदावन म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोवर्धन इको व्हिलेज पर्यंत वृंदावन यात्रा आयोजित करण्यात आली. टाळ मृदूंग आणि विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात भव्य दिंडी काढण्यात आली. यावेळी विठ्ठल-रखुमाई, राधा-कृष्ण आणि शिव-पार्वतीच्या वेशभूषा केलेले भाविक दिंडीचे प्रमुख आकर्षण होते. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि मागाठाणे उपविभाग प्रमुख मंगेश पांगारे यांच्या पुढाकाराने आयोजित यात्रेत मागाठाणे विभागातील तीन हजारोपेक्षा जास्त भाविक सहभागी झाले होते. महिलांनी फुगड्याचा आनंद घेत गोवर्धन इको व्हिलेजच्या प्रवेश द्वारावर रिंगण सोहळा पार पडल्यानंतर दिंडीचा समारोप करण्यात आला. Byte: राज सुर्वे, आयोजक.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement