Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

वसमतच्या हळद संशोधन केंद्राने शेतकऱ्यांसाठी बदल घडवला!

GAJANAN DESHMUKH
Jul 03, 2025 13:04:57
Parbhani, Maharashtra
अँकर- हिंगोलीच्या वसमत येथे माननिय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. या संशोधन केंद्रात निरोगी, सशक्त आणि गुणवत्तापूर्ण हळद रोपांची निर्मिती करण्यात आली होती. या हळद रोपांना शेतकरी वर्गात चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या टप्यात 1 लाख 5 हजार रोपांची शेतकऱ्यांनी उचल करीत त्यांच्या शेतामध्ये लागवड केली आहे. यावर्षी 2 लाखांहून अधिक सेलम या मुख्य वाणासह फुले,स्वरूपा, पी डी के व्ही वायगाव, मेदुकर, एसबी १०८४३, रोमा, दुग्गीराला रेड, सुदर्शना या वाणांची रोपे तयार केली. या वाणांची निवड करताना अनुकूल वातावरण,किड व रोगांना कमी बळी पडणारे, वाढीचा कालावधी हा कमी, मध्यम व जास्त कालावधी, अधिक प्रमाणात कुरकुमीन असलेले, हळद पावडरसाठी उत्कृष्ट असलेले वाण निवड करून उपलब्ध करून दिले आहेत.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement