Back
जालना शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन: सरकारला दया येईल का?
NMNITESH MAHAJAN
FollowJul 03, 2025 13:39:00
Jalna, Maharashtra
FEED NAME | 0307ZT_JALNA_FARMER_ANDO(5 FILES)
जालना | विहीरीत उड्या मारून जालना - नांदेड समृद्धी महामार्ग बाधीत शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन.
जालना - नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याची मागणी...
अँकर | जालन्यात जालना - नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय.देवमूर्ती येथील विहीरीत उड्या मारून हे आंदोलन करण्यात आलं. जालना - नांदेड समृद्धी महामार्गात संपादित करण्यात आलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. जालना - नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा मिळावा या मागणीसाठी मागील 62 दिवसांपासून जालन्याच्या देवमूर्ती येथे बाधित शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र, अजून पर्यंत शासनानं शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेतलेली नाहीये. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज देवमूर्ती येथे विहिरीत उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन केलय. राज्य सरकारने लवकरात लवकर जालना - नांदेड समृद्धी महामार्गात केलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याची मागणी यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowJul 13, 2025 09:34:11Nashik, Maharashtra:
nsk_murder
feed by 2C
image 1 video 2
विशाल मोरे, बागलाण ( नाशिक )*
- *
Anc: बागलाण तालुक्यातील दरेगाव येथे एका आदिवासी शेतमजुराचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. पतीच्या सततच्या मारहाणीला कंटाळून पत्नीनेच त्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक कबुली दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जायखेडा पोलीसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे. जायखेडा पोलीसांच्या हद्दीत कैलास जिभाऊ पवार वय ४५ हे घराच्या पाठीमागील बाजूस मृत अवस्थेत मिळून आल्याने हत्या की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क लावले जात होते.
घटनास्थळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. पंचनामा करून मयत कैलास जिभाऊ पवार याचा मृतदेह नामपूर ग्रामिण रुग्णालय पाठवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोद दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखुन जायखेडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गावात दाखल झाले. प्राथमिक तपासात मृताची पत्नी मनीषा हिची कसून चौकशी केली असता, कैलास आपल्या चारित्र्यावर संशय घेत असे आणि वारंवार मारहाण करीत होता. या त्रासाला कंटाळूनच तिने त्याचा खून केल्याची कबुली दिल्याने पोलीसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 13, 2025 09:34:04Nashik, Maharashtra:
nsk_salherunesko
feed by 2C
साल्हेर किल्ला स्टोरी: विशाल मोरे, बागलाण ( साल्हेर )*
-
Anc: ते म्हणतात ना की स्वर्ग खूप सुंदर आहे... पण जमिनीवरचा स्वर्ग बघायचा तर नक्की साल्हेर किल्ल्यावर यावे... सुंदर असे निसर्गरम्य वातावरण, धुके वरून पडणारा पाऊस... आणि त्या जमिनीचा सुगंध जणू छत्रपती शिवाजी महाराजांच्या व मावळ्यांचा पराक्रमाची साक्ष देतो... युनेस्को मध्ये या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याची निवड झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी देखील जल्लोष करत सरकारचे आभार मानले. याआधीच गुजरात, महाराष्ट्र येथील पर्यटकांनी, इतिहास प्रेमींनी या किल्ल्याला भेट देत निसर्ग रम्य वातावरणाचा आनंद लुटला...
*बाईट: पर्यटक*
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 13, 2025 09:33:45Raigad, Maharashtra:
स्लग – रायगडात शिवसेनेच्या पदाधिकारयांमध्येच जुंपली ......... राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर प्रमोद घोसाळकरांचा आरोप ........ सुनील तटकरे आमीष दाखवून आपचे पदाधिकारी नगरसेवक फोडतात ......... तटकरेंवर आरोप करताना घोसाळकरांचा आपल्याच पदाधिकारी नगरसेवकांवर संशय ........ घोसाळकरांच्या आरोपांमुळे शिवसेनेचे राजीव साबळे संतापले ........ घोसाळकर यांना कायदेशीर नोटीस बजावणार
अँकर – रायगड जिल्हयात सध्या महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून विस्तव जात नाही अशी स्थिती असतानाच आता शिवसेनेच्याच पदाधिकारयांमध्ये जुंपल्याचे पहायला मिळते. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर पक्ष फोडाफोडीचा आरोप करताना शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी आपल्याच पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांवर संशय व्यक्त केलाय. शिवसेना प्रवक्ते राजीव साबळे आणि माणगावमधील नगरसेवकांना अमीष दाखवून सुनील तटकरे आपल्याकडे खेचत असल्याचा आरोप घोसाळकर यांनी केलाय. यावर शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे चांगलेच संतापले आहेत. घोसाळकर राष्ट्रवादीत गेले होते त्यामुळे पैसे देतात की नाही हे त्यांना माहीत असेल. आम्हाला कुणीही आमिष दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. घोसाळकर यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
बाईट - प्रमोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख शिवसेना
बाईट - राजीव साबळे, प्रवक्ते शिवसेना
3
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 13, 2025 09:30:30Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1307_BHA_DEATH
FILE - 1 VIDEO, 4 IMAGE
विहिरीतील विषारी वायू मुळे एकाचा मृत्यू
Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील एका शेतामध्ये मोटार पंप दुरुस्ती करण्यासाठी छगन गोटेफोडे हा विहिरीत उतरला. विहिरीत विषारी वायू असल्यानं छगन हा बेशुद्ध अवस्थेत विहिरीत पडला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने छगन याला विहिरी बाहेर काढण्यात आलं असताना त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.
0
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 13, 2025 09:09:17Jalna, Maharashtra:
FEED NAME | 1307ZT_JALNA_KHOTKAR(1FILE)
जालना : संजय राऊत यांनी तोंड बंद करावं, राऊत एकनाथ शिंदेंमुळेच खासदार :अर्जुन खोतकर
अँकर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खासदार संजय राऊत यांच्याकडून दररोज टिका केली जातीय.त्यामुळे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रहार करण्यात आलाय.राऊत यांच्याकडून उसनं अवसान आणण्याचा प्रयत्न केला जात असून राऊत यांनी त्यांचं तोंड बंद करावं ते एकनाथ शिंदेंमुळेच खासदार असल्याचा दावा खोतकर यांनी केलाय
बाईट : अर्जुन खोतकर, आमदार,शिवसेना, जालना
5
Share
Report
MKManoj Kulkarni
FollowJul 13, 2025 09:02:15Mumbai, Maharashtra:
अँकर -- मनसेचा आज गटाध्यक्ष मेळावा चेंबूर येथे पार पडत आहे.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून गटाध्यक्षांच्या सोबत संवाद साधला जात आहे.आज पूर्व उपनगरातील चेंबूर आणि अणुशक्ती नगर येथील गटाध्यक्षांसोबत संवाद बाळा नंदगावर साधत आहे
या संवाद मेळाव्यात थेट मनसेची केंद्रीय समिती गटाध्यक्ष यांनी आता पर्यंत केलेली आणि न केलेली कामे याची उजळणी आणि अहवालावर चर्चा करत आहे
मला रिजल्ट हवा आहे तोही कागदावर अस मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा गटाध्यक्षांच्या संवादात म्हटलं आहे.मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी माध्यमातून सुरू आहे.
मनोज कुळकर्णी
Vdo २C
0
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 13, 2025 08:34:38Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1307_BHA_ACCIDENT
FILE - 2 VIDEO 4 IMAGE
भंडाऱ्याच्या खापा परिसरात भरधाव ट्रॅक्टर शिरले चहाच्या टपरीत....
ANCHOR :- भंडाऱ्याच्या तुमसर ते खापा जाणाऱ्या रस्त्यावरुन जात असलेला एका भरधाव ट्रॅक्टरचे नियंत्रण जाऊन चहाच्या टपरीत धडकले दरम्यान खापा येथील लक्ष्मण हलमारे हे या अपघातात गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कारवाई केली.
0
Share
Report
APAMOL PEDNEKAR
FollowJul 13, 2025 08:31:22Mumbai, Maharashtra:
Break
कांजूरमार्ग पूर्वेकडील एन जी रॉयल पार्क मधील बिल्डिंगच्या इलेक्ट्रिक डक मध्ये लागली आग
सोळाव्या मधल्या वरील इलेक्ट्रिक डक ला आग लागून आग पसरत अठरा माळापर्यंत पोहोचली
घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल अग्निशामक दलाकडून आग विधानाचे प्रयत्न सुरू
आग लागल्यामुळे बिल्डिंग मधील नागरिकांना बिल्डिंग केली संपूर्ण रिकामी
0
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 13, 2025 08:31:16kolhapur, Maharashtra:
नागपूर
साउंड बाईट - नितीन गडकरी केंद्रिय मंत्री.
- सहा महिन्यात धापेवाडा टेक्सटाईलच्या काम पूर्ण होणार आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांनी येताना धापेवाडात तयार सिल्कच्या साडी घालून येण्याचं विनंतीही केल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलीय.
- ते नागपुरात ऍग्रोव्हिजनच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणालेत..
- धापेवाडा टेक्स्टाईलमध्ये सिल्कच्या साडी तयार होत आहे. ज्या साडीची किंमत बाजारात 2 ते 3 हजारात आहे. ती साडी अवघ्या 400 रुपयात देणार आहे. जेणेकरून सर्व समान्य महिला सुध्दा त्या साड्या विकत घेऊ शकणार आहे..
- त्या साड्यांच मुंबईत प्रेझेंटेशन नुकतेच करण्यात आले..त्या साड्यांची प्रिंटिंग झारखंडला केली. त्यासाडीसाठी मागणी इतकी आहे की आता 200 साड्यांची वेटिंग लिस्ट आहे..
- या साड्यांची जाहिरात व्हावी यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांनाही बोलावल आहे. विशेष म्हणजे त्यांनी धापेवाड्यात तयार झालेली साडी घालूनच्या कार्यक्रमला यावे.... जेणेकरून ऍडव्हरटाईज होईल अशी विनंती केली असल्याचं केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगीतल..
- नागपूर आणि विदर्भात हात मागसाठी प्रसिद्ध होते. आता पुन्हा इलेक्ट्रॉनिक हँडल्युमवर कॉटनची साडी तयार केली जात आहे.. तेही अगदी 400 रुपयात विकली जाणार आहे...ज्या साड्यांची किंमत बाजारात दोन ते तीन हजाराची आहे.. ती फक्त चारशे रुपये तयार होणार आहे. यासाठी महिलांना 60 रुपये मजुरी दिली जाणार असेही गडकरी म्हणालेत..
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 13, 2025 08:30:27Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - गुरुपौर्णिमेनिमित्त तब्बल तीन लाख भाविकांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन, डिजिटल यंत्राद्वारे करण्यात आली मोजणी
- गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी तब्बल तीन लाख भाविकांची हजेरी
- नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आलेल्या डिजिटल यंत्राद्वारे भक्तांची करण्यात आली मोजणी
- मंदिरातील चार मुख्य प्रवेशद्वारांवर बसवण्यात आले होते अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे
- स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस हजारोच्या संख्येने भक्तांची संख्या वाढत असल्याने घेण्यात आला डिजिटल यंत्रणेचा आधार
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 13, 2025 08:08:28Kalyan, Maharashtra:
ठाकरे गटाने डोंबिवलीत खड्ड्यात झाडं लावून नोंदवला केडीएमसी प्रशासनाचा निषेध
Anchor :- यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवली मधील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे .
डोंबिवली पश्चिम येथील सुभाष रोड आणि महात्मा फुले रोड वर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागतेय. याबाबत केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र प्रशासन तात्पुरती डागडुजी करते मात्र पुन्हा पावसात या रस्त्यांवरील खड्डे डोके वर काढतात त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो या निषेधार्थ ठाकरे गटाने महात्मा फुले रोडवर पडलेला खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत प्रशासनाचा निषेध नोंदवला प्रशासनाने खड्ड्यांबाबत तोच निर्णय घेतला नाही तर इथून पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील ठाकरे गटाने दिला
Byte :- प्रकाश तेलगोटे (शिवसेना ठाकरे गट शहर प्रमुख)
7
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 13, 2025 08:00:39Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ मध्ये बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रा सुरू असून यात्रेच्या सातव्या दिवशी स्वतः बच्चू कडू आणि पद यात्रेत सहभागी शेतकरी शेतमजुरांनी डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून सहभाग नोंदविला आहे.
रोज शेतकरी मरत आहेत, दिव्यांग, भोई, मेंढपाळ आदींवर अन्याय होत आहे. असे असताना डोळे असलेल्या सरकारला शेतकरी जनतेचे हाल दिसत नाहीत. मुख्यमंत्र्यांशी अनेकदा संपर्क करूनही ते कर्जमाफीचा निर्णय घेत नाहीत, त्यामुळे त्यांचे डोळे उघडण्यासाठी डोळ्याला पट्टी बांधून पदयात्रा निघाली असल्याचे बच्चू कडूंनी सांगितले.
बाईट : बच्चू कडू
0
Share
Report
MNMAYUR NIKAM
FollowJul 13, 2025 08:00:20Buldhana, Maharashtra:
बुलढाणा*
Story- विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर अन्न औषध प्रशासनाने कारवाई न केल्याने आमदार संजय गायकवाड संतप्त..
थेट अन्न व औषध प्रशासन मंत्र्याला फोन करून कारवाई करण्याची केली मागणी..
Anchor - बुलढाण्याच्या येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना कढी भात खाल्ल्यामुळे विषबाधा झाली होती..त्यापैकी तेरा विद्यार्थिनींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार होऊन त्यांना सुट्टी देण्यात आली.., मात्र अन्न व औषध प्रशासनाला याची कल्पनाच नाही, त्यामुळे अजूनही संबंधित आश्रम शाळेत जाऊन कारवाई न केल्यामुळे , आमदार संजय गायकवाड चांगलेच संतापले, आणि त्यांनी थेट अन्न व औषध मंत्र्यांना फोन करून कारवाईची मागणी केली आहे..
बाईट - संजय गायकवाड, आमदार बुलढाणा..
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 13, 2025 07:30:25Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1307ZT_WSM_COTTON_CROP_DISEASES
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यातील काजळेश्वर परिसरात वाणी किडीने उच्छाद मांडला असून,नव्याने उगवून आलेली कपाशीची कोवळी झाडं या किडीच्या प्रादुर्भावामुळे पूर्णपणे फस्त झाली आहेत.परिणामी,अनेक शेतकऱ्यांना कपाशीची दुबार लागवड करण्याची वेळ आली आहे. कपाशीची लागवड मोठ्या आशेने करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून,आर्थिक दृष्ट्या त्यांच्यावर मोठा ताण आला आहे.कीटकनाशकांची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत,त्यामुळे कृषी विभागाकडे त्वरीत उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.
1
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 13, 2025 06:35:33Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - गावातल्या रस्त्याच्या दुरावस्थेवरून तरुण शेतकऱ्यांचे थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना साद..
अँकर - सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्ली येथील रस्त्यासाठी एका तरुणाने चक्क मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना साद घातली आहे.बुर्ली गावातील पदाप्पा मळा या ठिकाणी वस्तीवर पक्का रस्ता नसल्याने नसल्याने चिखलातून वाट काढत जावे लागत आहे.पावसामुळे रस्ता चिखलमय व खड्डेमय बनल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालं आहे.यामुळे शेतकरी,ग्रामस्थ,शालेय विद्यार्थ्यांसह वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जावं लागत आहे.गेल्या पंधरा वर्षांपासून रस्त्याचं काम करण्याचा आश्वासन लोकप्रतिनिधींकडून देण्यात येत आहे,मात्र अद्याप देखील हा रस्ता करण्यात आला नाही,
प्रशासनाकडुन ही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे आरोप करत बुर्ली गावातील तरुण शेतकरी निलेश भोसले यानी रस्त्याचा अवस्थेचा व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर व्हायरल करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्याची दखल घेऊन,तातडीने रस्ता करून द्यावा,अशी मागणी केली आहे.
बाईट - निलेश भोसले - तरुण शेतकरी - बुर्ली, पलूस.
13
Share
Report