Back
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा: गरोदर महिलेला पैसे मागितले!
Kalyan, Maharashtra
कल्याणमध्ये महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघड
गरोदर महिलेल्या माराव्या लागतं आहे फेऱ्या...
घरावर झुकलेल्या झाडाची छाटणी साठी तात्पुरता वीज खंडित करण्याच्या मागणी साठी महिल्याच्या फेऱ्या..
पैशांची मागणी केल्याचा गरोदर महिलेचा आरोप..
Anchor :- ग्राहकांची अरेरावी करण्यासाठी कायमच चर्चात असलेले महावितरणचे कर्मचारी पुन्हा वादात सापडले आहेत.कल्याण पत्री पूल परिसरात एका गरोदर महिलेचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे. या गरोदर महिलेच्या घरावर मागील काही दिवसांपासून एक मोठं झाड कोसळण्याच्या स्थितीत असून, ते हटवण्यासाठी तिच्या कुटुंबाने महावितरण कार्यालयाकडे वीजपुरवठा खंडित करण्याची विनंती केली होती. मात्र, या कामासाठी महावितरण कर्मचाऱ्यांकडून पैसे मागण्यात आल्याचा आरोप केला आहे.
Vo..दरम्यान पीडित गरोदर महिलेने स्वतः व्हॉइस रेकॉर्डिंगद्वारे हे प्रकरण उजेडात आणले असून, तिच्या म्हणण्यानुसार, विज खंडित करून झाड हटवण्याच्या कामासाठी तिने एमएसईबी कर्मचाऱ्याला ५ हजार रुपये दिले. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी झाड कापण्यासाठी २५ हजार रुपये लागतील, अशी मागणी करत टाळाटाळ केली.
दरम्यान, ही बाब समजताच स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कल्याणमधील टाटा पॉवर कार्यालयात पोहोचले. घटनेची चौकशी करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले, मात्र त्यांना कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ थांबवण्याची जबरदस्ती, तसेच "व्हिडिओ का काढताय , "पोलिसांना बोलावतो" अशा धमक्यांना दिल्या .या प्रकरणामुळे महावीतरण कर्मचारी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, एका गरोदर महिलेच्या सुरक्षिततेशी खेळ करून पैसे कमावण्याचा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे.दोषी महावितरण अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन करून त्यांची चौकशी करण्याची केली मागणी
Byte :-रुक्सना अन्सारी ( गरोदर महिला)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement