Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421505

उल्हासनगरात खड्ड्यांमुळे दुचाकीवरील दाम्पत्याचा धक्कादायक अपघात!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 03, 2025 15:03:15
Ambernath, Maharashtra
उल्हासनगरात खड्ड्यांमुळे दुचाकीवरील दाम्पत्याचा  अपघात खड्ड्यांमुळे गाडी स्लिप होऊन लहान मुलासह पडले एकाच ठिकाणी पुन्हा एकदा अपघात , अपघातानंतरही प्रशासनाला जाग नाही  अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद Ulh accident cctv Anchor : उल्हासनगरात दुचाकीवरील दाम्पत्याचा खड्ड्यांमुळे अपघात होऊन ते लहान मूलासह खाली पडल्याची घटना घडली. १७ सेक्शन चौकात घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धक्कादायक म्हणजे याच ठिकाणी आठवड्यापूर्वी एका लहान बाळासह दांपत्याचा अपघात झाला होता ,  Vo : उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर रस्त्यावर १७ सेक्शन परिसरातून एक दाम्पत्य दुचाकीवर जात असतानाच सिमेंट रस्त्याच्या कडेला असलेला खड्डा चुकवण्याच्या नादात  दुचाकी स्लिप झाली आणि हे दाम्पत्य खाली कोसळलं. या दाम्पत्याचा लहान मुलगा ही दुचाकीवर समोर बसला होता . सुदैवाने दुचाकीचा वेग जास्त नसल्यामुळे कुणाला फारशी इजा झाली नाही. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, मात्र मागील आठवड्यात याच ठिकाणी अपघात झाल्यानंतर ही अजूनही प्रशासनाला खड्डे बुजवण्याची सुबुद्धी सुचली नाहीये, त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement