Back
धुळे शाळेत मुलांना फी न दिल्याने पालकांचा संताप!
Dhule, Maharashtra
ANCHOR - धुळे शहरातील वलवाडी शिवारामध्ये एका शाळेने मुलांना फि न दिल्यामुळे डाबून ठेवण्याचा धक्कादायक आरोप पालकांनी केला आहे. धुळे शहरातील वलवाडी शिवारात असलेले चावरा इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी मुलांना फी साठी डाबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे, हा प्रकार संबंधित पालकांना लक्षात आल्यानंतर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपंळकर यांनी चावरा शाळेत येऊन मुलांना डाबून ठेवण्याचा प्रकरा बद्दल जाब विचारला. मात्र मुख्याध्यापक उपस्थित नसल्याने सुमारे दोन ते तीन तास भाजपाचे शहराध्यक्ष गजेंद्र अंपंळकर पालकांसह शाळेत ठिय्या मांडून बसले होते, सदर घटनेचा सीसीटीव्ही फुटेज द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. परिस्थितीतचे गांभीर्य लक्षात घेऊन, यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासह पश्चिम पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील उपस्थित होते, मुलांना फी साठी डाबून ठेवण्याचा प्रकार निंदनीय असल्याने या ठिकाणी पालकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. या प्रकरणामध्ये आपण योग्य ते तक्रार केली असून शिक्षण विभागाने कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली
byte - गजेंद्र पपळलकर, शहरजिल्हाध्यक्ष, भाजप
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात खड्ड्यांमुळे दुचाकीवरील दाम्पत्याचा अपघात
खड्ड्यांमुळे गाडी स्लिप होऊन लहान मुलासह पडले
एकाच ठिकाणी पुन्हा एकदा अपघात , अपघातानंतरही प्रशासनाला जाग नाही
अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद
Ulh accident cctv
Anchor : उल्हासनगरात दुचाकीवरील दाम्पत्याचा खड्ड्यांमुळे अपघात होऊन ते लहान मूलासह खाली पडल्याची घटना घडली. १७ सेक्शन चौकात घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धक्कादायक म्हणजे याच ठिकाणी आठवड्यापूर्वी एका लहान बाळासह दांपत्याचा अपघात झाला होता ,
Vo : उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर रस्त्यावर १७ सेक्शन परिसरातून एक दाम्पत्य दुचाकीवर जात असतानाच सिमेंट रस्त्याच्या कडेला असलेला खड्डा चुकवण्याच्या नादात दुचाकी स्लिप झाली आणि हे दाम्पत्य खाली कोसळलं. या दाम्पत्याचा लहान मुलगा ही दुचाकीवर समोर बसला होता . सुदैवाने दुचाकीचा वेग जास्त नसल्यामुळे कुणाला फारशी इजा झाली नाही. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, मात्र मागील आठवड्यात याच ठिकाणी अपघात झाल्यानंतर ही अजूनही प्रशासनाला खड्डे बुजवण्याची सुबुद्धी सुचली नाहीये, त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत
चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: विविध मागण्यांसाठी वाहतूकदारांचे आंदोलन सुरूच, दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा दिला इशारा.
transporter strike
FTP slug - nm state transporter strike
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: वाहतूकदारांकडून होणारी अन्यायकारक दंड वसुली आणि ई चलनावर लावलेले दंड माफ करावे याच्यासह इतर अन्यायकारक कायद्या विरोधात वाहतूकदारांनी स्व-इच्छेनुसार बेमुदत चक्कजाम आंदोलन पुकारले असून हे आंदोलन मागण्या मान्य होई पर्यंत मागे घेणार नसल्याचे आज आयोजित पत्रकार परिषदेत वाहतूकदारांनी घोषित केलेय. उद्या पासून या बंदची तीव्रता वाढताना पहायला मिळणार अत्यावश्यक सेवेवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय. वाहतूकदार बचाव कृती समितीतर्फे एपीएमसी बाजार आवारात पत्रकार परिषद घेत राज्य सरकारने आमचे आंदोलन गांभीर्याने न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल ज्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होणार असून तात्काळ आंदोलनाची दखल घेत प्रमुख मागण्या मान्य करण्याचे आवाहन वाहतूकदारांमार्फत करण्यात आलेय.
तर ट्रॅफीक पोलीस वाहतुकदारांना कसे लुटतात याबाबत वाहतूक दारांनी माहिती दिली
बाईट -:उदय बुरगे
बाईत - वाहनचालक
बाईट - वाहन चालक
-----------
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0307_BHA_EO_ARRESTED
FILE - 4 VIDEO, 1 IMAGE
अखेर फरार शिक्षणाधिकारी रवींद सलामे यांना अटक
Anchor : शिक्षक भरती घोटाळ्यात अटकसत्र सुरू असतानाच नागपूर येथील सदर पोलीस ठाण्यात आणखी एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा (सध्या नेमणूक शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय गडचिरोली) कार्यालयातील अधीक्षक आरोपी रवींद्र पंजाबराव सलामे यांना आज अटक करण्यात आली.
सलामे यांच्यावर नागपूर पोलिसांत भादंविचे कलम 420, 465, 468, 471, 472, 409, 120 ब, 34 या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून ६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी पराग नानाजी पूडके राहणार लाखनी हा कधीही कोणत्याही शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक पदावर नियुक्तीच नसताना त्याचे नानाजी पूडके विद्यालय जेवणाळा या शाळेतील मुख्यध्यापक पदाचे नियुक्ती करीता त्याने बनावट शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांचे नियुक्ती मान्यता आदेश, सेवा सातत्य, एस के. बी शाळा यादव नगर नागपूर या शाळेचे लेटरहेडवर बनावट अनुभव प्रमाणपत्र तयार केले होते. गुन्ह्यातील अटक आरोपी महेंद्र म्हैसकर याचे सोबत कट कारस्थान रचून व गैर व्यवहार करून तयार करून सलामे यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते. त्यानूसार शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे यांना अटक करण्यात आली आहे.
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
बदलापुरात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इसमावर गोळीबार
चार जणांनी गोळीबार केल्याची माहिती
बदलापूर पश्चिम पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात
Bdl firing
Anchor : बदलापुरात एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इसमावर चौघांनी गोळीबार केल्याची घटना घडलीये. बदलापूर गावातील आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर गुरुवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.
Vo : अल्ताफ शेख असं या गोळीबारात जखमी झालेल्या इसमाचं नाव असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अल्ताफ हा बदलापूर गावाकडून बोराड पाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना तिथे आलेल्या चार इसमांनी त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात अल्ताफ हा जखमी झाल्याने त्याला बदलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत एका इसमाला ताब्यात घेतलं असून त्याच्या उर्वरित साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.
Byte : सचिन गोरे, पोलीस उपायुक्त
चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
अँकर -- काल बुधवारी वांद्रे पोलीस ठाणे हद्दीत समुद्राच्या पाण्यात बुडणाऱ्या महिलेस कर्तव्यावरील पोलीस अंमलदार यांनी जीवनदान दिले आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गॅलेक्सी अपार्टमेंट, येथे वॉचर म्हणून नेमणुकीस असलेले वांद्रे पोलीस ठाण्याचे कर्मचारी साईनाथ देवडे हे गॅलेक्सी अपार्टमेंट समोर असलेल्या प्रमोनेड परिसरात गस्त करीत असताना त्यांना समुद्राच्या पाण्यात एक महिला बुडताना दिसली त्यांनी त्वरित धावत जाऊन पाण्यात उडी मारून त्या महिलेस पाण्याबाहेर काढले. सदर महिला अर्धवट शुद्धीवर असल्याने तिला त्वरित वांद्रे येथील भाभा हॉस्पिटल येथे नेण्यात आले.तिला शुद्धीवर आल्यावर चौकशी केली असता महिलेचे नाव व्हेनेनटीया सरिता क्रासटा, वय 53 वर्ष, , वांद्रे पश्चिम येथील रहिवासी अलस्ताचे सांगितले.पोलिसाना मिळालेल्या माहितीनुसार ती मनोरुग्ण आहे व गेल्या 20 वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ती बँडस्टँड परिसरात फिरत असताना कोणीतरी अदृश्य शक्ती तिचा पाठलाग करीत आहे असे तिला जाणवले व घाबरून तिने समुद्राच्या पाण्यात उडी मारली.
मनोज कुळकर्णी
Vdo attach २C
0
Share
Report
Pune, Maharashtra:
अहिल्यानगरच्या महात्मा फुले चौकात भीषण अपघात...
आयशर टेम्पो चालकाला फिट आल्याने, एक फोर व्हीलरसह आठ ते दहा मोटर सायकल चिरडल्या...
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली घटना...
अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद...
सुदैवाने कोणतेही जीवितहानी नाही...
अपघातात मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान...
बाईट:- प्रकाश भागानगरे, प्रत्यक्षदर्शी
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0307ZT_JALNA_FARMER_ANDO(5 FILES)
जालना | विहीरीत उड्या मारून जालना - नांदेड समृद्धी महामार्ग बाधीत शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन.
जालना - नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याची मागणी...
अँकर | जालन्यात जालना - नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय.देवमूर्ती येथील विहीरीत उड्या मारून हे आंदोलन करण्यात आलं. जालना - नांदेड समृद्धी महामार्गात संपादित करण्यात आलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. जालना - नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा मिळावा या मागणीसाठी मागील 62 दिवसांपासून जालन्याच्या देवमूर्ती येथे बाधित शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र, अजून पर्यंत शासनानं शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेतलेली नाहीये. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज देवमूर्ती येथे विहिरीत उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन केलय. राज्य सरकारने लवकरात लवकर जालना - नांदेड समृद्धी महामार्गात केलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याची मागणी यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
कल्याणमध्ये महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघड
गरोदर महिलेल्या माराव्या लागतं आहे फेऱ्या...
घरावर झुकलेल्या झाडाची छाटणी साठी तात्पुरता वीज खंडित करण्याच्या मागणी साठी महिल्याच्या फेऱ्या..
पैशांची मागणी केल्याचा गरोदर महिलेचा आरोप..
Anchor :- ग्राहकांची अरेरावी करण्यासाठी कायमच चर्चात असलेले महावितरणचे कर्मचारी पुन्हा वादात सापडले आहेत.कल्याण पत्री पूल परिसरात एका गरोदर महिलेचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे. या गरोदर महिलेच्या घरावर मागील काही दिवसांपासून एक मोठं झाड कोसळण्याच्या स्थितीत असून, ते हटवण्यासाठी तिच्या कुटुंबाने महावितरण कार्यालयाकडे वीजपुरवठा खंडित करण्याची विनंती केली होती. मात्र, या कामासाठी महावितरण कर्मचाऱ्यांकडून पैसे मागण्यात आल्याचा आरोप केला आहे.
Vo..दरम्यान पीडित गरोदर महिलेने स्वतः व्हॉइस रेकॉर्डिंगद्वारे हे प्रकरण उजेडात आणले असून, तिच्या म्हणण्यानुसार, विज खंडित करून झाड हटवण्याच्या कामासाठी तिने एमएसईबी कर्मचाऱ्याला ५ हजार रुपये दिले. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी झाड कापण्यासाठी २५ हजार रुपये लागतील, अशी मागणी करत टाळाटाळ केली.
दरम्यान, ही बाब समजताच स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कल्याणमधील टाटा पॉवर कार्यालयात पोहोचले. घटनेची चौकशी करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले, मात्र त्यांना कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ थांबवण्याची जबरदस्ती, तसेच "व्हिडिओ का काढताय , "पोलिसांना बोलावतो" अशा धमक्यांना दिल्या .या प्रकरणामुळे महावीतरण कर्मचारी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, एका गरोदर महिलेच्या सुरक्षिततेशी खेळ करून पैसे कमावण्याचा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे.दोषी महावितरण अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन करून त्यांची चौकशी करण्याची केली मागणी
Byte :-रुक्सना अन्सारी ( गरोदर महिला)
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
03072025
Slug - PPR_DCM_BIKE
feed on 2c
file 03
-------
Anchor - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूर मध्ये येऊन आषाढी वारी तयारीपूर्वक पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी शासकीय विश्राम गृह पासून 65 एकर पर्यंत बाईक वरून आमदार अवताडे यांच्यासोबत पाहणी केली. मात्र उप मुख्यमंत्री आणि आमदार तसेच त्यांच्या सोबतचे दुचाकीस्वार हेल्मेट घालायला मात्र विसरले, अती उत्साहपणा करण्याच्या प्रयत्नात कार्यकर्त्यांनी वाहतुकीचे नियम मोडल्याचे दिसून आले.
0
Share
Report