Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे यांना शिक्षक भरती घोटाळ्यात अटक!

PRAVIN TANDEKAR
Jul 03, 2025 14:31:22
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Slug - 0307_BHA_EO_ARRESTED FILE - 4 VIDEO, 1 IMAGE अखेर फरार शिक्षणाधिकारी रवींद सलामे यांना अटक Anchor : शिक्षक भरती घोटाळ्यात अटकसत्र सुरू असतानाच नागपूर येथील सदर पोलीस ठाण्यात आणखी एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा (सध्या नेमणूक शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय गडचिरोली) कार्यालयातील अधीक्षक आरोपी रवींद्र पंजाबराव सलामे यांना आज अटक करण्यात आली. सलामे यांच्यावर नागपूर पोलिसांत भादंविचे कलम 420, 465, 468, 471, 472, 409, 120 ब, 34 या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून ६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी पराग नानाजी पूडके राहणार लाखनी हा कधीही कोणत्याही शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक पदावर नियुक्तीच नसताना त्याचे नानाजी पूडके विद्यालय जेवणाळा या शाळेतील मुख्यध्यापक पदाचे नियुक्ती करीता त्याने बनावट शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांचे नियुक्ती मान्यता आदेश, सेवा सातत्य, एस के. बी शाळा यादव नगर नागपूर या शाळेचे लेटरहेडवर बनावट अनुभव प्रमाणपत्र तयार केले होते. गुन्ह्यातील अटक आरोपी महेंद्र म्हैसकर याचे सोबत कट कारस्थान रचून व गैर व्यवहार करून तयार करून सलामे यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते. त्यानूसार शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे यांना अटक करण्यात आली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement