Back
आदिवासी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात! रस्त्याची मागणी करत मोर्चा
Sinnar, Maharashtra
अँकर:-सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील इंदिरानगर परिसरात आदिवासी बांधव हे विकास कामांपासून वंचित असल्याने येथील विद्यार्थ्यांना शाळेत येजा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही या विद्यार्थ्यांना नदीच्या कडेला आपला जीव धोक्यात घालून ये जा करावी लागत आहे या विषयावर आक्रमक झालेल्या आदिवासी बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे मोर्चा नेऊन रस्त्यासाठी मागणी केली यावेळी ग्रामपंचायत च्या सदस्यांनी बांधवांसाठी तात्पुरत्या स्वरूपात रस्ता उपलब्ध करून दिला असून भविष्यात पक्का रस्ता उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देण्यात आले
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0307ZT_JALNA_ANDOLAN_UPDT(5 FILES)
जालना |
शेतकऱ्यांना प्रशासन पूर्ण सहकार्य करणार
नांदेड-जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत प्रशासनाची भूमिका
फेरमूल्यांकन अहवाल पुन्हा तयार करण्याचं प्रशासनाकडून आश्वासन
अँकर | जालन्यातील देवमूर्ती येथे गेल्या दोन महिन्यांपासून जालना-नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुय.आज या आंदोलक शेतकऱ्यांनी जमिनीच्या सुधारीत फेरमूल्यांकनाच्या मागणीसाठी विहीरीत उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा ईशारा दिलाय.त्यामुळे पोलिसांनी आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवलाय.दरम्यान,तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांची मनधरणी सुरु केलीय.जमिनीच्या फेरमूल्यांकनाबाबत प्रशासन शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करेल.जमिनीचा पुन्हा सर्व्हे करून फेरमूल्यांकन अहवाल पुन्हा तयार करण्याचं प्रशासनाकडून तयार केला जाईल असं आश्वासन उपविभागीय अधिकारी रामदास दौड यांनी दिलंय.
बाईट : रामदास दौड,उपविभागीय अधिकारी, जालना
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0307ZT_JALNA_DEVMURTI(6 FILES)
जालना | ब्रेकिंग
जालन्यात समृद्धी बाधित शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा
देवमूर्ती येथील समृद्धी बाधित शेतकरी करणार जलसमाधी आंदोलन
आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न
अँकर |जालन्यातील समृद्धी बाधित शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.. देवमूर्ती येथील शेतकऱ्यांचं मागच्या दोन महिन्यांपासून धरणे आंदोलन सुरु आहे.. जालना ते नांदेड समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन करताना मुल्यांकनाच्या पाच पट रक्कम देण्यात यावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे... मात्र आंदोलनाला दोन महिने उलटे तरी सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही.. त्यामुळं आज या शेतकऱ्यांनी सामूहिक जलसमाधीचा इशारा प्रशासनाला दिलाय.. त्यामुळं हे आंदोलन मागे घेण्यात यावं यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे..
बाईट : दिलीप राठी,आंदोलक
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
nsk_darucontro
फीड by 2C
Breaking News -
- चक्क देवघराखाली केला अवैध दारूचा साठा
- नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथील धक्कादायक घटना
- दिंडोरी पोलिसांनी धाड टाकल्यानंतर उघडकीस आली घटना
- ४ हजार ८०० रुपयांचा मद्यसाठा पोलिसांनी केला जप्त
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज
स्किप्ट ::- शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध... मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना दिलं परत पाठवून...
AC ::- राज्य सरकार महत्वाकांक्षी मानत असलेल्या ‘शक्तीपीठ महामार्ग’ प्रकल्पाला लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे. या महामार्गासाठी होत असलेल्या मोजणीच्या कामाला शेतकऱ्यांनी ठाम विरोध करत, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवारातून हुसकावून लावले आहे. आज रेणापूर तालुक्यातील मोठेगाव आणि मोरवड या गावांमध्ये मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी थेट परत पाठवले. शक्तीपीठ महामार्ग नको आहे. आमच्या जमिनी आम्ही कोणालाच देणार नाही अशी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, याच संदर्भात दोन दिवसांपूर्वी लातूर तालुक्यातील ढोकी गावाच्या शिवारातही अशीच घटना घडली होती. महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोजणीसाठी शिवारात पोहोचले होते, मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना विरोध करत मोजणी थांबवली होती. शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको असा ठाम विरोध करत शेतकऱ्यांनी प्रशासनाला थेट शिवारातून परत पाठवले होते.
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज..
स्किप्ट ::- ZEE 24 TAAS च्या बातमीनंतर लातूरमधील वृद्ध शेतकरी पवार दाम्पत्याला अभिनेता सोनू सूदने केला फोन... शनिवार अभिनेता सोनू सूद येणार मदत घेऊन....
AC ::- लातूरमधील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याची बातमी ZEE 24 TAAS ने दाखविताच सरकारने त्या पवार दांपत्याला मदतीची घोषणा केल्यानंतर आता अभिनेता सोनू सूदने फोन करून त्या पवार दांपत्याची विचारपूस केली आहे. शेत नांगरणीसाठी बैल किंवा इतर कोणतीच उपकरणं नसल्याने या वृद्ध शेतकऱ्याने स्वत:लाच औताला जुंपलंय होतो. हि बातमी सातत्याने झी 24 तास ने लावून धरली होती ति बातमी पाहिल्यानंतर सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला. ‘तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो’, असं सकाळी त्यांनी ट्विट केल होत त्यानंतर त्यांनी आता त्या अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नीशी ही त्याने फोनवर चर्चा करून शनिवार पर्यंत मी तुम्हाला भेटण्यासाठी आणि मदत करण्यासाठी येतो असे सांगीतले असल्याची प्रतिक्रिया पवार दाम्पत्यांनी दिली आहे.
बाईट ::- अंबादास पवार
बाईट::- पत्नी
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn building collapsed av
feed attached
ANCHOR : छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कन्नड तहसील कार्यालयसमोर असलेल्या कन्नड नगर परिषदेची इमारत अचानक आज दुपारी कोसळली. इमारत जुनी झाल्याने तिला तडे गेले होते. त्यामुळे इमारतमध्ये असलेल्या गाळेधारकांना पंधरा दिवसांपूर्वीच नगर परिषदेने नोटीस देऊन गाळे खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण गाळेधारकांनी या नोटीसीकडे दुर्लक्ष केलं आणि दुकानं सुरूच ठेवली. मात्र आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक इमारतच कोसळली. त्यात गाळे देखील जमीनदोस्त झाले. सुदैवाने परिस्थिती लक्षात घेत गाळेधारकांनी दुकानातून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तर इमारत कोसळताना चा व्हिडिओ देखील समोर आला आहे...
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम,साडेचार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय..धरण 76 टक्के भरले..
अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी कायम आहे.त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे,असून धरणातून वारणा नदी पात्रात येथे 24 तासात साडेचार हजार क्युसेक् पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय धरण प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सूर असून धरणात 34.40 टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात 27.50 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे,त्यामुळे धरण 76 टक्के भरले आहे.तर पावसाचा जोर आणि अतिवृष्टी कायम असल्याने धरणातुन वारणा नदीपात्रामध्ये विसर्ग करण्यात येणार असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे,असा इशारा पाटबंधारे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0307ZT_WSM_REPLANTING_OLD_TREES
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथे वाऱ्यामुळे अर्धवट पडलेलं ५० वर्ष जुनं पण अजूनही जिवंत असलेलं वडाच्या झाडाला स्थानिक वृक्षप्रेमींनी वाचवले आहे.झाडाची भैरवगड शिव मंदिराजवळ,धारकांटा फाटा परिसरात या वडाच्या झाडाची पुनर्लागवड करण्यात आली.या कामासाठी दोन क्रेन व एक ट्रेलरचा वापर करण्यात आला, तर राजू वानखेडे यांनी स्वतःच्या शेतात जागा उपलब्ध करून दिली.या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील सामान्य माणसाचा ही सहभाग महत्त्वाचा आहे, याचा सकारात्मक संदेश दिला गेला आहे.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
मुंबई नंतर डोंबिवलीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच्या कार्यकर्ते कडून बॅनर बाजी
ठाकरेच्या विजयी सभे आधी झलकळे 5 तारखेच्या आमंत्रणाचे बॅनर
*महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस 'मराठी' बोलतांना पाहायचं आहे... मग ही सुरवात आहे!... आपल्याला जाहिर आमंत्रण राज ठाकरे - उद्धव ठाकरे*...अश्या अश्याचे बॅनर
तर मनसे कडून " **मी अंत्यत कडवट मराठी आहे आणि माज्यावरचे संस्कार पण तेच आहेत. - राज ठाकरे*माय मराठीच्या अस्मितेसाठी बहुसंख्येने उपस्थित राहूया!*
*
अश्या आशयाचे झळकले बॅनरस....
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
5 FILES
SLUG NAME -SAT_ROAD_ISSUE
सातारा - साताऱ्यातील सैदापूर येथील मुख्य गावठाणकडे जाणाऱ्या भर रस्त्यातील डोहात नागरिकांनी वृक्षारोपण करून आंदोलन केलं आहे. यावेळी रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायत व प्रशासना विरोधात घोषणा दिल्या. आंदोलन कर्त्यांकडून येथील रस्त्यामधील खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले. या आंदोलनाला युवक,महिला आणि नागरिकांचा उपस्थित होते. या रस्त्यातील खड्ड्यांची तात्पुरती डागडूजी करून रस्ता नव्याने करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली.
byte -नागरिक
0
Share
Report