Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूरमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध!

VAIBHAV BALKUNDE
Jul 03, 2025 11:13:38
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज स्किप्ट ::- शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध... मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना दिलं परत पाठवून... AC ::- राज्य सरकार महत्वाकांक्षी मानत असलेल्या ‘शक्तीपीठ महामार्ग’ प्रकल्पाला लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे. या महामार्गासाठी होत असलेल्या मोजणीच्या कामाला शेतकऱ्यांनी ठाम विरोध करत, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवारातून हुसकावून लावले आहे. आज रेणापूर तालुक्यातील मोठेगाव आणि मोरवड या गावांमध्ये मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी थेट परत पाठवले. शक्तीपीठ महामार्ग नको आहे. आमच्या जमिनी आम्ही कोणालाच देणार नाही अशी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, याच संदर्भात दोन दिवसांपूर्वी लातूर तालुक्यातील ढोकी गावाच्या शिवारातही अशीच घटना घडली होती. महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोजणीसाठी शिवारात पोहोचले होते, मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना विरोध करत मोजणी थांबवली होती. शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको असा ठाम विरोध करत शेतकऱ्यांनी प्रशासनाला थेट शिवारातून परत पाठवले होते.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement