Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना: शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा!

NITESH MAHAJAN
Jul 03, 2025 11:34:30
Jalna, Maharashtra
FEED NAME | 0307ZT_JALNA_DEVMURTI(6 FILES) जालना | ब्रेकिंग जालन्यात समृद्धी बाधित शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा देवमूर्ती येथील समृद्धी बाधित शेतकरी करणार जलसमाधी आंदोलन आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न अँकर |जालन्यातील समृद्धी बाधित शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.. देवमूर्ती येथील शेतकऱ्यांचं मागच्या दोन महिन्यांपासून धरणे आंदोलन सुरु आहे.. जालना ते नांदेड समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन करताना मुल्यांकनाच्या पाच पट रक्कम देण्यात यावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे... मात्र आंदोलनाला दोन महिने उलटे तरी सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही.. त्यामुळं आज या शेतकऱ्यांनी सामूहिक जलसमाधीचा इशारा प्रशासनाला दिलाय.. त्यामुळं हे आंदोलन मागे घेण्यात यावं यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.. बाईट : दिलीप राठी,आंदोलक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement