Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

कन्नड नगर परिषदेची इमारत अचानक कोसळली, मोठा अनर्थ टळला!

VISHAL KAROLE
Jul 03, 2025 11:01:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn building collapsed av feed attached ANCHOR : छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कन्नड तहसील कार्यालयसमोर असलेल्या कन्नड नगर परिषदेची इमारत अचानक आज दुपारी कोसळली. इमारत जुनी झाल्याने तिला तडे गेले होते. त्यामुळे इमारतमध्ये असलेल्या गाळेधारकांना पंधरा दिवसांपूर्वीच नगर परिषदेने नोटीस देऊन गाळे खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण गाळेधारकांनी या नोटीसीकडे दुर्लक्ष केलं आणि दुकानं सुरूच ठेवली. मात्र आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक इमारतच कोसळली. त्यात गाळे देखील जमीनदोस्त झाले. सुदैवाने परिस्थिती लक्षात घेत गाळेधारकांनी दुकानातून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तर इमारत कोसळताना चा व्हिडिओ देखील समोर आला आहे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement