Back
मनसे शिवसैनिकांच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी, मुंबईकडे जाणारी रस्ते थांबले!
Nashik, Maharashtra
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_samrudhi_trafik
अँकर
नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या मनसे शिवसैनिकांमुळे समृद्धीवरून जाणाऱ्या मुंबईच्या रस्त्यात असणाऱ्या बोगद्या मध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे... हजारोच्या संख्येने जिल्हाभरातून मनसे सैनिक आणि शिवसैनिक मुंबईला निघाले आहे... याचा परिणाम सध्या मुंबईला जाणाऱ्या रस्त्यांवर देखील जाणवू लागला आहे... सध्या समृद्धी महामार्गाच्या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून रस्त्यातील वाहने हे निम्या गतीने जाताना दिसत आहे.....
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Nala Sopara, Maharashtra:
Date-5july2025
Rep-prathamesh tawade
Loc-nalasopara
Slug-NSP BUILDING
Feed send by 2c
Type-Av
Slug- नालासोपाऱ्यात अनधिकृत इमारत झुकली
अलकापुरी परिसरातील घटना
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही,
अँकर ... नालासोपारा पूर्वेकडील अलकापुरी परिसरातील साईराज अपार्टमेंट या इमारतीच्या तळमजल्याला दुरुस्तीचे काम सुरू असताना इमारत झुकल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास घडली ...
तळमजल्यावरील घराचे दुरुस्तीचे काम सुरू असताना कारागिराने पिलर तोडल्यामुळे ही इमारत दुर्घटना घडली... स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात येतात वेळीच इमारत खाली केल्याने मोठी दुर्घटना होता होता वाचली...
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही या घटनेची माहिती महापालिका व पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे..
सध्या या इमारतीमध्ये राहणाऱ्या ३० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे..
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0507ZT_CHP_JAIL_MOHARAM
( file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूरच्या कारागृहात गैबी वली शाह दर्ग्यावर मोहरम निमित्त दोन दिवसीय उरुसाचा प्रारंभ, गौडा, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकानी दर्शन घेत फीत कापून उरुसाचा केली सुरुवात
अँकर:-- चंद्रपूर जिल्हा कारागृह दरवर्षी मोहरम सणानिमित्त दोन दिवस सर्वसामान्यांसाठी खुले ठेवले जाते. यावर्षी 5 व 6 जुलै रोजी कारागृह खुले करण्यात आले. या काळात मुस्लिम व हिंदू भाविक एकत्र येऊन कारागृहातील बाबा हजरत मखदुम शहाबुद्दीन शाह उर्फ गैबीशाह वली यांच्या दर्ग्याचे दर्शन घेतात. आजही हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत दर्ग्यातील पवित्र विहिरीचे पाणी प्राशन करण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या ऐतिहासिक कारागृहात मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून, दोन दिवस भाविकांसाठी कारागृह खुले ठेवण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
बाईट १) अनुपकुमार कुमरे, कारागृह अधिक्षक
बाईट ३) तुफैल अहमद, मौलाना
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चांदोली धरणातून वारणा नदीत साडेचार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग...धरणाचे चारही दरवाजे उघडले..
अँकर - सांगलीच्या चांदोली-वारणा धरणातुन वाडावादी पात्रामध्ये साडेचार हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने धरण 75 टक्के भरले.त्यामुळे आता धरणातून वारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणाच्या चारही वक्र दरवाजे उघडण्यात आला असून वक्र दरवाज्यातून 2860 आणि विद्युत पायथागृहातून 1600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत करण्यात येत आहे,त्यामुळे वानंदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने वाणा नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावा राहावे,असा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला.
बाईट - बी आर पाटील - शाखा उप अभियंता ,वारणा ( चांदोली ) धरण,शिराळा.
0
Share
Report
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 0507ZT_MAVAL_DAM_FLOW
Total files : 01
Headline : पवना धरणा च्या सांडव्यावरून 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Anchor :
पिंपरी चिंचवड सह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारा पवना धरण हे 72 टक्के भरल्याने आणि पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा होत असल्याने धरण व्यवस्थापनाने आज पासून पवना नदी पात्रात विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी बारा वाजल्यापासून सांडव्याद्वारे 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून हा विसर्ग 15 जुलैपर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात वाढ किंवा कपात केली जाऊ शकते असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात कुणीही उतरू नये तसेच शेती अवजारे पाण्याचे पंप जनावरे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चांदोली धरणातून वारणा नदीत साडेचार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग...धरणाचे चारही दरवाजे उघडले..
अँकर - सांगलीच्या चांदोली-वारणा धरणातुन वाडावादी पात्रामध्ये साडेचार हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने धरण 75 टक्के भरले.त्यामुळे आता धरणातून वारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणाच्या चारही वक्र दरवाजे उघडण्यात आला असून वक्र दरवाज्यातून 2860 आणि विद्युत पायथागृहातून 1600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत करण्यात येत आहे,त्यामुळे वानंदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने वाणा नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावा राहावे,असा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला.
बाईट - बी आर पाटील - शाखा उप अभियंता ,वारणा ( चांदोली ) धरण,शिराळा.
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
anchor - नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील बर्डीपाडा पिंपळखुटा गावात एका घराला भीषण आग लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली. या आगीत बापा राऊत या आदिवासी बांधवांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले. आगीने काही क्षणात इतके रौद्ररूप धारण केले होते की, घरातील संसारासाठी लागणारे सर्व साहित्य जळून खाक झाले असून, मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे बापा राऊत यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांना शासनाकडून तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. सुदैवाने यां आगीत जीवित नाही झाली नाही, अजिचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
DHARA_JALLOSH
विजय मेळाव्यानंतर धाराशिव मध्ये शिवसैनिक मनसैनिकांचा एकत्रित जल्लोष.
एकमेकांना पेढे भरवत केला आनंद साजरा.
अँकर
धाराशिव_ मुंबईतील विजय मेळाव्यानंतर धाराशिव मध्ये शिवसैनिक व मनसैनिक यांनी एकत्रित जल्लोष केला. कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिक व मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद उत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी एकमेकांना पेढे भरवले. यावेळी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जवळपास तासभर हा जल्लोष छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू होता.
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
ANCHOR - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अक्राणी तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. यंदा जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत चांगला पाऊस बरसत आहे. अक्राणी परिसरात दोन तासांपासून पावसाची संततधार पाहायला मिळाली. पावसाच्या या जोरदार आगमनामुळे शेतीत पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सातपुडा परिसरात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यां पाऊसामुळे सातपुड्यातील धबधबे प्रवाहित झाले आहेत.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी नगर पंचायतमध्ये अनेक महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नगर पंचायत पाण्याची ही समस्या निकाली काढत नसल्याने आझाद समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पैनगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले. ढाणकित पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होतं आहे, अनेक दिवस नळाला पाणी येत नाही, उन्हाळा निघून गेला आणि पावसाळा आला तरी नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते, त्यामुळे आंदोलकांनी नदीपात्रात उतरून नगर पंचायत प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. यावेळी १ महिन्यात पाणी टंचाई दूर करण्याचे लेखी आश्वासनाचे पत्र मुख्याधिकाऱ्यांनी दिले.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:30507ZT_WSM_APMC_CROP_DAMAGE
रिपोर्टर : गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम च्या मानोरा तालुक्यातील बोरव्हा गावातील शेतकरी गौरव पवार यांनी मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी भुईमूग शेंगा आणल्या होत्या.मात्र विक्रीच्या आधीच झालेल्या मूसळधार पावसामुळे या भुईमूग शेंगांचे मोठे नुकसान झाले.या नुकसानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.याची दखल घेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी गौरव पवार यांच्याशी थेट फोनवर संपर्क साधत,सरकार तुझं नुकसान भरून काढेल,असे आश्वासन दिले होते.त्यांनी संबंधित व्हिडीओ देखील आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर अपलोड केला होता.मात्र,या आश्वासनाला दीड महिना उलटूनही गौरव पवार यांना सरकारकडून भरीव आर्थिक मदत मिळालेली नाही.परिणामी,या तरुण शेतकऱ्यामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.मदत देण्याची मागणी या युवा शेतकऱ्याने केली आहे.
बाईट : गौरव पवार,शेतकरी
बाईट : इंदल पवार,वडील
0
Share
Report