Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412106

पवना धरणात 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

CHAITRALI RAJAPURKAR
Jul 05, 2025 09:31:09
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 0507ZT_MAVAL_DAM_FLOW Total files : 01 Headline : पवना धरणा च्या सांडव्यावरून 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Anchor : पिंपरी चिंचवड सह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारा पवना धरण हे 72 टक्के भरल्याने आणि पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा होत असल्याने धरण व्यवस्थापनाने आज पासून पवना नदी पात्रात विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी बारा वाजल्यापासून सांडव्याद्वारे 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून हा विसर्ग 15 जुलैपर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात वाढ किंवा कपात केली जाऊ शकते असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात कुणीही उतरू नये तसेच शेती अवजारे पाण्याचे पंप जनावरे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement