Back
भुईमूग शेंगांचे नुकसान: शेतकऱ्याचे सरकारकडून आश्वासन, पण मदत नाही!
GMGANESH MOHALE
FollowJul 05, 2025 08:35:33
Washim, Maharashtra
वाशिम:
File:30507ZT_WSM_APMC_CROP_DAMAGE
रिपोर्टर : गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम च्या मानोरा तालुक्यातील बोरव्हा गावातील शेतकरी गौरव पवार यांनी मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी भुईमूग शेंगा आणल्या होत्या.मात्र विक्रीच्या आधीच झालेल्या मूसळधार पावसामुळे या भुईमूग शेंगांचे मोठे नुकसान झाले.या नुकसानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.याची दखल घेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी गौरव पवार यांच्याशी थेट फोनवर संपर्क साधत,सरकार तुझं नुकसान भरून काढेल,असे आश्वासन दिले होते.त्यांनी संबंधित व्हिडीओ देखील आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर अपलोड केला होता.मात्र,या आश्वासनाला दीड महिना उलटूनही गौरव पवार यांना सरकारकडून भरीव आर्थिक मदत मिळालेली नाही.परिणामी,या तरुण शेतकऱ्यामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.मदत देण्याची मागणी या युवा शेतकऱ्याने केली आहे.
बाईट : गौरव पवार,शेतकरी
बाईट : इंदल पवार,वडील
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowJul 18, 2025 10:02:43Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1807ZT_WSM_EBIKE_FIRE
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर : वाशिम च्या काकडदाती परिसरातील साई लिला नगर मध्ये राहणाऱ्या गोविंद गाभणे यांची जॉय कंपनी ची इलेक्ट्रिक स्कुटी आग लागून जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.गोविंद गाभणे यांचा मुलगा आदित्य गाभणे याने या इलेक्ट्रिक स्कुटी ला चावी लावताच तिला अचानक आग लागली.सुदैवाने आदित्य गाभणे हा वेळीच बाजूला गेल्याने अनर्थ टळला मात्र आग लागून काही मिनिटातच ही जॉय कंपनी ची स्कुटी जळून खाक झाली आहे.या आगीत परिसरातील एअर कंडिशनर आणि इतर साहित्य ही जळाले आहे.आगीत स्कुटी जळून नुकसान झाल्याने जॉय कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी गोविंद गाभणे यांनी केली आहे.
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 18, 2025 09:34:48Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडमधील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक ........ पशुसंवर्धन उपायुक्तांना घातला घेराव ......... खाद्यपुरवठादार कंपन्यांची मनमानी ....... कुक्कुट खाद्याच्या बँगांवर अन्नघटक नमूद नाहीत. ....... शासनाने निर्णय घेवून देखील अंमलबजावणी नाही .........
अँकर - पोल्ट्री कंपन्या व खाद्य पुरवठादारांच्या मनमानीविरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाले आहेत. अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात धडक देवून त्यांनी उपायक्तांना घेराव घातला आणि चांगलेच धारेवर धरले. पोल्ट्रीतील पक्षांना पुरवल्या जाणारया खाद्याच्या बँगांवर त्यातील अन्नघटक नमूद केले जात नाहीत. करार पद्धतीने पोल्ट्री फार्मिंगच्या नियमांचे पालन होत नाही. शासनाने याबाबतचा निर्णय घेवून देखील याबाबत अंमलबजावणी होत नसल्याने पोल्ट्रीधारक संतापले आहेत. वर्षभरापूर्वी याबाबतच्या सूचना देवून देखील कुठलीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिक शेतकरयांनी केलाय.
बाईट 1 – पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी
बाईट 2 – डॉ. सचिन देशपांडे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन ....
0
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 18, 2025 09:32:03Akola, Maharashtra:
Anchor : राज्यभरातील शासकीय परिचारिकांनी आजपासून विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले आहेय..या आंदोलनामुळे शस्त्रक्रिया प्रक्रियेत मोठा अडथळा आलेला आहेय..अकोल्यात शासकीय रुग्णालयात सुद्धा सामान्य शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत..सध्या फक्त अतिदक्षता आवश्यक असलेल्या शस्त्रक्रिया सुरू आहेत,तर अन्य सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत... हे आंदोलन रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम टाकू शकते, त्यामुळे प्रशासनाला या प्रश्नावर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहेय.. परिचारिकांच्या मागण्या पूर्ण करण्यात सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलली पाहिजेत जेणे करून रुग्णांचे होणारे हाल थांबतील...
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 18, 2025 09:06:29Pandharpur, Maharashtra:
18072025
Slug - PPR_CLEAN_WORKER
feed.on 2c
file 02
-----
सफाई कामगार जल्लोष व्हिडिओ
सफाई कामगार काम करताना व्हिडिओ
0
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 18, 2025 09:06:16Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी
तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील घटना
महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हे दोन बळी गेल्याचा गावकऱ्यांचा आरोप
महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
______________
रत्नागिरी तालुक्यातील निवळी परिसरातील शिंदे वाडी येथे साफसफाई करत असताना तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. काल सायंकाळी ही घटना घडली.. चंद्रकांत यशवंत तांबे आणि मृदुला वासुदेव वाडकर अशी विजेचा धक्का बसून मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. दरम्यान या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हे दोन बळी गेले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवळी ग्रामपंचायतीचे सदस्य संजय निवळकर यांनी केली आहे. या घटनेमुळे निवळी गावावर शोककळा पसरली असून महावितरणच्या हलगर्जीपणाबाबत संताप व्यक्त होत आहे..
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 18, 2025 09:06:03Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Leopard
File:01
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc :- जुन्नर तालुक्यातील ओझर येथे बिबट विहिरीत पडल्याची घटना घडली
Vo :- यावेळी विहिरीत पडलेल्या बिबट्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनविभागाच्या रेस्क्यू टिमने सुखरुप बाहेर काढले यावेळी बिबट्याला प्राथमिक उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आलेय बिबट्याच्या विहिरीत पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असुन शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 18, 2025 09:05:53Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Lampi Bullock Cart Stop
File:03
Rep: Hemant Chapude(Khed)
Anc:उत्तर पुणे जिल्ह्यात लंम्पी आजाराच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने ३१ जुलै २०२५ पर्यंत बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे.
Vo :- या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने सर्व गाडेमालकांना शर्यतीत सहभागी होऊ नये, असे आवाहन करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गाडेमालकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
असे असतानाही आंबेगाव तालुक्यातील लोणी येथे नियम धाब्यावर बसवत बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून सलग दोन दिवस या शर्यती होणार आहेत. लंम्पी संसर्गाचा धोका लक्षात घेता या शर्यती आयोजनावर टीका होत असून, सहभागी होणाऱ्या गाडेमालकांना पुढील कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे कोणत्याही बैलगाडा मालकाने या शर्यतीत भाग घेऊ नये, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
1
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 18, 2025 09:05:38Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1807ZT_CHP_RANBHAJI_1_2
( single file sent on 2C)
टायटल:-- आदिवासी विकास विभागातर्फे चंद्रपुरात रानभाजी महोत्सवाचे करण्यात आले आयोजन, 5 दिवस चालणार उपक्रम
अँकर:-- आदिवासी विकास विभाग, चंद्रपूरच्या वतीने केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत १८ ते २२ जुलै या कालावधीत शहरातील आझाद गार्डन येथे गावरान रानभाजी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी भागातील रानभाजी, रानफळे, वनऔषधे, अन्नधान्य यासह 'शबरी नॅचरल्स' या प्रिमीयम ब्रँडच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे. शहरी नागरिकांना रानभाज्यांचे आयुर्वेदिक व पोषणमूल्य पटवून देणे. आदिवासी बचत गट, सामाजिक संस्था आणि व्यक्तींना स्वयंरोजगार व उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे हाही यामागचा उद्देश आहे. या महोत्सवात प्रकल्प कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत आदिवासी बचत गट, संस्था, व्यक्ती यांचा सहभाग असून, शहरातील नागरिकांनी भेट देऊन रानभाज्यांची ओळख, त्यांच्या रेसिपी आणि औषधी गुणधर्म यांची माहिती घ्यावी, तसेच खरीदी करून आदिवासी विक्रेत्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बाईट १) विकास राचेलवार, प्रकल्प अधिकारी,आदिवासी विकास विभाग, चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
1
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 18, 2025 09:05:22Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- निलेश लंके ऑन विधानभवन राडा
फीड 2C
Anc:- विधान भवन परिसरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात झालेल्या राड्यानंतर काल मध्यरात्री आमदार आव्हाड यांनी आंदोलन केले...यावेळी पोलिसांनी अक्षरशः आमदार आव्हाडांना पोलिसांनी फरपटत नेले, तर आमदार रोहित पवार यांच्यात आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्येही वाद झाला यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी सरकारवर जोरदार टीका केली, ज्या विधान भवनात कायदे बनवले जातात तिथे अशा पध्दतीने वागले जात असेल तर हे चुकीचे आहे...सरकारला वाटत असेल की हम करे सो कायदा तर हे खपवून घेतले जाणार नाही...पोलिसांवर सरकारचा दबाव आहे , मात्र जनतेचा उद्रेक झाल्यास चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांचे कपडे उतरवल्याशिवाय राहणार नाही असं निलेश लंके यांनी म्हंटले आहे.
बाईट:- निलेश लंके, खासदार राष्ट्रवादी SP
0
Share
Report
JMJAVED MULANI
FollowJul 18, 2025 09:00:18Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1807ZT_BARAMATIDOG
BYTE 1
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत वासरांना कुत्र्यांनी फाडून खाल्ल्यानंतर हिंदू संघटनांची समितीवर कारवाईची मागणी...
Anchor -
बारामतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोचीतील उप बाजारामध्ये कुत्र्यांनी वासरांना फाडून खाल्ल्यानंतर हिंदू संघटनांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती वरती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दर गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराचा जळोची येथे मोठा बाजार भरतो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरांची विक्री होते मात्र त्या ठिकाणी गाई वेल्यानंतर त्याने जर खोंडाला जन्म दिला तर त्या ठिकाणी ते सोडून जातात आणि त्यानंतर कालांतराने कुत्रे हल्ला करून त्याचा जीव घेतात याला कृषी उत्पन्न जबाबदार असल्याचा दावा हिंदू संघटनाच्या वतीने करण्यात येतोय. जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार भरत असेल तर ती जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. भटकी कुत्री जनावरांवर हल्ला केल्यानंतर माणसांवरती हल्ला करू लागली तर याला जबाबदार कृषी उत्पन्न बाजार समिती असेल असे देखील दावा अमोल सातकर यांनी केलेला आहे लवकरच कृषी उत्पन्न बाजार समितीवर गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी अशी मागणी सातकर करणार आहेत.
बाईट- अमोल सातकर
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 18, 2025 08:39:33Manchar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Manchar Bhimashankar Road Issue
File:02
Rep: Hemant Chapude(Manchar)
Anc :- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं पवित्र तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र भिमाशंकर मात्र तिथपर्यंत जाणारा मार्ग म्हणजे जीवावर उदार होऊन घ्यायचा प्रवास बनलाय
Vo :- पुणे-नाशिक महामार्गावरून मंचर-भिमाशंकर आणि राजगुरुनगर-भिमाशंकर हे दोन्ही रस्ते अक्षरशः खड्ड्यांनी पोखरले गेलेत. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता असा संभ्रम निर्माण व्हावा, इतकी भीषण अवस्था रस्त्याची झालीय या मार्गावरून दररोज शेकडो भाविक, पर्यटक आणि स्थानिक प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतायत. खड्डे, निसरडे वळणे वेळेवर दुरुस्ती न झाल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच असून, आतापर्यंत अनेक निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागलाय
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया मंचर पुणे...
1
Share
Report
KPKAILAS PURI
FollowJul 18, 2025 08:38:59Pune, Maharashtra:
वैष्णवी चा आज वाढदिवस....! आठवणीने कुटुंब भावना विवश...! वैष्णवी सरप्राइज देऊन सोडून गेली - आई....!
pimpri vaishnavi birthday
kailas puri Pune 18-7-25
feed by 2c
Anchor - ..... संपूर्ण राज्याला हेलावून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूला आज दोन महिने पूर्ण होत आहेत.... वैष्णवी हिच्या मृत्यूनंतर आज तिचा वाढदिवस आहे. वैष्णवी जिवंत असती तर आज तिने 23 व्या वर्षात 24 व्या वर्षात पदार्पण केलं असतं. वैष्णवी हिच्या मृत्यूनंतर तिच्या आठवणीत प्रत्येक दिवस घालवणाऱ्या तिच्या कुटुंबीयांनी आजही वैष्णवी चा वाढदिवस साजरा केला.. वैष्णवीला आवडणारी मिसळ ही तिच्या कुटुंबीयांनी तिच्या फोटो समोर ठेवली... वैष्णवीच्या आठवणीने आजही वैष्णवीच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला....!वैष्णवीच्या वाढदिवसानिमित्त वैष्णवीच्या कुटुंबीयांच्या भावना जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
kailas puri 1 to 1+ vis
अनिल कस्पटे स्वाती कस्पटे
0
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 18, 2025 08:38:20Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1807_BHA_CHILD
FILE - 7 VIDEO
भंडाऱ्यात बालकाची 70 हजार रुपयांत विक्री...अवैध दत्तक प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल...बालक बाल कल्याण समितीच्या ताब्यात...
Anchor :- चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार,एका बालकाची 70,000 रुपयांत विक्री झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून सदर प्रकरणाची दखल घेत,भंडारा येथील चाईल्ड हेल्पलाईन कर्मचाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केली असता,संबंधित बालकास दत्तक दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी तपास करून आवश्यक पुरावे गोळा केले.
Vo ;- भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील एका आरोग्य उपकेंद्रात एप्रिल 2024 मध्ये जन्मलेल्या बालकास फक्त 15 दिवसांचा असताना 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बनावट दत्तक लेख तयार करण्यात आला. दत्तक घेणाऱ्या व्यक्तींनी खोटे दस्तऐवज तयार करून बालकाची प्रसूती भंडारा येथील खाजगी रुग्णालयात झाल्याचे भासवले. त्या आधारे भंडारा नगर परिषद येथून नविन जन्म प्रमाणपत्र मिळवण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेसाठी न्यायालयीन आदेश न घेता,आपसी तडजोडीने व अवैध पद्धतीने दत्तक प्रक्रिया पार पाडण्यात आली. या प्रकरणात सात आरोपींविरुद्ध साकोली पोलिस ठाण्यात जे. जे. अधिनियम 2015 अंतर्गत कलम 80 आणि 81 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आणि बालकास बाल समितीच्या ताब्यात घेतले असून जे. जे. अधिनियम 2015 अंतर्गत कलम 80 आणि 81 नुसार कठोर कायद्या अंतर्गत आरोपीला अटक करणे आवश्यक असले तरी अजूनही आरोपीला अटक करण्यात आली नाही हे मात्र विशेष..!
BYTE : - नितीनकुमार साठवणे , जिल्हा बाल संरक्षण अधिकारी
0
Share
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 18, 2025 08:38:01Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_police_byte
*नाशिक ब्रेकिंग...*
*जीएसटी विभागात कार्यरत सचिन चिखलेवर आणखी एक गुन्हा दाखल*
- सचिन चिखले जीएसटी विभागात अधिकारी
- *नोकरीचे आमिष दाखवत 97 लाखांना गंडा, स्वतःच्या बँक खात्यात पैसे घेतल्याची माहिती उघड*
- अंबड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल
- यापूर्वी चिखलेचे नाव चिठ्ठीत लिहून ठेवत एकाने केली होती आत्महत्या
- *आठ दिवसांत दुसरा गुन्हा दाखल झाल्यानं चिखलेचा पाय खोलात*
- १.२५ कोटीसह दुसऱ्या गुन्ह्यात ९७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल
- *अंबड पोलिसांचे दोन पथक अटकेसाठी रवाना.... अद्याप सचिन चिखले फरार असल्याची माहिती...*
बाईट: मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड.
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 18, 2025 08:36:17Nashik, Maharashtra:
nsk_currencyissue
feed by 2C
नाशिक ब्रेक -
- *देशभरातील करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसमधील कामगार ३१ जुलैपासून संपावर*
- *मजदुर संघाची व्यवस्थापनाला ३१ जुलैपासून संपाची नोटीस*
- *नाशिकच्या करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेससह देशातील ९ करन्सी नोट आणि सिक्युरिटी प्रेसमधील कामगारांचा ३१ जुलैपासून संपाचा इशारा*
- *नाशिक, हैदराबाद, मुंबई, नोएडा, देवास, नर्मदापुरम आणि कोलकातामधील सर्व ९ युनिट्समधील कामगार जाणार संपावर*
- *दिवाळी बोनस, मयत कामगारांच्या वारसांना नोकरीवर घेणं, भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालावा, मेडिकल सुविधा यासह अन्य मागण्यांसाठी कामगारांचा संपाचा इशारा*
- *३१ जुलैपासून कामगार संपावर गेल्यास चलनी नोटा, नाणी, पासपोर्ट, मुद्रांक उत्पादन ठप्प होण्याची शक्यता*
0
Share
Report