Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

संत वामनभाउ महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांचा उत्साह ओसंडला!

Mahendrakumar Mudholkar
Jul 03, 2025 07:07:46
Beed, Maharashtra
बीड : संत वामनभाउ महाराजांच्या पालखीच्या रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांचा उत्साह ओसंडला....drone shoot Anc : गहिनीनाथगड येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या संत वामनभाउ महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे उभे रिंगण आठरे येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, दोन अश्वांच्या साक्षीने आणि विठ्ठलनामाच्या गजरात लाखो वारकरी रिंगणात सहभागी झाले. डोईवर तुळस, खांद्यावर भगवी पताका घेत फुगडी खेळत भाविकांनी भक्तीचा रंग उधळला. महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. यावेळी करमाळा आणि माढा तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. पाहुया या रिंगण सोहळ्याचे डोळ्यांचे पारणे फेडणारे ड्रोनच्या माध्यमांतून घेतलेले हे खास दृश्य…
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement