Back
पिंपरीच्या भोंदू बाबाच्या अटकेने उघडकीस आले फसवणुकीचे धक्कादायक कृत्य!
Pune, Maharashtra
pimpri fraud baba
kailas puri pune 28- 6- 25
feed by 2c
Anchor - ... पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांनी एका भोंदू भावाला अटक केलीय. प्रसाद दादा उर्फ दादा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या 29 वर्षीय भोंदू बाबा च नाव आहे. त्याच्या विरुद्ध एका 39 वर्षीय व्यक्तींन बावधन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार या भोंदू बाबांना त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याच बसवत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. या भोंदू बाबांनी फिर्यादीच्या मोबाईल मध्ये एक ॲप डाऊनलोड करत त्याद्वारे मोबाईलचा ऍक्सेस मिळवत फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या खाजगी घटनांवर लक्ष ठेवले.. एवढेच नाही तर फिर्यादीला प्रेयसी बरोबर अश्लील कृत्य त्याच बरोबर वेश्या गमन करण्यासही भाग पाडल्याचं आणि मोबाईल ॲप द्वारे ते बाबाने पाहिल्याचं फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे. या भोंदू बाबा ने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांना या बाबा ने फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय... याच संदर्भात पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी....!
kailas 1 to 1+ vis
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2806ZT_CHP_DEER_DEATH
( single file sent on 2C)
टायटल:-- घनदाट जंगलातुन जाणारा बल्लारपूर- गोंदिया रेल्वेमार्ग ठरतोय वन्यजीवांसाठी कर्दनकाळ, गर्भवती मादी सांबराचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू, सतत होणारे वन्यजीवांच्या मृत्यूसंदर्भात शास्त्रीय पद्धतीने उपाययोजनांची गरज, हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी सदस्यांनी रेल्वे- वनविभाग आणि प्रशासनाला याकडे गांभीर्यानें लक्ष देण्याची केली मागणी
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील घनदाट जंगलातुन जाणारा बल्लारपूर- गोंदिया रेल्वेमार्ग वन्यजीवांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. लोहारा-जुनोना जंगलातून जाणाऱ्या रेल्वे रुळावर रकसोल एक्सप्रेसने आज रूळ ओलांडणा-या गर्भवती मादी सांबराला चिरडले. रेल्वेच्या धडकेने सतत होणा-या वन्यजीवांच्या मृत्यूसंदर्भात शास्त्रीय पद्धतीने उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी सदस्यांनी रेल्वे- वनविभाग आणि प्रशासनाला याकडे गांभीर्यानें लक्ष देण्याची मागणी केली आहे. या मार्गावर जास्त अपघात हे लोहारा ते मूल दरम्यान होतात. आता पुन्हा दुसरी रेल्वे लाईन टाकण्याचा प्रस्ताव रेल्वेने मंजूर केला आहे. वन्यजीवांचा हा भ्रमण मार्ग कसा सुरक्षित राहील याची चिंता वन्यजीवप्रेमींना पडली आहे. या जागी अशास्त्रीय पद्धतीने कुंपण तयार करण्यात आले आहे. ५ फुटांवरून सांबर, हरीण ,वाघ ,बिबट हे सहज उडी मारून जाऊ शकतात ,मग ह्या तुटपुंज्या योजना कुठल्या कामाच्या असा सवाल हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीने विचारला आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Sui_Attempt
Feed on - 2C
--------------------------
Anchor - घरगुती वादाच्या कारणातून एका 45 वर्षीय पुलावरून गोदावरी नदीत उडी घेतली. पण नशीब बलवत्तर आणि तिथे असलेल्या जीवारक्षक दलाच्या जवानांनी त्याचे प्राण वाचवले. हा सर्व प्रकार नांदेड शहरात घडला. आंबेडकर नगरमधील रहिवाशी अशोक कांबळे याने गोवर्धन घाटपुलावरून गोदावरी नदीत उडी मारली. नदीला पाणी असल्याने तो तरंगू लागला. जवळच असलेल्या गोदावरी जीवरक्षक दलाच्या जवानांनी त्याला पाहिले. तात्काळ नदीत जाऊन त्यांनी त्या बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढले. या व्यक्तीच्या खिशात एक चिठी आढळली. पत्नीच्या त्रासामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने चिठठ्ठीत लिहिले होते. दरम्यान त्या व्यक्तीला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Byte - परमेश्वर कदम - पोलीस निरीक्षक, वाजीराबाद, ठाणे
----------------------
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2806ZT_JALNA_UBT_ANDOLAN(1 FILE)
जालना | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बबनराव लोणीकर यांच्या पोस्टरवरील प्रतिमेला जोडे मारून निषेध
अँकर | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकरी विरोधी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं.जालन्यातील मंठा शहरात हे आंदोलन करण्यात येऊन बबनराव लोणीकरांच्या पोस्टरवरील प्रतिमेला जोडे मारण्यात येऊन लोणीकरांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनादरम्यान लोणीकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
0
Share
Report
Kolhapur, Maharashtra:
Kop UPSC Satkar
Feed :- 2C
Anc :- कोल्हापूरतील वारणानगर इथं UPSC परीक्षेत महाराष्ट्रातून यश संपादित केलेल्या यशवंताचा सत्कार करण्यात आला . वारणानगर मधील सुराज्य फौंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. वारणा समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे याच्या हस्ते UPSC परीक्षेत यश संपादित केलेल्या यशवंताचा सत्कार करण्यात आला.यंदा महाराष्ट्रातून 80 हुन अधिक विद्यार्थ्यांनी UPSC परीक्षेत यश संपदान केले होत, त्यापैकी 20 हुन अधिक विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आजच्या सत्कार सोहळ्यात उपस्थित होते..गेल्या 18 वर्षात UPSC मध्ये यश संपादित केलेल्या 500 हुन अधिक विद्यार्थ्यांचे सुराज्य फौंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
0
Share
Report
Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 2806ZT_GAD_NAX_ARRESTT
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील कोरची दलम उपकमांडर अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो याला पोलीसांनी केली अटक, नवनिर्मित पोस्टे कवंडे जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने करत होता रेकी, 15 जवानांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या भुसुरुंग स्फोटात होता सक्रिय सहभाग, महाराष्ट्र शासनाने त्याच्या अटकेवर जाहीर केले होते 06 लाख रुपयांचे बक्षीस
अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील कोरची दलम उपकमांडर अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो याला पोलीसांनी अटक केली. नवनिर्मित पोस्टे कवंडे जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने तो रेकी करत होता. 15 जवानांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या भुसुरुंग स्फोटात त्याच सक्रिय सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने त्याच्या अटकेवर 06 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे नक्षली सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी माओवाद विरोधी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 104 नक्षल्याना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. भामरागड तालुक्यातील नवनिर्मित पोस्टे कवंडे हद्दीतील कवंडे जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथकाची दोन पथके, पोस्टे कवंडे येथील पोलीस पथक आणि सी कंपनी 37 बटा. सिआरपीएफचे एक पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असताना त्यांना एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्याने पथकाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आणले असता सर्व असल्याचे उघड झाले. 01 मे
2019 रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत मौजा जांभूळखेडा जंगल परिसरात झालेल्या भुसुरुंग स्फोटात 15 पोलीस जवानांच्या हत्येमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. त्याच्यावर आजपावेतो 03-चकमक व 2-खून असे एकूण 05 गुन्हे दाखल आहेत.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2806ZT_JALNA_MANTHA_ANDO(3 FILES)
जालना | लोणीकरांविरोधात वंचित बहूजन आघाडी,प्रहार जनशक्ती पक्ष,संभाजी ब्रिगेडचं मंठा शहरात निषेध आंदोलन
अँकर |शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार बबनराव लोणीकरांविरोधात संभाजी ब्रिगेड,वंचित बहूजन आघाडी,प्रहार जनशक्ती पक्ष,एमआयएमनं मंठा शहरात निषेध आंदोलन केलंय.छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आलं.यावेळी लोणीकरांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यात आला.यापुढे शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य कराल तर परतूर-मंठा मतदार संघात तुमचं फिरणं मुश्किल करू असा ईशारा लोणीकरांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आला.
बाईट :बाळासाहेब खवणे,तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
0
Share
Report
Akola, Maharashtra:
4 फाईल्स आहेत..AVBB
Anchor : भाजप स्वतःच्या चुका लपवत असल्याची टीका हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून शिवसेना UBT चे नेते अरविंद सावंत यांनी भाजपवर केली आहेय..तर मराठी भाषेच्या प्रश्नासाठी कोणत्याही पक्षाला बोलवण्याची गरज नसून मराठीच्या अस्मिता साठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचा आनंद सावंत यांनी व्यक्त केला, तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने काही जणांना पोटसुळ उठलं असल्याची खोचक टीकाही सावंत यांनी केली आहेय..उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना राष्ट्रीय शिक्षण धोरणाला मान्यता दिली असल्याच बोलल जात आहे मात्र या प्रश्नावर अरविंद सावंत चांगलेच संतापले अर्धवट माहिती घेऊन टीका न करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय तर भाजपनेच मराठी भाषा सक्तीची न करण्यासाठी खोडा आणला असल्याचा पलटवार सावंत यांनी केला आहेय.. आगामी निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आनंदच होणार असल्याच म्हणत राज्यातील लाडक्या बहिणी दुखी असल्याचही म्हंटलंय..
Byte : अरविंद सावंत , शिवसेना UBT नेते..
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- बनावट छऱ्याची पिस्टल बाळगुण दहशत निर्माण करणे एका युवकाच्या चांगलेच अंगलट आलय. हिंगोलीच्या गोरेगाव पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय, सेनगाव तालुक्यातील सवना येथे वास्तव्यास असलेला अक्षय इंगोले या तरुणाने हुबेहूब क्रिस्टल वाटावी अशी बंदूक हातात घेऊन रिल्स बनवली,सदर रिल्स सोशल मीडियावर टाकून आपण कसे दादा आहोत हे भासवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी या आरोपीची चौकशी केली असता सदर बंदूक ही बनावट असल्याचे समोर आले, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून या तरुणावर गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केलीय.
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
पत्नी नेमकी कुणाची? पतीचा सोडून गेलेल्या पत्नीवर हल्ला
तर वाचवायला आलेल्या दुसऱ्या पतीवरही कोयत्याने वार
अंबरनाथच्या गजबजलेल्या शिवमंदीर रोडवर घडली घटना
Amb wife attack
Anchor : पत्नी नेमकी कुणाची? या वादातून पहिल्या पतीने आपल्या सोडून गेलेल्या पत्नीसह तिच्या दुसऱ्या पतीवर कोयत्याने वार केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईच्या फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Vo : अंबरनाथ पश्चिमेला राहणारे वैशाली पितळे आणि तिचे पती महेश पितळे हे शुक्रवारी २७ जून रोजी रात्री अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर रोडवरील एका ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी करण्यासाठी आले होते. यावेळी वैशालीचा पहिला पती लाभेश प्रभाकर म्हात्रे हा रिक्षा घेऊन तिथे आला आणि त्याने वैशालीवर धारदार कोयत्याने हल्ला चढवला. यात वैशालीच्या दोन्ही हातावर आणि गुडघ्यावर वार करून लाभेशने तिला गंभीर जखमी केलं. यावेळी वैशालीला वाचवण्यासाठी तिचा दुसरा पती महेश पितळे हा मध्ये पडला असता त्याच्याही हातावर लाभेश म्हात्रेने कोयताने वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या वैशाली आणि महेश यांनी सुरुवातीला जवळच्या शोभा हॉस्पिटल आणि तिथून संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी धाव घेतली. मात्र तिथे प्राथमिक उपचार करून त्यांना मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी लाभेश मात्रे हा स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना शरण आला. याप्रकरणी त्याच्या विरोधात गंभीर हत्याराने दुखापत करणे, यासह भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
6 FILES
SLUG NAME -SAT_HINDI_MANSE
महाराष्ट्र नवनिर्माण निर्माण सेना सातारा शहराच्या वतीने सातारा शहरातील महाराजा सयाजीराव महाराज विद्यालय येथे मनसे शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारने पहिली ते चौथीसाठी केलेल्या हिंदी सक्तीच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. दरम्यान सातारा शहरातील नागरिकांचा या स्वाक्षरी मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हिंदी सक्ती विरोधात तीव्र निषेध करण्यात आला.
byte
0
Share
Report