Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

ठाकरे बंधूंचा मोर्चा: बावनकुळे यांची तीव्र टीका!

ANIRUDHA DAWALE
Jun 28, 2025 04:04:04
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_BAWANKULE एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 मराठी माणसात संभ्रम आणि मनात तेढ निर्माण करण्याचं काम मोर्चाच्या माध्यमातून होत आहे; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर बावनकुळे यांची प्रतिक्रिया अँकर :– हिंदी भाषेच्या सक्तीवरून ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाले असून येत्या पाच तारखेला ठाकरे बंधू मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहे. त्यांच्या या मोर्चावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मराठी माणसात संभ्रम आणि मनात तेढ निर्माण करण्याचं काम होत आहे. मोर्चा काढण्याचा अधिकार राज आणि उद्धव ठाकरेंना आहे. आम्ही वारंवार सांगत आहे मराठी भाषाच कंपल्सरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आम्ही वारंवार स्पष्ट करत आहे की हिंदी भाषा ही आमच्यासाठी ऑप्शनल आहे. इंग्रजी ऑप्शनल आहे. कोणत्याही व्यक्तीला तीन भाषा आल्या तर काय बिघडलं पण यामध्ये संभ्रम तयार करणे व मराठी माणसाच्या मनामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम अशा मोर्चाच्या माध्यमातून होत आहे मराठी भाषा आमची कंपल्सरी भाषा आहे याबाबत ठाम आहे. आणि हिंदी भाषा ही ऑप्शनल भाषा आहे यावर ठाम आहे. बाईट :– चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement