Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

सुनील तटकरे बोले: स्वतंत्र निर्णयाची तयारी, निवडणूक लढवायला सज्ज!

PRAFULLA PAWAR
Jun 28, 2025 09:04:38
Raigad, Maharashtra
स्लग - कुणाला वेगळा निर्णय करायचा असेल तर ते स्वतंत्र आहेत ....... वेळ येईल त्याला त्या परिस्थितीत सामोरे जाऊ ....... शिवसेनेच्या भूमिकेवर सुनील तटकरेंची तिखट प्रतिक्रिया ....... रायगडमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ..... राष्ट्रवादीला डावलून युतीतून निवडणूक लढवणार ...... शिवसेनेच्या नेत्यांची वारंवार भूमिका ...... अँकर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून युती म्हणून लढवण्याची भूमिका सातत्याने जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांकडून मांडली जात आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तिखट प्रतिक्रिया दिलीय. राज्यात महायुती म्हणून निवडणुका काढायचं ठरलं आहे. असं असताना कुणाला काही वेगळा निर्णय करायचा असेल तर ते स्वतंत्र आहेत अशी भूमिका तटकरे यांनी मांडली आहे. ज्या परिस्थितीत आम्हाला सामोरं जायचं आहे त्याला आम्ही सामोरे जाऊ असं सांगत तटकरे यांनी वेळ आलीच तर स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचं सुतोवाच ठामपणे केलंय. बाईट - सुनील तटकरे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement