Back
किर्लोस्करवाडीमध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध आंदोलन केले!
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - रेल्वे प्रशासना विरोधात किर्लोस्करवाडी मध्ये विद्यार्थ्यांसह।ग्रामस्थांनी केला आंदोलन.
अँकर - सांगलीच्या किर्लोस्करवाडी येथे रेल्वे
प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात आले
रेल्वे प्रशासनाकडून बांधण्यात येणाऱ्या
उड्डाण पुला विरोधात ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत धरणे आंदोलन केले.किर्लोस्करवाडी येथे रेल्वे प्रशासनाकडुन चुकीच्या पद्धतीने रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येत आहे,त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला देखील देण्यात येत नसल्याचा आरोप करत रेल्वे उड्डाणपुलाची रुंदी वाढवण्याचा विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे.के.बापू जाधव यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Pandharpur, Maharashtra:
04072025
Slug - PPR_GORE_SHETTI
feed on 2c
file 01
------
Anchor - कुबुद्धि घेऊन पंढरपुरात येणारया राजू शेट्टी आणि त्यांच्या सोबतच्या महा विकास आघाडी नेत्यांना विठ्ठलाने सुबुद्धी द्यावी. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राजू शेट्टी सह येणाऱ्या नेत्यांना विकास कामाच्या आड न येण्याचे केले आवाहन
राजू शेट्टी यांच्या सह महा विकास आघाडी नेते पंढरपूर मध्ये येऊन शक्तीपीठ रद्द होण्यासाठी साकडे घालत आहे.
मात्र ते आज कुबुद्धि घेऊन पंढरपूर मध्ये येत आहेत. त्यांना पांडुरंग सुबुद्धी देईल. कोणत्याही विकास कामांच्या आड यायचे नसते. शक्ती पीठ माध्यमातून होणाऱ्या रस्त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास होणार आहे. असे सांगत अशी आंदोलने न करण्याचा सल्ला दिला
----
byte - जय कुमार गोरे, ग्रामविकास मंत्री
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
04072025
Slug - PPR_BHAVIK_CROWD
feed.on 2c
file 04
------
Anchor - पंढरपूर मध्ये लाखो वारकरी दाखल, श्री विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूर पर्यंत गेली, दर्शनासाठी लागतात 12 ते 15 तास
आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी आज नवमी दिवशीच लाखो वारकरी पंढरपूर मध्ये दाखल झालेले आहेत संत नामदेव महाद्वार, प्रदक्षिणामार्ग, सर्व परिसर हा वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे अवघ्या पंढरी नगरीमध्ये फक्त पांडुरंगाचा जयघोष सुरू आहे
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0407ZT_CHP_PANGOLIN_FOUND
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरातल्या जगन्नाथबाबानगर मध्ये आढळला दुर्मिळ खवल्या मांजर ( pangolin), रात्री पाऊस सुरू असताना अचानक एका घरात शिरला खवल्या मांजर
अँकर:-- चंद्रपूर शहरातल्या जगन्नाथबाबा नगर मध्ये दुर्मिळ खवल्या मांजर ( pangolin) आढळला आहे. काल रात्री पाऊस सुरू असताना अचानक एका घरात हा खवल्या मांजर शिरला. खवल्या मांजर हे दुर्मिळ असून वन्यजीवांच्या शेड्युल वन मध्ये सामील आहे. मानवी वस्ती पासून दूर राहणारा हा जीव शहरी भागात आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या pangolin ला ताब्यात घेतले. आज या खवल्या मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Suicide
Feed on - 2C
--------------------------------
Anchor - नांदेड शहरातील गोवर्धन घाट पुलाखाली गोदावरी नदीपात्रात साठ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. आज सकाळी हा मृतदेह पाण्यात दिसला. महिलेची ओळख पटली असून ज्योतिबाई स्वामी असे या महिलेचे नाव आहे. ही महिला देगलूर येथिल रहिवाशी आहे. कौटुंबीक भांडणामुळे ही वृद्ध महिला काल घरून निघून गेली होती. काल गोवर्धन घाट पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. घटणेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
-----------
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Sangmner News Flash
शालेय बसचा झाला अपघात..
पुणे नाशिक महामार्गावर झाला अपघात..
संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी घाटातील घटना..
विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणा-या बसला अपघात...
महामार्गाच्या बाजूला खड्यात कोसळली बस..
पाच सहा विद्यार्थी किरकोळ जखमी...
सुदैवाने मोठा अनर्थ टळला..
महामार्गाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक...
वाहनाने बसला हुल दिल्याने बस बाजूच्या खड्ड्यात कोसळली..
जखमी विद्यार्थ्यांना रूग्णालयात केले दाखल...
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Nashik break
- गोदावरी नदी पात्रात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह
- दसक घाटावरील गोदावरी नदीपात्रातील महिलेचा मृतदेह रेस्क्यू ऑपरेशनने काढला बाहेर
- नदी पात्रात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली
- मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम नाशिकरोड पोलिसांकडून सुरू
- मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्याकरिता अग्निशामक दलाने केले रेस्क्यू
- महिलेचा मृत्यू घात की अपघात याबाबतचा तपास नाशिक रोड पोलिसांकडून सुरू
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Anc - भंडारदरा परिसरात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.अनेक ठिकाणी पर्यटकांचे आकर्षण असलेले धबधबे पुन्हा ओसंडून वाहू लागल्याने भंडारदरा परिसराची निसर्ग सौंदर्यता खुलून गेली आहे.त्याचबरोबर भंडारदरा भागातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भात रोपांची पुरेशी वाढ न झाल्याने भात पिकांची रोपे पाण्याखाली गेल्याने सडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अती पावसाने भात रोपे कमी पडण्याची शक्यता असल्याने बरेच क्षेत्र बिना लागवडीचे राहणार असल्याची खंत शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. थंडी वाऱ्यामुळे जनावरेही गारठले आहेत. असाच पाऊस पडत राहिला तर जनावरेही दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ६६ टक्के तर निळवंडे धरणाचा पाणी साठा ५५ टक्के झालाय .पावसाची संततधार सुरूच असून त्यामुळे ओढे नाले पुन्हा दुथडी भरून वाहू लागले.
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Anc - चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा श्रीरामपुर शहरात दाखल झालाय... ढोल-ताशांच्या गजरात आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या घोषणात शहरातील नेहरू भाजी मंडईच्या प्रांगणात महाराजांचा पुतळा स्थापित करण्यात आला..जिथे असंख्य शिवप्रेमींनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांना आदराने वंदन केले...महिला, पुरुष आणि लहान मुलांसहित हजारो नागरिकांनी पुतळ्याचे पूजन करून दर्शन घेतले .या ऐतिहासिक क्षणामुळे श्रीरामपूरमध्ये एक नविन उत्साह संचारला आहे.
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांना अलिबागमध्ये अभिवादन ......
अँकर - मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या 296 व्या पुण्यतिथी निमित्त आज अलिबाग इथं त्यांना अभिवादन करण्यात आले. भारतीय नौसेनेच्या पश्चिमी कमांडचे कमांडिंग ऑफिसर दीपक सिंगल यांनी कान्होजी राजे आंग्रे यांच्या समाधीवर पुष्पचक्र वाहिले. त्यानंतर रायगड पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक आंचल दलाल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Anc - तळेगाव दिघे ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर बांधकाम चालू असलेल्या घराच्या आडोशाला हारजितीचा तिरट जुगार अड्ड्यावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टकात १४ आरोपी जेरबंद करुन ११ लाख २४ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे अवैध धंदेचालकांत एकच खळबळ उडाली आहे.त्यांच्याकडून जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य, रोख रक्कम, १३ मोबाईल, ९ मोटारसायकल असा ११ लाख २४ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या सर्वांविरुद्ध पोकॉ.अत्तार यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
Share
Report