Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

जयकुमार गोरेच्या विजयात शेखर गोरेचा महत्त्वाचा वाटा!

TUSHAR TAPASE
Jun 28, 2025 06:32:44
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_SHEKHAR_GORE सातारा-नुकत्याच झालेल्या लोकसभा,विधानसभा निवडणुकीमध्ये माण विधानसभा मतदार संघातून भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.या विजयात मोठा वाटा हा त्यांचे बंधू भाजप चे नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांचा होता. या निवडणुकीच्या आधीपर्यंत या दोन्ही भावांमध्ये विधानसभेच्या जागेवरून मोठा वाद होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवून दोन्ही भावांना एकत्र आणले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत जयकुमार गोरे यांना मदत झाल्याने त्यांचा दणदणीत विजय झाला. त्यादरम्यान शेखर गोरे यांना आमदार करण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.अखेर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर शेखर गोरे यांना ही जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे. याबाबत स्वतः शेखर गोरे यांनी एका जाहीर कार्यक्रमात वक्तव्य केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सप्टेंबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर शेखर गोरे आमदार होणार हे मी जबाबदारीने सांगतो. माझा कार्यकर्त्यांनी या मतदारसंघांमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी दिवसाचे रात्रीचा दिवस केला आहे. आणि त्यामुळेच फेब्रुवारी च्या आसपास माझ्या कार्यकर्त्यांना नक्की न्याय मिळेल. बाईट - शेखर गोरे (भाजप नेते, संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक)
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement