Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

उदगीरमध्ये बांधकाम कामगार कल्याण योजनेतील 90 बनावट प्रमाणपत्रांचा घोटाळा उघड!

VBVAIBHAV BALKUNDE
Jul 10, 2025 07:37:47
Latur, Maharashtra
लातूर PKG... स्किप्ट ::- बांधकाम कामगार कल्याण योजनेत मोठा घोटाळा उघडकीस.... उदगीर तालुक्यात घोटाळा उघडकीस... अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीच्या नावाने ९० फेक सर्टिफिकेट...अनुदान, शिष्यवृत्ती, साहित्य... योजनांचा गैरवापर... तिघांविरुद्ध गुन्हा दाखल... AC ::- बांधकाम कामगार कल्याण योजनेत मोठा घोटाळा उघड झाला आहे... शासनाकडून कामगारांना मिळणाऱ्या सवलती, शिष्यवृत्ती आणि अनुदान यांचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रांद्वारे तब्बल ९० बनावट कामगार नोंदणी प्रमाणपत्रांचा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे, ही सर्व नोंदणी एका अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीच्या नावाने करण्यात आली होती. VO 01 ::- उदगीर तालुक्यातील तोंडात गावच्या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या 'वंजारवाडी हे नाव आहे. जरी हे गाव असल तरी ति ग्रामपंचायत अस्तित्वातच नाही. पण तरीही या नावाने बनावट शिक्के, खोट्या सह्या आणि लेटरपॅड वापरून कामगार नोंदणी प्रमाणपत्रं तयार करण्यात आलं आहे. याच आधारावर अर्जदारांनी शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेतून शिष्यवृत्ती, साहित्य, अनुदान आणि शैक्षणिक सवलती मिळवल्या. याबाबतच्या तक्रारी वाढत असल्याने संपूर्ण चौकशी नांदेडचे सहायक कामगार आयुक्त यास्मीन शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आणि यामध्ये फक्त एका गावात जवळपास ९० पेक्षा जास्त प्रमाणपत्रे बनावट असल्याचं स्पष्ट झालं . या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात एजंट, बांधकाम ठेकेदार आणि मल्टिसर्व्हिस चालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाईट ::- राजकुमार पुजारी ( पोलीस अधिकारी ) VO 02 ::- बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणीकृत झालेल्या या ९० बोगस बांधकाम कामगारांमध्ये, अनेक जण प्रत्यक्षात शेतकरी होते, काहीजण खासगी नोकरी करणारे होते, तर काहींचा बांधकाम व्यवसायाशी काहीही संबंध नव्हता. यांनी शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेतून शिष्यवृत्ती, बांधकाम साहित्य, रोख रक्कम, भांडी आणि शैक्षणिक सवलती मिळवण्यासाठी खोट्या प्रमाणपत्रांचा आधार घेतला. या अर्जांसोबत जोडण्यात आलेली प्रमाणपत्रं, ग्रामपंचायतीची शिफारस पत्रं, शिक्के आणि सह्या – सगळं वंजारवाडी नावाच्या बनावट ग्रामपंचायतीच्या नावाने तयार करण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही वंजारवाडी नावाची ग्रामपंचायत प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. या सगळ्या बनावट कागदपत्रांची पडताळणी आता उदगीरच्या गटविकास अधिकाऱ्याच्या मार्फत करण्यात आली आहे.आणि यामध्ये तब्बल ९० प्रमाणपत्रं खोटी असल्याचं स्पष्ट झालं आहे. बाईट ::- राजकुमार पुजारी ( पोलीस अधिकारी ) बाईट ::- गटविकास अधिकारी उदगीर.. VO 03 ::- या संपूर्ण घोटाळ्याची व्याप्ती केवळ उदगीर तालुक्यापुरती नसून, राज्यभर अशा बनावट कामगार नोंदणी प्रमाणपत्रांचं जाळं पसरलेलं असण्याची शक्यता आहे. कामगार विभागाकडून राज्यस्तरावर तपासाचे संकेत मिळत असून, हा फक्त बनावट कागदपत्रांचा खेळ नाही. हे एका संगठित रॅकेटचं स्वरूप घेऊ शकतं.पुढे तपासात काय उलगडतंय, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे... ............ वैभव बालकुंदे ZEE मिडिया लातूर
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top