Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केली 31वी वर्षा मॅरेथॉन!

SKShubham Koli
Jul 10, 2025 13:04:50
Thane, Maharashtra
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली घोषणा सहा वर्षांनी होणार ठाणे वर्षा मॅरेथॉन एकूण १० लाख ३८, ९०० रुपयांची पारितोषिके प्रत्येक गटात प्रथम १० विजेत्यांना पारितोषिके व चषक ठाणे महापालिका चषक ३१व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार, १० ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात येत असल्याची घोषणा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी केली. ३०वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा २०१९मध्ये झाली होती. आता सहा वर्षांनी पुन्हा देशविदेशातील मॅरेथॉनपटूंसह ठाणेकर नागरिक या मॅरेथॉनमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होऊ शकणार असल्याचे प्रतिपादन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे..ठाणे महापालिका चषक ३१वी वर्षा मॅरेथॉन ही ठाण्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मॅरेथॉन आहे. सहा वर्षांच्या खंडानंतर ही मॅरेथॉन होत असल्याने सर्व विभागांनी उत्तम समन्वय साधून ही मॅरेथॉन यशस्वी करावी. गेल्या सहा वर्षात शहराच्या रचनेत, पायाभूत सुविधांमध्ये बदल झाला आहे. हे लक्षात घेऊन सर्व मॅरेथॉन मार्गांचे नियोजन करावे, असे आयुक्त राव यांनी नमूद केले. सर्व महापालिका अधिकाऱ्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. तसेच, त्यासाठी आतापासूनच दररोज तयारीला लागावे, असेही आयुक्त राव म्हणाले.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top