Back
शिर्डीत साईबाबांचे आशीर्वाद: दीपक केसरकरांचा विशेष कार्यक्रम!
KJKunal Jamdade
FollowJul 10, 2025 14:37:00
Shirdi, Maharashtra
Shirdi News Flash
शिवसेना नेते आ.दीपक केसरकर साईदरबारी...
गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी साईबाबांच्या धुपारतीला लावली दीपक केसरकरांनी हजेरी...
ऑन गुरुपौर्णिमा
महाराष्ट्रातील जनतेला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..
साईबाबांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत राहो , शिर्डीत भाविकांचा महासागर बघायला मिळतोय...
साईबाबांचे मिळणारे आशीर्वाद आपल्या सर्वांना अनुभवायला मिळालेय..
साईबाबांचे देश विदेशात भक्त , साईबाबा महाराष्ट्राचे वैभव ; साई दर्शनाला आल्यावर समाधान प्राप्त होत..
ऑन गुरुस्थान
आता देखील माझ्या गुरुस्थानी बाळासाहेबच...
ही सगळी दर्शन झाल्यानंतर मी बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेणार...
ऑन मातोश्री श्रद्धास्थान
एकदा विचारापासून ती लोक लांब गेल्यानंतर ज्या ठिकाणी बाळासाहेब यांची समाधी आहे त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतो...
केसरकरांची उद्धव ठाकरेंवर टीका...
ऑन संजय राऊत केसरकर टीका
संजय राऊत हे काहीही बोलतात..
ईश्वरांनी त्यांना माफ करावं अशी अपेक्षा..
मी जेवढं शिवसेनेसाठी केलं ते संजय राऊत विसरले , जेवढं मी केलं तेवढं संजय राऊत यांनी केलेलं नाही...
माझा लढा माझ्या निष्ठेशी आणि विचाराशी...
संजय राऊतांना महाराष्ट्राच जे वैभव आहे ते समजू शकणार नाही...
कारण संजय राऊत समोर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात , हे संपूर्ण जगाला माहिती...
मला संजय राऊतांवर टीका करायची नाहीये...
दीपक केसरकरांची संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया...
मला शिवसेनेसाठी जे करायचं ते मी केलंय....
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसैनिकांच्या गाड्यांना प्रेटॉल आणि राहायला रूम मिळत नव्हता एवढा दरारा नारायण राणे यांचा होता...
मी त्यांच्यासाठी राणे यांच्यासोबत तत्वांची लढाई केली आणि लढाई केल्यावर आम्ही एकत्र सुध्दा आलो...
आम्ही जनतेच्या हितासाठी काम करत राहणार , राजकारण हा माझा व्यवसाय नाही मी जनतेसाठी राजकारण करतो...
केसरकर यांची शिर्डीत प्रतिक्रिया..
ऑन एकनाथ शिंदे दिल्ली दौरा
मला याबाबत काहीच माहिती नाही...
काल आमच्या घरी साईबाबांच्या पालखीचा कार्यक्रम होता त्यामुळे मला याबाबत काही माहिती नाही..
ऑन आमदार संजय गायकवाड
मारहाण करणे योग्य नाही...
सेवा चांगली दिली पाहिजे यावर दुमत नाही..
त्यामुळे मारहाण करणे हा इलाज नाही...
अध्यक्ष आणि कमिटीकडे सांगून त्या कॅन्टींग चालकाचा ठेका रद्द करता आला असता...
प्रत्येकाने संयम बाळगला पाहिजे , संयम बाळगला असता तर जी बदनामी झाली ती झाली नसती...
ऑन राज उद्धव
एकत्र येणं म्हणजे ते एका कुटुंबातील , त्यामध्ये वाईट काहीच नाही..
सगळ्या गोष्टी त्यांनी ठरवायच्या आहेत , आम्ही जनतेसाठी काम करतो आणि जनतेसाठी कायम काम करत राहणार...
महाराष्ट्रात मराठी भाषा बंधनकारक आहे...
हिंदी पूर्वीपासून पाचवी सहावी सातवीला होती..
अजून माध्यम हे मराठीतच आहे..
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही मराठी भाषेला दर्जा उपलब्ध करून दिला..
मराठीसाठी जे करायला हवं ते आम्ही करतोय..
आम्ही जे केलं त्यातील एकही गोष्ट ते का करू शकले नाही हा महत्वाचा प्रश्न..?
राज ठाकरे नेहमी धडपडत असतात , पण जे निर्णय झाले ते आमच्या काळात झाले...
मराठी भाषेसाठी आम्ही जे केलं ते कोणीही करू शकल नाही...
दीपक केसरकरांची मराठी भाषेबाबत प्रतिक्रिया...
ऑन निवडणुका
राज ठाकरे कुठल्याही परिस्थितीत जे उद्धव ठाकरेंनी केलं ते करतील असं मला वाटतं नाही...
राज ठाकरे हे बाळासाहेबांचे विचार सोडणारे नाही...
राज ठाकरेंनी वेगळा पक्ष काढला पण बाळासाहेब यांच्या विचारांसोबत राहिले...
उद्धव ठाकरेंनी विचार सोडले काँग्रेस सोबत आघाडी केली हा त्यांचा प्रश्न त्यांच्यामुळे सगळे लोक पक्षातून बाहेर पडली...
महाराष्ट्रातील जनता नेहमी बाळासाहेबांच्या विचारा बरोबर राहिलीये...
राज आणि उद्धव यांच्या युतीवरून दीपक केसरकरांची प्रतिक्रिया...
ऑन मोहन भागवत
मला याबाबत काहीच माहिती नाही , ते खूप मोठे नेते मला बोलता येणार नाही...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही खूप वेगळी संघटना...
ऑन अनिल परब शंभूराजे देसाई
गद्दारी ही विचाराशी गद्दारि..
बाळासाहेब यांच्या विचाराशी गद्दारी कोणी केली ही सगळ्या जनतेला माहीत...
लोक तुम्हाला मानत नाहीत...
केसरकर यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा....
Bite - दीपक केसरकर , शिवसेना नेते
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement