icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
SRSHRIKANT RAUT10 Jul 2025, 12:33 pm

बच्चू कडूंचा सरकारवर हल्ला: वीस हजार कोटींचा घोटाळा का?

Yavatmal, Maharashtra:AVB Anchor : पैसे नाही म्हणता तर मागणी नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाला वीस हजार कोटी रुपये कसे दिले, जिथे कमिशन आहे तिथे आम्ही उभे, आणि  जिथे कमिशन नाही तिथे आम्ही उभे राहत नाही हा सरकारचा हेतू स्पष्ट होतो असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात त्यांची सातबारा कोरा पदयात्रा सुरू असून मनसेने त्यांना पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज ठाकरे सोबत आल्याने कर्जमाफीला वेगळी दिशा मिळेल, सरकारला आता नमावं लागेल असे बच्चू कडू म्हणाले.   भाजीत खडा निघाला तर मारता, पण तुरीचे एक हजार रुपये कमी झाले तर कमसे कम नाही बंदूक तर दंडा तरी हातात घ्यायला पाहिजे असा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला.      बाईट : बच्चू कडू 
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नागपूर में पहला सीबीजी प्लांट कचरा प्रबंधन से ऊर्जा निर्माण, बड़ा निजी निवेश

Nagpur, Maharashtra:देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री ... बायोगॅस प्लांट - मला अतिशय आनंद आहे की नागपूर महानगरपालिकेतर्फे देशातील पहिला सीबीजी प्लांट या ठिकाणी जवळपास तयार झालेला आहे, आज आम्ही प्लांटची पूर्ण माहिती घेऊन पाहणी केली - तीन स्टेजमध्ये 400-400 टन असा बाराशे टनचा हा प्रोजेक्ट ऑगस्टमध्ये पूर्णपणे कमिशन होईल, पण त्याचा भाग आताच कमिशन होतोय, शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे, यातून जवळपास 28 टीबीटी गॅस तयार होणार आहे त्यासोबत जे ऑरगऑनिक मनुअर तयार होणार आहेत - 400 टीबीटी सिमेंट किंवा इतर ठिकाणी लागणार, त्यामुळे जवळपास जो कचरा लागतो त्याला या ठिकाणी तयार होणार आहे, विदाऊट टीपिंग फी संपूर्णपणे खाजगी गुंतवणूक येथून करण्यात झाला आहे, जवळपास 300 कोटी रुपयांची गुंतवणूक या ठिकाणी केलेली आहे - हे मॉडेल एवढा चांगला आहे की पुढच्या काळात कुठेही कचऱ्याचे ढीग दिसणार नाही आणि वेस्ट वेल्थमध्ये कन्व्हर्ट करून त्या माध्यमातून आपण जो काही आपला पर्यावरण आहे त्याची हानी देखील टाळणार आहोत - पूर्व नागपूरच्या भागात भांडेवाडी म्हटलं की कचऱ्याचे ढीग आणि वास अशा प्रकारचा जे समीकरण होतं ते पूर्णपणे संपत आहे, पुढच्या तीन-चार महिन्यात वासाचा प्रश्नही संपेल आणि पुढच्या काही वर्षात कचऱ्याचाही ...
0
0
Report
Advertisement

तुळजाभवानी मंदिर में VIP पास बंद: 30-31 मई को दर्शन पूरी तरह रोक

Dharashiv, Maharashtra:तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या व्हीआयपी मंडळींना प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. येत्या 30 व 31 मे रोजी शनिवार व रवीवारी मंदीरात व्हीआयपी पासेप पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिक जेष्ठ पोर्णिमा उत्सव आणि लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे मंदीरात भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. तर सर्वसामान्य भाविकांसाठी नियमीत मिळणारे 200 आणि 500 रुपयांचे पेड पासेस सुरू राहणार आहेत. दरम्यान व्हिआएपी पासेस संदर्भात नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचा इशारा मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आला आहे.
0
0
Report

मंगरुर्लपीर में पानी की मुख्य पाइपलाइन बार-बार फूटे; आपूर्ति बाधित, कार्रवाई की मांग

Washim, Maharashtra:अँकर: वाशीमच्या मंगरुळपीर शहराला मोतसावंगा धरणावरू पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी वारंवार फोडली जात असल्याने मंगरुळपीरच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. या प्रकारामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होत असून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणी नगरपरिण steadच्या मुख्याधिकाऱ्यांनी मंगरुळपीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच जलवाहिनीचे नुकसान करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि परिसरात विशेषतः रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
0
0
Report

Meera-Bhayandar में मराठी लोगों के साथ भेदभाव? मंत्री सरनाईक ने दिया कड़ा संकेत

Mira Bhayandar, Maharashtra:मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसाची गळचेपी? मराठी असल्यामुळे घर नाकारणाऱ्या घरमालकाला मंत्री सरनाईकांचा कडक इशारा शिंदे गुळाचा चहा आणि नाश्ता सेंटर' चालवणाऱ्या मराठी भगिनी रविना शिंदे यांना भाईंदरमध्ये "तू मराठी आहेस" म्हणून घर नाकारण्यात आले. माहिती मिळताच मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट रविना यांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांच्या चौकशी केली आणि शिंदे कुटुंबाला धीर दिला. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचा सन्मान राखावाच लागेल; अन्यथा एकही वीट रचू देणार नाही," असा सज्जड दम मंत्री सरनाईक यांनी दिला आहे. बाईट -प्रताप सरनाईक परिवहन मंत्री
0
0
Report
Advertisement

अमरावती में पोटे-देशमुख के बीच स्वीट वॉर, चुनावी बूथों से पहले मिठाई वायरल

Amravati, Maharashtra:अमरावतीत रंगणार पोटे विरुद्ध देशमुख लढत; अर्ज भरण्यापूर्वीच काँग्रेसकडून मिठाईचे बॉक्स वाटपाचे फोटो व्हायरल अमरावतीत स्वीट वॉर सुरू आँकर :- अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकें बिगुल वाजताच राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या निवडणुक Youth भर असं जैसी थेट आणि चुरशीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपकडून माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचे नाव आधीच निश्चित झाले असून ते १ जून रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून नागपूरचे उद्योजक हर्षजित देशमुख यांचे नाव चर्चेत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार हर्षजित देशमुख यांच्या नावाचे आणि छायाचित्राचे सोहन केक मिठाईचे बॉक्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आणि अर्ज भरण्याआधीच देशमुख समर्थकांकडून या मिठाईचे वाटप सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्वीट वॉरमुळे अमरावतीमधील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
0
0
Report

रत्नागिरी में ठाकरे गट ने बाळ माने को कोकण विधानपरिषद के लिए उम्मीदवार घोषित किया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. उबाठा पक्षाचे उपनेते बाळ माने यांना महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अधिकृत उमेदवारी.. आगामी कोकण विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत राजकीय हालचालींना वेग आला आहे.. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांना महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे.. मुईंबात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाळ माने यांना 'एबी फॉर्म' अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आला.. एबी फॉर्म हाती पडताच बाळ माने यांनी मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतलं. या घडामोडींमुळे कोकणच्या राजकीय मैदानात आता अधिकृतपणे बिगुल वाजलं आहे.. बाळ माने यांची ही उमेदवारी केवळ एका मतदारसंघापुरती मर्यादित नसून संपूर्ण कोकणात ठाकरे गटासाठी ही प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे...
0
0
Report
Advertisement

राहुरी में चुलत नातवे ने आजोबा पर गोलीबारी, दगडू कोहकडे गंभीर घायल

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे चुलत नातवानेच आजोबांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. या घटनेत 65 वर्षीय दगडू कोहकडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. गेल्या काही दिवसापुर्वी आरोपी प्रवीण कोहकडे आणि चुलत आजोबा दगडू कोहकडे यांच्यात एका नाजूक कारणातून वाद होता.. त्यातून पुढे हाणामारी आणि गाड्या पेटविण्याच्या घटना घडलेल्या होत्या.. त्यासंदर्भात राहुरी पोलीसात गुन्हा देखील दाखल आहे.. याच कारणावरून प्रवीण कोहकडे याने चुलत आजोबा दगडू कोहकडे यांच्यावर गोळीबार केला.. गोळी छातीत लागल्याने दगडू कोहकडे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.. आरोपी प्रवीण कोहकडे याच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे..
0
0
Report

अक्कलकोट में दिनदहाड़े ज्वेलर्स लूट: चार चोरों में एक महिला, 14.5 लाख के गहने चोरी

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोटमध्ये भरदिवसा चाकूचा धाक दाखवत ज्वेलर्सला लुटले, तब्बल साडेदहा लाखांचे दागिने लंपास - अक्कलकोट तालुक्यातील जेऊर ते करजगी रस्त्यावर ज्वेलर्सचे करण्यात आले अपहरण - ज्वेलर्सला चाकूचा धाक दाखवत तब्बल साडेदहा लाखांचे दागिने लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस - करजगी शिवारातील जेऊर ते करजगी रस्त्यावर सकाळी 11 च्या दरम्यान घडला प्रकार - अभिनंदन पोतदार हे ज्वेलर्स सकाळी दुचाकीवरून दुकानाकडे जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी दागिन्यांवर मारला डल्ला - विशेष म्हणजे चौघ्या चोरट्यांपैकी एक जण महिला असल्याची प्राथमिक माहिती समोर - ज्वेलर्सची लूट करणाऱ्या चोरट्यांचा शोधासाठी अक्कलकोट ग्रामीण पोलीसांची विविध पथके रवाना - सदर घटनेची नोंद अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत
0
0
Report

रत्नागिरी में यूरिया संकट: किसान और दुकानदार मिलकर कंपनियों के खिलाफ विरोध

Ratnagiri, Maharashtra:मॉन्सून तोंडावर आला है. बळीराजा शेती कामामध्ये व्यस्त होत आहे अशातच शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतांचा अपुऱ्या पुरवठ्यामुळे नवे संकट त्यांच्यासमोर उभे राहणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांना युरियासाठी वणवण भटकावे लागत आहे. कंपन्या इतरत्र माल पुरवत आहेत पण, रत्नागिरी साठी माल देण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे. याच अन्याय विरुद्ध रत्नागिरी चा बळीराजा आणि दुकानदार एकत्र येऊन युरिया कंपन्यांविरुद्ध एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहे. युरिया खताच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे याचा फटका शेतीला बसणार आहे.
0
0
Report
Advertisement

Diesel theft gangs on highways threaten motorists as fuel shortage and price hike strain wallets

Shirdi, Maharashtra:एकीकडे इंधन तुटवड्यासह पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहन धारक हवालदील झाले आहेत.. इंधन मिळवण्यासाठी रांगा लावून तासंतास पेट्रोल पंपावर ताटकळत उभे राहण्याची वेळ वाहन धारकांवर आली आहे.. तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात इंधन चोरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून, महामार्गावर ट्रकमधून डिझेल चोरीच्या घटनांमुळे वाहन धारकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.. V/O - अहिल्यानगर पोलिसांनी गेल्या सात दिवसात नगर मनमाड महामार्ग आणि समृद्धी महामार्ग अशा दोन महामार्गावर डिझेल चोरांच्या टोळ्या गजाआड केल्या आहेत.. आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर डिझेलने भरलेले कॅन जप्त करण्यात आले असून, चालकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून ट्रकमधून डिझेल चोरी केली जात होती.. आधीच इंधन तुटवडा आणि वाढत्या दरामुळे मेटाकुटीस आलेल्या वाहन चालकांना डिझेल चोरीच्या घटनांमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे.. पोलिसांनी डिझेल चोरांसह ते विकत घेणारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ट्रक चालक मालक संघटनेने केली आहे.. Byte - अयुब कच्छी, पदाधिकारी ट्रक चालक मालक संघटना, अहिल्यानगर V/O - महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकमधून डिझेल चोरत ते कमी दराने विकणाऱ्या टोळ्या अहिल्यानगर जिल्ह्यात सक्रिय आहेत.. त्यामुळे इतर गुन्ह्यांसोबतच डिझेल चोरीच्या या घटनांना पायबंद घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top