Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

सटाणा: शेतकऱ्यांना मुदतबाह्य बुरशीनाशक विक्री, गुन्हा दाखल!

YOGESH KHARE
Jul 06, 2025 07:08:06
Nashik, Maharashtra
nsk_seedissue feed by 2C vidoe 2 **विशाल मोरे, बागलाण ( नाशिक )* ... Anc: सटाणा शहरातील एका दुकानातुन शेतकऱ्याना मुदतबाह्य बुरशीनाशक औषधं विक्री होत असल्याने सटाणा पोलीसात दुकान मालक व कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सटाणा बसस्थानका जवळ असलेले शिवतारा अँग्रो एजन्सीज येथे कोर्टेवा अँग्री सायन्स इंडिया प्रायव्हेट लीमिटेड या कंपनीने उत्पादित केलेले बुरशीनाशक औषधाच्या पाकिटावर असलेले बॅच नंबर, उत्पादन तयार झाल्याची दिनांक, मुदत संपल्याची दिनांक व क्यू आर कोड हे पुसून टाकल्याचे दिसून आले व शेतकऱ्याना मुदतबाह्य बुरशीनाशक विक्री करत असल्याचे दिसून आले. यावरून कीटकनाशक निरीक्षक अनिल महाले यांनी शिवतारा अँग्रो एजन्सीज या दुकानात छापा टाकत पाहणी केली असता प्रत्यक्षात कोर्टेवा अँग्री सायन्स इंडिया यांनी उत्पादित केलेले बुरशीनाशक औषधाच्या पाकिटावर असलेले बॅच नंबर, दिनांक व क्यू आर कोडं हे पुसून टाकल्याचे दिसून आले व शेतकऱ्याना मुदतबाह्य बुरशीनाशक विक्री करत असल्याचे सिद्ध झाल्याने एकुण 76,000 रुपये किमतीचा मुदतबाहय किटकनाशक औषध साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सटाणा पोलिस ठाण्यात सुरू आहे. *बाईट: कीटकनाशक निरीक्षक अनिल महाले**
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement