Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005

राजर्षी शाहू पुरस्कार: डॉ.जब्बार पटेल यांना मिळाला मानाचा पुरस्कार!

Pratap Naik1
Jun 27, 2025 03:00:26
Kolhapur, Maharashtra
Kop Shahu Purshkar Feed :- 2C Anc :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने यंदाचा 'राजर्षी शाहू पुरस्कार' ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री डॉ.जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आला. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. एक लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे अध्यक्ष अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के उपस्थित होते. यावेळी बोलताना ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री डॉ.जब्बार पटेल यांनी तळागाळातील वंचित,शोषित समाजाला सत्तेच्या मार्गातून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराज यांनी देशाला दिला आहे. विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि सामाजिक मूल्ये जपण्याचे कार्य करुन देवत्वाच्याही पलीकडे जाणारा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते. राजर्षी शाहू महाराजांच्या समतेची शिकवण आत्मसात करुन माणुसकी जपा, असं मत व्यक्त केले.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement