Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411026

हिंजवडीच्या आयटी कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी मोहिमेत 22,000ची संख्या पार केली!

KAILAS PURI
Jun 27, 2025 08:04:34
Pune, Maharashtra
hinjeadi ultimetum kailas puri Pune 27-6-25 feed by 2c Anchor - हिंजवडी गावाचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समावेश करण्यासाठी गेल्या काही दिवसापासून आयटी कर्मचाऱ्यांकडून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाच दिवसात या मोहिमेत बावीस हजारहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करत पाठिंबा दर्शवला आहे. आयटी कर्मचाऱ्यांकडून ही मोहीम सुरू असताना सरकारी पातळीवर मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आयटी कर्मचारी संतप्त झाले असून त्यांनी आणखी मोहीम तीव्र केली आहे. ट्राफिक आणि इतर समस्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आयटी पार्क हिंजवडी चेष्टेचा विषय झाला असल्याची खंत व्यक्त करतानाच येत्या काही दिवसात समस्या सोडवल्या नाहीत तर आणखी तीव्र मोहीम सुरू करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तर ग्रामस्थांनी हिंजवडीला महापालिकेत घ्यायचं असेल तर आत्ताच घ्यावं अन्यथा पुढे आम्ही स्वतंत्र महानगरपालिकेची मागणी करू असा इशारा दिला आहे. याच मुद्द्यावर आयटी कर्मचारी आणि स्थानिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...! kailas chaupal+ vis
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement