Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिममध्ये पावसाने जलसाठ्यात दिला मोठा उधळा!

GANESH MOHALE
Jun 28, 2025 04:32:40
Washim, Maharashtra
वाशिम: File:2806ZT_WSM_DAM_WATER_LEVEL रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम अँकर : जून महिन्याचा शेवट सुरू होऊनही पावसाचा मागमूस नव्हता,त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील अनेक लघु व मध्यम प्रकल्प कोरडेठाक झाले होते.परिणामी, संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईचं संकट गडद होत चाललं होतं.मात्र, २५ व २६ जून रोजी झालेल्या सलग दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे परिस्थितीत दिलासादायक बदल घडून आला आहे.गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ११.१५ टक्के, तर मध्यम प्रकल्पांमध्ये ११.११ टक्के पाणीसाठा झाल्याची नोंद आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सिंचनाच्या दृष्टीने काहीसा दिलासा मिळाला आहे.वाशिम जिल्ह्यात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळा च्या अखत्यारीत ७५ लघु प्रकल्प असून, मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत ९२ प्रकल्प कार्यरत आहेत.याशिवाय,सोनल आणि एकबुर्जी हे दोन मध्यम प्रकल्प जिल्ह्यातील नागरिकांच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत.पावसामुळे जलसाठ्यात झालेली ही वाढ अल्प प्रमाणात असली तरी ती समाधानकारक आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement